पुणे : आगामी निवडणुकांमध्ये बूथ जिंकले तर निवडणूक जिंकू असा कानमंत्र भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक बैठकीत दिला.
शिवप्रकाश हे सध्या पश्चीम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, काल पुण्यात झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सी बूथ वर जास्तीत जास्त भर देऊन बूथ सशक्तीकरणावर भर देऊन बूथ वरील कार्यकर्त्यांच्या मार्फत मतदारांच्या पर्यंत केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना पोहचविण्यासाठी भर दिला पाहिजे. तसेच बूथ जिंकता आले तर निवडणूक देखील जिंकता येते असे प्रतिपादन शिवप्रकाश यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर च्या विभागवार बैठका सध्या पुण्यात तसेच कोल्हापूर या ठिकाणी सुरू आहेत. यावेळी पुण्यात शिवप्रकाश यांनी विविध पदाधिकाऱ्यांशी सवांद साधला. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे सुनील कर्जतकर योगेश बाचल यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सुकाणू समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवप्रकाश यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, केसरीवाडा या ठिकाणी भेट देऊन तेथील पदाधिकाऱ्यांच्या समवेत वार्तालाप केला.
यावेळी आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, दीपक पोटे, गणेश बिडकर, हेमंत रासने पुष्कर तुळजापूरकर यांनी शिवप्रकाश यांचे स्वागत केले.






