उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती: विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने मला विजयी केल्याने विधानसभेत गेल्यानंतर छाती गर्वाने फुगते, असे सांगत बारामती तालुका महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रमांक एकचा करून दाखवू, त्याचबरोबर पाण्यापासून कोणताही भाग वंचित राहणार नाही, अशी पाणी योजना राबवू, असे आश्वासन देत बारामतीचा विकास हाच आपला ध्यास आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल बारामती शहर व तालुका नागरी सत्कार समितीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, आमदार अमोल मिटकरी, पक्ष निरीक्षक सुरेश पालवे,,जेष्ठ नगरसेवक किरण गुजर,बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे,शहराध्यक्ष जय पाटील,युवकाध्यक्ष अविनाश बांदल,संभाजी होळकर आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कमी जागा मिळाल्याने आमच्यासह माहितीतील सर्वच घटक पक्षांना चिंता होती. परंतु आम्ही माहितीच्या नेत्यांनी एकत्र येऊन राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसह सर्वच घटकांना महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या. त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक भागात महायुतीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळून सर्वाधिक जागा महायुतीने जिंकल्या. त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, त्या यापुढे देखील सुरू ठेवल्या जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा: Cabinet portfolio : उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारवरच वैतागले…; म्हणाले,”अरे गप्प बसा ना बाबा”
सर्वधर्मसमभाव या न्यायाच्या भूमिकेतून राज्याचा विकास केला जाईल. बारामतीकरांना दिलेली सर्व आश्वासनाची पूर्तता आपण करू. पाण्याच्या बाबतीत कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही, मात्र बंद पाईपलाईनला कोणीही विरोध करू नये असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.विरोधकांकडून नेहरेटीव सेट केला जातोय, मात्र मी आपणास शब्द देतो, जोपर्यंत चंद्र,सूर्य आहे.तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार नाही.लोकसभेला फटका बसल्यावर आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही,लाडकी बहीण योजना महिलांमध्ये प्रसिद्ध झाली. लाईट बिल माफ केलं विरोधकांनी यावर टीका केली,विधानसभेचा निकाल महाविकास आघाडीला पचला नाही आणि ईव्हीएम च्या नावाने टीका सुरू केली.
महायुतीच्या सरकारमध्ये माझ्याकडे अर्थ व नियोजन उत्पादन शुल्क अशी जबाबदारी असुन ३ मार्चला अर्थसंकल्प मांडणार असून आम्ही सामान्य जनतेसाठी मांडण्याचा प्रयत्न असून राज्यातील आर्थिक शिस्त सुधारणार आहे.बारामती तालुक्यातील जिरायती भागातील पाणी प्रश्न सोडवला जाणार आहे. आजपर्यंत सात वेळच्या टर्म पेक्षा यावेळी जोरदार काम करणार आहे असे सांगत बारामतीकरांवर पुस्तक लिहिणार आहे.लोकसभेला ज्या ३८६ बुथवर मी पिछाडीवर होतो विधानसभेला त्या ३८६ बूथने मला संपूर्ण आघाडी दिली.याबाबत मी बारामतीकरांसमोर नतमस्तक आहे.तुम्ही तुमच्या गावात चांगला करायचं तर मी पूर्ण सहकार्य करेल असे गाव पुढाऱ्यांना सांगितले,माझे मुंबई,पुणे,बारामती येथील सेटअप बदलणार असुन,नागरिकांची काम अडणार नाहीत.
आज बारामतीत पार पडलेल्या नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या बारामतीकरांनी माझ्यावर दाखवलेलं प्रेम आणि विश्वास, याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. तुम्ही माझ्या पाठीशी भक्कम उभे आहात, तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे, याकरिता मी सदैव ऋणी राहीन. हीच बाब मला जनसेवेसाठी कायम… pic.twitter.com/j3ITZdohZB
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 22, 2024
मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही त्यांना थांबवले म्हणुन, काही जणांना रोष व्यक्त केला.असे छगन भुजबळ यांचे नाव न घेता सांगत काहींना आम्ही केंद्रात योग्य स्थान दिले जाईल,नवीन चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे.असे यावेळी अजित पवार म्हणाले.
सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली, त्यांच्या खुनाची न्यायालयीन चौकशी करून यातील मास्टरमाइंडला सोडणार नाही , असा इशारा देत अशा घटना शरमेने मान खाली घालायला लावतात,या अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी सांगितले .
मतमोजणी वेळी आईचा देव्हार्यासमोर जप
मतमोजणी वेळी काही माध्यमांनी आपण पोस्टल मतदानामध्ये मागे असल्याचे वृत्त दिल्याने माझी आई देव्हाऱ्यात देवासमोर देवाचे नामस्मरण करत बसली होती. मात्र माझी बहीण विजया पाटील हिने आईला घाबरू नको, दादा चांगल्या मताने विजय होईल, असा विश्वास दिला होता. या मतमोजणी मध्ये प्रत्येक फेरीत मोठे मताधिक्य आपणास बारामतीकरांनी मिळवून दिले, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.