मुख्यमंत्री फडणवीसांचे ओएसडी जरांगे पाटलांच्या भेटीला (फोटो- सोशल मिडिया)
मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आक्रमक
29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडक देणार
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगे पाटलांच्या भेटीला
जालना: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडक देणार आहेत. 29 तारखेला जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे-पाटील आक्रमक झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचे समजते आहे. मात्र जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतल्याचे समजते आहे.
उद्या राज्यभरात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. मुंबईत पुढील दहा दिवस ही अत्यंत धावपळीचे धामधुमीचे असणार आहेत. या काळात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चची दारे खुली केली आहेत. फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचले होते. त्यानंतर जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलनासाठी जण्यावर ठाम असल्याचे समजते आहे.
जरांगे पाटलांचे फडणवीसांबद्दल अपशब्द
भाजप नेत्या व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या व्हिडिओ देखील शेअर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या आईच्या नावाचा उल्लेख करत त्यांचा अपमान करत आहेत. यावरुन चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान आता याच मुद्यावरून मंत्री नितेश राणे देखील आक्रमक झाले आहेत.
काय म्हणाले मंत्री नितेश राणे?
जे रक्ताने मराठे असतात, ते कधीच कोणाच्या आईबाबट अपशब्द वापरणार नाहीत. ज्या शिवरायांचा आपण आदर्श घेतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच प्रत्येक माता-भगिनीचा आदरच केलेला आहे. जरांगे पाटलांनी आरक्षणाची लढाई लढावी.
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 25, 2025
ती लढाई लढत असताना यांच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर, ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर जरांगे पाटील यांनी आपल्या बोलण्याचे स्पष्टीकरण दिले आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो. परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन.