दीनानाथ रुग्णालय प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले 'हे' महत्त्वपूर्ण आदेश (Photo Credit- Social Media)
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथील एका कार्यक्रमात भाषण करत असताना एकामागून एक अशी अनेक निवेदने येऊ लागली, अशीच अनेक निवेदने येत असताना विविध कामे मार्गी लावण्याचे आश्वासन ते देत असताना उपस्थित कार्यकर्त्याने निवेदन देत सूचना केली, अगोदरच वैतागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्ही मला मते दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, अशा भाषेत सदर कार्यकर्त्याला खडसावले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंप इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सुरू असलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर ते बोलत असताना त्यांनी वैतागून कार्यकर्त्याची खरडपट्टी काढली. दरम्यान आज दिवसभर उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सदर कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.ने नूतनीकरण केलेल्या एम.आय.डी.सी. पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. pic.twitter.com/HUni9by0Zg
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 5, 2025
बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना एकामागून एक निवेदने येत होती. याचवेळी एका कार्यकर्त्याने निवेदन देऊन एक सूचना केली, यावरून अजित पवार चिडले, आणि त्यांनी तुम्ही मला मत दिलं म्हणजे तुम्ही मालक झाला नाहीत, अशी टिप्पणी केली. यानंतर त्यांनी आपल्या भाषणात विविध विकास कामांची माहिती दिली. मात्र त्यानंतर अजित पवार यांच्या याच वक्तव्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.
‘देशात बारामती नंबर एकचे शहर करणार’; अजित पवार यांचा पुनरुच्चार
विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने मला विजयी केल्याने विधानसभेत गेल्यानंतर छाती गर्वाने फुगते, असे सांगत बारामती तालुका महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रमांक एकचा करून दाखवू, त्याचबरोबर पाण्यापासून कोणताही भाग वंचित राहणार नाही, अशी पाणी योजना राबवू, असे आश्वासन देत बारामतीचा विकास हाच आपला ध्यास आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
सर्वधर्मसमभाव या न्यायाच्या भूमिकेतून राज्याचा विकास केला जाईल. बारामतीकरांना दिलेली सर्व आश्वासनाची पूर्तता आपण करू. पाण्याच्या बाबतीत कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही, मात्र बंद पाईपलाईनला कोणीही विरोध करू नये असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले. महायुतीच्या सरकारमध्ये माझ्याकडे अर्थ व नियोजन उत्पादन शुल्क अशी जबाबदारी असुन ३ मार्चला अर्थसंकल्प मांडणार असून आम्ही सामान्य जनतेसाठी मांडण्याचा प्रयत्न असून राज्यातील आर्थिक शिस्त सुधारणार आहे.
हेही वाचा: ‘देशात बारामती नंबर एकचे शहर करणार’; अजित पवार यांचा पुनरुच्चार
बारामती तालुक्यातील जिरायती भागातील पाणी प्रश्न सोडवला जाणार आहे. आजपर्यंत सात वेळच्या टर्म पेक्षा यावेळी जोरदार काम करणार आहे असे सांगत बारामतीकरांवर पुस्तक लिहिणार आहे. लोकसभेला ज्या ३८६ बुथवर मी पिछाडीवर होतो विधानसभेला त्या ३८६ बूथने मला संपूर्ण आघाडी दिली.याबाबत मी बारामतीकरांसमोर नतमस्तक आहे.तुम्ही तुमच्या गावात चांगला करायचं तर मी पूर्ण सहकार्य करेल असे गाव पुढाऱ्यांना सांगितले,माझे मुंबई,पुणे,बारामती येथील सेटअप बदलणार असुन,नागरिकांची काम अडणार नाहीत.