मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांनी ट्विटरवरून प्रसिद्ध केलं आहे. “राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पाठवलं आहे.
[read_also content=”कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषध घेऊन दवाखाना चालत नसतो’; मनसेच्या गजानन काळेंच टोला नक्की कुणाला? https://www.navarashtra.com/maharashtra/the-hospital-does-not-run-on-the-advice-of-a-compounder-mns-gajanan-kale-saying-to-whom-nrps-296751.html”]
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.#MVAisAntiShivsena pic.twitter.com/lX2qjVTxGM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022