मुंबई : माझी आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan And Devendra Fadnavis Meeting) यांची कोणतीही भेट झालेली नाही. मी पुण्याला पालकमंत्री म्हणुन येणार नाही. लोकसभा लढवावी अशी तुमची का ईच्छा आहे हे माहित नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.
[read_also content=”‘डीआयडी सुपर मॉम्स’च्या मंचावर सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत अंकिता लोखंडे झाली भावूक, पहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/movies/ankita-lokhande-gets-emotional-remembering-sushant-singh-rajput-on-the-stage-of-did-super-moms-watch-video-321780.html”]
ते पुढे म्हणाले की, अमित शाह हे दरवर्षी मुंबईत येतात. बैठक घेण्याचा आम्ही त्यांना आग्रह केला आहे. बैठकीनंतर ते एका शाळेचे उद्घाटन देखील करणार आहेत. या व्यतिरिक्त त्यांचा कोणताही कार्यक्रम नाही. यावर कोणतीही पतंगबाजी करु नये.
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबईत भेट घेतल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे नवा राजकीय वाद सुरु झाला. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या. मात्र, आता फडणवीसांनी अशोक चव्हाणांसोबत भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. त्याचबरोबर राज्यातील नवीन सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी ते गैरहजर होते. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या काही आमदारांचा गटही गैरहजर असल्याने नाराजी उघड झाली होती. त्यातच अशोक चव्हाण यांनी फडणवीसांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.