“महाराष्ट्राची कहाणी सुरु होते ती देवाच्या पावलांनी”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्रधर्म’ या नव्या पॉडकास्टद्वारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेवर प्रकाश टाकणारी नवी मालिका सुरू केली आहे. या पॉडकास्टच्या पहिल्याच भागात त्यांनी रामायण, महाभारत आणि गौतम बुद्धांच्या कालखंडाशी महाराष्ट्राच्या भूमीचा संबंध विशद केला आहे.
Thane News : आधुनिक भात शेतीचं प्रशिक्षण; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भात लागवडीचे प्रात्यक्षिक
फडणवीस यांनी सांगितलं की, “महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर मागे जावं लागेल — अगदी प्रभू रामाच्या वनवासापर्यंत. त्यांनी दंडकारण्यात प्रवेश केला तोच विदर्भ आणि नाशिकचा घनदाट जंगलांचा प्रदेश. पंचवटी, लक्ष्मणरेषा, रावणाचं आगमन, हे सारे प्रसंग या भूमीतच घडले. धर्म-अधर्माचा संघर्ष इथेच उभा राहिला होता.” नाशिकला कुंभमेळ्याच्या तयारीसाठी गेले असताना, या पुरातन इतिहासाचे स्मरण झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. “राम-रावण युद्ध हे सत्याचा जय कसा होतो याचं प्रतिक आहे,” असं ते म्हणाले.
महाभारतकालीन दाखले देताना फडणवीस म्हणाले की, विदर्भात दमयंतीचा जन्म झाला होता. अर्जुनाने कोकणातील गुहांमध्ये तप करून दिव्यास्त्र प्राप्त केली होती. कृष्णाने रुक्मिणीचे पत्र मिळताच तिच्या मदतीस धाव घेतली — हे सारे प्रसंगही महाराष्ट्राच्या भूमीशी निगडित आहेत. चिखलदऱ्याच्या अरण्यात पांडवांनी अज्ञातवास केला आणि किचकाचा पराभवही इथेच झाला, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरेंना माजी NSG कमांडोचा सवाल; ’26/11 च्या हल्ल्याच्या वेळी तुमचे योद्धे कुठे होते?’
भगवान बुद्धांच्या योगदानाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “बुद्धांच्या विचारांनी महाराष्ट्र केवळ प्रभावित झाला नाही, तर त्यांच्या शिकवणींना कृतीत उतरवले. अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये कोरलेल्या उपासना आणि ध्यानधारणा आजही बोलक्या आहेत. शंकराचार्यांनी चिदानंद रूप शिवोहम या विचाराचा प्रचार करीत करवीरमध्ये पीठ स्थापन केलं. त्यामुळे महाराष्ट्र उत्तर-दक्षिण भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक प्रवाहांना जोडणारा केंद्रबिंदू ठरतो.
फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ या पॉडकास्टच्या या पहिल्या भागातून त्यांनी महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ओळख नव्या पद्धतीने उलगडली असून, पुढील भागांमध्येही असेच विविध संदर्भ मिळण्याची अपेक्षा आहे.