मुंबई : शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत सत्तांतर केले आहे. भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने कामाचा धडाका सुरु केला आहे. पण अनेकवेळा विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत राडा घालत आहेत, तसेच शिंदे गट व शिवसैनिक (Shivsainik) यांच्यात सुद्धा राडे होताना दिसत आहेत. दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट व उद्धव ठाकरेंची शिवसेनेला (Shivsena) कोर्टाची (Court) पायरी चढावी लागली. यानंतर शिवसेनेला दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी कोर्टानी दिली आहे. परंतू दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी होत आहे. यावर राजकारण होताना दिसत आहे.
[read_also content=”आम्ही कधी सत्तेत येऊन बसू तुम्हाला कळणार सुद्धा नाही, अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/you-will-not-even-know-when-we-will-come-to-power-ajit-pawar-332314.html”]
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी दसरा मेळाव्यावरुन एक महत्वाचे वक्तव्य केलं आहे. सध्या दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट व शिवसेनेकडून राजकारण होत आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नवनवीन वक्तव्य समोर येत असताना, आता एकनाथ शिंदेंनी शरद पवारांनी चांगलाच सल्ला दिला आहे. दसरा मेळाव्याला मर्यादा ओलांडू नका, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, फक्त मोजक्या आमदारांचे किंवा शिंदे गटाचे प्रमुख नसून, तुम्ही राज्यातील 12 कोटी जनतेचे प्रमुख आहात, त्यामुळं दसरा मेळाव्याला मर्यादा ओलांडू नका असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे.