SPPU
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा हाणामारीची घटना घडली असून, एका विद्यार्थ्याला मारहाण करीत त्याच्या डोक्यात कठीण वस्तूने मारल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी चैतन्य महेश वाघेलकर (वय २०, रा. पनवेल) याने तक्रार दिली आहे. यात चैतन्य व त्याचे दोन मित्रही जखमी झाले आहेत. पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.
वादाचे पर्यवसान हाणामारीत
पुणे विद्यापीठाच्या आवारातील एसपीपीयू कौशल्य विकास केंद्रात दोन विद्यार्थी शिकत आहे. त्यांच्यात किरकोळ वाद आहेत. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. तिघांनी संबंधित विद्यार्थ्याला फोनकरून फुड कोर्ट कॅन्टीन शेजारी लॉ डिपार्टमेंटच्या खाली बोलावले. त्यांच्यात वाद झाले. वादानंतर तिघांनी तक्रारदार व त्यांच्या दोन मित्रांना मारहाण केली. तर, एकाने तक्रारदार यांच्या डोक्यात दगड घालून जखमी केले.
चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गेल्या आठवड्यात सोशल मिडीयात व्हायरल केलेला राजकीय मजकूर हटविण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.