• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cm Devendra Fadnavis Said Change In Corporate Law Mumbai Marathi News

CM Devendra Fadnavis: ‘सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी…” फडणवीसांची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात प्रथमच स्वतंत्ररित्या सहकार मंत्रालय सुरू केले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर सहकार चळवळीचे सक्षमीकरण होत आहे, असे फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2025 | 08:02 AM
CM Devendra Fadnavis: ‘सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी…” फडणवीसांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ, शतकोत्तर सुवर्ण स्मृतिदिन 150 वर्ष, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त ‘ सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण’ या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, दिलीप दिघे उपस्थित होते.

सहकारी बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत बँकिंग क्षेत्रात अमुलाग्र बदल केले असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोअर बँकिंग प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानयुक्त बँकिंग प्रणाली सहकारी बँकांनी अंगीकारली. ग्राहकपयोगी सर्व सेवा सहकारी बँका देत आहेत. यामुळे ‘ फिस्कल कन्सोलिडेशन’ च्या कालावधीत सहकारी बँका जगल्या आहेत. या काळातही सहकारी बँकांनी उत्तम काम केले आहे. पुणे जिल्ह्यातील सुपे येथे 12 मे 1875 रोजी सावकारांविरोधात झालेला उठाव म्हणजे ही सहकार क्षेत्राची सुरुवात ठरली. अशा या ऐतिहासिक घटनेला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत.

सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दख्खनच्या उठावाचा इतिहास…
सहकार की नींव रखने वाले दक्कन के आंदोलन का इतिहास…
('सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण' परिसंवाद | मुंबई | 12-5-2025)#Maharashtra #Mumbai #Cooperative pic.twitter.com/7LdIabRdrB — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 12, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात प्रथमच स्वतंत्ररित्या सहकार मंत्रालय सुरू केले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर सहकार चळवळीचे सक्षमीकरण होत आहे. देशभरात सहकारी संस्थांचे सक्षमीकरण केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने १० हजार गावांमध्ये सहकारी संस्थांना प्रशिक्षण देऊन त्यांचे ‘ बिजनेस मॉडेल ‘ बनविण्यात येत आहे. या कामासाठी जागतिक बँकेनेही समाधान व्यक्त केले असून यातून ‘ ॲग्री बिजनेस’ची नवीन सुरुवात करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सहकारी साखर कारखाने साखर उत्पादनासोबत उपपदार्थही बनवीत आहेत. यामुळे जागतिक स्पर्धेत साखर कारखाने टिकत आहेत. केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत, इथेनॉल धोरण यामध्ये सातत्याने बदल केले आहेत. शेतकऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांकडेच राहील, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी उपपदार्थांच्या निर्मितीकडेही वळले पाहिजे. सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या सूतगिरण्यांना विजेचे दर हे जागतिक स्पर्धेत टिकविण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याच्या तक्रारी असतात. शासन विजेबाबत अनुदानही देत असते. त्यामुळे सर्व सुतगिरण्या सौरऊर्जेवर नेण्यात येत आहे. त्यामुळे सुतगिरण्यांची विजेची सर्वात मोठी अडचण दूर होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांनाही मदत करण्यात यावी. एकूण सहकारी संस्थांपैकी 50 टक्के या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. सहकार कायद्यात बदल करून मागील काळात सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळे प्रकरण ठेवण्यात आले आहे. यामधून सहकारी गृहनिर्माण संस्थांची व्यवस्था उभारण्यात येत आहे. स्वयं पुनर्विकास करण्यासाठी नवीन योजना सहकारी संस्थांसाठी आणलेली आहे. त्यांना राज्य शासन १७ प्रकारच्या वेगवेगळ्या सवलती देत आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बळकटीकरणामुळे मुंबईतच हक्काचे घर नागरिकांना मिळत आहे. आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकास बाबत समितीही स्थापन करण्यात आलेली आहे. सहकारी बँकांमधून राज्य शासनाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होण्यासाठी याबाबत अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Web Title: Cm devendra fadnavis said change in corporate law mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 09:54 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
1

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
2

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप
4

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Stock To Buy: ‘या’ 3 बँकिंग शेअर्समध्ये गुंतवा पैसे, 33% नफ्याची हमखास हमी!

Stock To Buy: ‘या’ 3 बँकिंग शेअर्समध्ये गुंतवा पैसे, 33% नफ्याची हमखास हमी!

व्हिडिओ

पुढे बघा
CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.