कोरोना विषाणू फोटो
पालघर : सध्या देशासह राज्यात कोरोनानं (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. पालघरमध्येही गेल्या काही दिवसापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसत आहे. नुकतंच एका रुग्णाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. यावेळी संतप्त नातेवाईकांनी वेळेत व्हेंटिलेटर न लावल्यामुळेच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
[read_also content=”आकांक्षा दुबेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपाखाली भोजपुरी गायक समर सिंगला अटक! गुन्हे शाखेची कारवाई https://www.navarashtra.com/crime/bhojpuri-singer-samar-singh-arrested-on-charges-of-inciting-akanksha-dubey-to-commit-suicide-nrps-381745.html”]
जिल्ह्यात सध्या 98 कोरोनाबाधितांवर (Covid-19 Updates) पालघर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हेल्थ युनिट या डेडिकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णलयातील कोरोना महिलेचा (गुरुवारी) मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकाईकांनी एकच आक्रोश केला. या महिलेला उपचारासाठी आणण्यात आले होते मात्र, संध्याकाळी व्हेंटिलेटर उपलब्ध करुन न दिल्यानं तिचं निधन झाल्याचा आरोप आता नातेवाईकांनी केला आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या 98 कोरोना बाधित रुग्ण यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये पालघरच्या ग्रामीण भागात 98 रुग्ण तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 29 रुग्णवर उपचार सुरू होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरासरी 7 रुग्ण तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 5 दैनंदिन रुग्णांची नोंद केली जात आहे. तर या आठवड्यात ग्रामीण भागात 1 तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 8, असे एकूण 9 रुग्ण दररोज आढळून येत आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण पालघर तालुक्यात असून ही संख्या 37 आहेत. त्याखालोखाल डहाणू तालुक्यात 4 तलासरी तालुक्यात एक, विक्रमगड तालुक्यात एक आणि वाडा तालुक्यात एक, असे जिल्ह्यात ग्रामीण भागांत गुरुवारपर्यंत 44 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात 21 करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील ही संख्या 65 झाली आहे.