राजकीय वर्तुळात खळबळ! मुंबईत अधिवेशन सुरु अन् उपमुख्यमंत्री गुपचूप गाठली दिल्ली, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी (फोटो सौजन्य-X)
Eknath shinde News in Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरु असून या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी म्हणजे 9 जुलैला दिल्ली गाठली असल्याची माहिती मिळत आहे.या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या काही बड्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहे. या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
एकीकडे मुंबईत अधिवेशन सुरू आहे,तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्लीला भेट दिली. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या गाठीभेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागील कारण गुलदस्त्यात आहे. शिंदेंनी अचानक केलेल्या या दिल्लीवारीमुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नियोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे. तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र यागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
एकनाथ शिंदे काल (बुधवार) दिल्लीचा दौरा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी केंद्रातील अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेतली. या दिल्लीवारीमागचं आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. ‘दिल्लीवारी नेमकी कशासाठी हे अजून कळू शकलेलं नसलं तरी या दौऱ्यामुळे एक विशेष महत्त्व आलेलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.
अधिवेशनाचे दुसरा आठवडा सुरु असताना आणि अनेक महत्त्वाची विधेयक मांडली जात असताना हा दिल्ली दौरा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावला आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले आणि त्याऐवजी उदय सामंत किंवा इतर नेत्यांना पाठवले होते. सुनील प्रभूंसोबत ५० नेत्यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. या भेटीगाठी आणि अचानक दिल्ली दौऱ्यामागचं अद्याप कारण स्पष्ट होणं बाकी आहे.