मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आज लटके यांचा नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज शुक्रवारी दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तर भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील शुक्रवारी उमेदवार अर्ज दाखल केला. मुंबईत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri East Bypoll) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंधेरीतील राजकीय परिस्थिती क्षणाक्षणाला रंगतदार व बदलत आहे. तसेच अनेक घडामोडी घडत आहेत. दरम्यान, या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती करणारे पत्र (Letter) लिहलं आहे. आता या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
[read_also content=”राज ठाकरेंच्या पत्राला भाजपाने दिलं ‘हे’ उत्तर, पत्रात म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-replay-to-raj-thackeray-letter-bjp-said-in-letter-336720.html”]
दरम्यान, प्रिय मित्र देवेंद्र, भाजपने अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) लढवू नये. स्व. आमदार रमेश लटके यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, स्वर्गीय रमेश लटके यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने रमेश ह्यांच्या आत्म्यास खरी शांती मिळेल, अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना लिहिलं आहे. या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी विचारले असता, निवडणूक लढवावी की नाही किंवा अर्ज मागे घ्यावा की नाही. हा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. भाजप व शिंदे गट यावर चर्चा करेल. एकनाथ शिंदेंशी याबाबत बोलू तसेच आमच्या पक्षश्रेष्ठीशी चर्चा, मसलत करु आणि त्यानंतर निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या पत्राला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.