मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: ठाणे जिल्ह्यात एक दुर्दैवी रेल्वे अपघात उघडकीस आला असून सोमवारी सकाळी (9 जून) मुंब्रा रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे अनेक प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून पडून 6 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काल रेल्वे मंत्र्यांनी एक उच्चस्तरीय बैठक देखील घेतली आहे. आज या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
काल लोकल ट्रेनमध्ये अपघात झालयावार प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकलमधील वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आगामी काळामध्ये आशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. खासगी कार्यालयात ते करणे थोडेसे कठीण आहे. यामुळे कंपन्यांच्या नफा-तोटा यावर परिणाम होतो. मात्र येत्या काळात यावर निर्णय होऊ शकतो.
मुंब्रा रेल्वे अपघातावर शरद पवारांचे महत्वाचे भाष्य
मुंब्रा-दिवा रेल्वे दुर्घटनेवर बोलताना शरद पवार म्हणाले, “मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.”
पुढे बोलताना पवार म्हणाले, “मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही.”