Photo Credit- Social Media संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्याचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश
Santosh Deshmukh case: बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर निर्घृण हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील “वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडे राजीनामा द्या”, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. त्यासाठी काल बीडमध्ये सर्वपक्षीय आंदोलनही करण्यात आले. बीडमधील या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, ज्या ज्या नेत्यांची आणि धनदांडग्यांची बंदुकी-पिस्तुले दाखवीत छायाचित्रे आहेत त्या सर्वांचे शस्त्र परवांनेही रद्द करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा चौकशी सीआयडकडून करण्यात येत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून बीडमधील काही तरूणांचे हातात बंदुका घेतानाचे आणि बंदुकीतून गोळी झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. यावर सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत आहे. अखेर फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांना आदेश दिले आहेत.
बीडमधील काही नेते आणि तरुणांचे बंदुकीतून गोळी झाडतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे बंदुकीसह ज्यांचे- ज्यांचे फोटो व्हायरल होत आहेत, त्या सर्वांचे शस्त्र परवाने रद्द करून त्यांची शस्त्रे ताब्यात घेण्यात यावीत. ही प्रक्रिया तातडीने सुरू करा. तसेच आतापर्यंत ज्यांना ज्यांना बंदुकीचे परवाने दिलेत त्यांचाही फेर आढावा घेण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
कझाकिस्तान विमान अपघातावर पुतिन यांनी मागितली माफी; म्हणाले, ‘हा अपघात रशियाने
बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. बंदुकीसह ज्यांचे- ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करा. ही प्रक्रिया तातडीने सुरू करा. तसेच आतापर्यंत ज्या बंदुकीचे परवाने दिले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या, असे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येला 20 दिवस उलटून गेले असतानाही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड काही दिवसांपासून फरार आहे. त्यामुळे या प्रकरणातील अनेक आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळेही बीडमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे, जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक करावी आणि जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अश मागणी जोर आंदोलकांकडून केली जात आहे.