ठाणे : ठाणे जिल्ह्यामध्ये अस्वच्छतेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. बऱ्याच ठिकाणी तर आठवडाभर कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत त्यामुळे घरामध्ये त्याचबरोबर रस्त्याच्या शेजारी कचरा तसाच साठून राहतो. पावसाचे दिवस असल्यामुळे कचऱ्याला घाण वास सुटतो आणि काही कचरा तर पाण्यामुळे वाहून जात असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई सुद्धा पसरते. आता खरचं आपलं ठाणे बदललं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्वच्छता सेवेच्या मोहिमेचा शुभारंभ ठाण्यात झाला. मोठ्या प्रमाणात या मोहिमेला नागरिक उपस्थित होते. मात्र चार दिवसापासून दिवा विभागातील कचरा उचलला गेला नव्हता. तर शिळफाटा भागातील घंटा गाड्या गायब आहेत. यातच डायघर येथील कचरा प्रकल्प चालविणाऱ्या ठेकेदाराला पैसे दिले नाही म्हणून काम बंद केले असे त्याने सांगितले आहे.
आता पोलिस बंदोबस्तात महापालिकेचे अधिकारी जाऊन त्याठिकाणी कचरा खाली केला. कामगारांना मारहाण केली, आत्ता तुम्हीच सांगा या अधिकाऱ्यांचे आम्ही करायचे काय? असा संतप्त सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
कल्याण ग्रामीण भागात कचरा समस्या सुटत नाही. मनसे आमदार राजू पाटील यांनी यासाठी वारंवार पाठपुरावा केला. जिल्हा अधिकाऱ्यांसोबत, महापालिका आयुक्त यांच्यासोबत बैठका घेतला. वारंवार मनसे आमदार कचरा प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासने दिली गेली. आता जो प्रकारसमोर आला आहे ते ऐकून एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिवा, शीळ, डायघर भागात कचऱ्याच्या समस्येमुळे नागरीक त्रस्त आहेत. नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करीत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या कार्यशैलीवर जोरदार टिका केली आहे. या अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्यासोबत काय करायचे याविषयी ट्वीट केले आहे. गेल्या चार दिवसाापासून दिवा विभागातील कचरा उचलला गेला नाही.
मा.मुख्यमंत्री साहेब, @mieknathshinde
खरंच आपले ठाणे बदलतंय का ? दिवा-शीळ विभाग ठाण्यातच येतो ना ?
हे प्रश्न विचाराचे कारण असे आहे की आपण १८ सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा २०२४ या मोहिमेचा शुभारंभ ठाण्यात पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट येथे केला व यावेळी सर्वं उपस्थित ठाणेकरांसह… pic.twitter.com/mWQ8AUEfAC— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 28, 2024
शीळ भागात सर्व कचरा गाड्या गायब आहेत. नागरिकांची बोंबाबोब सुरु आहे. त्यात नवा प्रकार समोर आला आहे. डायघर येथील कचरा प्रकल्प चालविणाऱ्या ठेकेदाराला पैसे दिले नाहीत. म्हणून त्याने काम बंद केले आहे, यानंतर महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी तिथे जाऊन जबरदस्तीने पोलिस बंदोबस्तात कचऱ्याच्या गाड्या खाली करुन कचऱ्याचा ढिग लावला आहे. इतकेच नाही तिथल्या सफाई कामगारांना मारहाण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न पेटू शकताे. मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी यांच्या उपस्थित स्वच्छता ही सेवा २०२४ या मेहिमेला सुरुवात झाली. रेतीबंदर, विसर्जन घाट या ठिकाणी सर्वांच्या उपस्थित स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत रोपांचे वाटपही केले. या प्रकरणीच मनसे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित करणारे ट्वीट केले आहे. खरोखच आपण घेतलेल्या शपथेचे पालिका अधिकारी पालन करीत आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे.