सौजन्य - नवराष्ट्र टीम
राष्ट्रवादीचे कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी क्षेत्रीय उपायुक्त सुहास जाधव यांना निवेदन दिले आहे. मागणीची दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गुरनानी यांनी दिला आहे. निवदेनातून अर्धवट प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, खोदाईनंतर रस्ते मूळ स्वरूपात दुरुस्त करुन जबाबदार यंत्रणा व कंत्राटदारांवर कारवाई करावी, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन स्वीकारताना उपायुक्त जाधव यांनी संबंधित विभागांना तातडीची सूचना देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.






