मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी आज, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. दरम्यान अशातचं आता शिवसेना फोडून बाहेर पडलेल्या 40 हून अधिक आमदारांची मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेना फोडून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता आमदारांच्या अपेक्षाही वाढल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार बच्चू कडू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. आतापर्यंत बच्चू कडू यांच्याजवळ राज्यमंत्रिपद होतं. मात्र आता कॅबिनेट मंत्रिपद मिळावं आणि मोठा विभागा असावा अशी मागणी केल्याची चर्चा आहे. जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास यांसारखी मोठं मंत्रिपद त्यांना मिळावं अशी बच्चू कडूंची मागणी आहे.
[read_also content=”मातोश्रीवर कधी जाणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/when-will-you-go-to-matoshri-chief-minister-eknath-shinde-said-nrdm-299416.html”]
दरम्यान दुसरीकडे शिंदेंच्या गटातील संजय शिरसाटही नाराज असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला आहे. एका जिल्ह्यात दोन मंत्रिपद दिलं जात असल्यानं शिरसाट नाराज झाले आहे. यापुढेही अशी नाराजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेची खरी अग्निपरीक्षा आता सुरू होत आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.