नवी दिल्ली : दिल्लीत नवीन संसद बांधण्याच काम सुरू आहे. या संसद भवनात बाळासाहेबांच चित्र लावण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) या संसद भवनात बसवण्यात येणाऱ्या अशोकस्तंभाचं अनावरण केलं होतं.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवीन संसद भवनाच्या छतावरील 20 फूट उंच भव्य अशोक स्तंभाचे अनावरणही केले होते. आता या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं ही बोललं जात आहे. नव्या संसद भवनातही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याची मागणी मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदींची भेट घेणार असून याबाबत आवाहन करणार आहे. त्यांच्या मागणीवर पंतप्रधान मोदी सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय.