तरुणामध्ये जीबीएस सदृश्य लक्षणे (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
इचलकरंजी: शहापूर येथे राहणाऱ्या २२ वर्षीय परप्रांतीय तरुणामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय प्रशासनाने खबरदारी घेत तरुणाला तातडीने कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात पाठवले आहे. इचलकरंजी शहरात कामानिमित्त आलेल्या परप्रांतीय तरुणास कांही दिवसापासून अशक्तपण जाणवत होता. त्याची इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याच्यात जीबीएस सदृश्य काही लक्षणे आढळून आली. त्यामुळे पुढील तपासणी व उपचारासाठी त्याला सीपीआर येथे हलविण्यात आले.
जीबीएस हा गंभीर स्वरूपाचा आजार असून त्यामध्ये शरीराचे स्नायू कमकुवत होतात. काही प्रकरणात पक्षाघात होण्याची शक्यता वर्तविली जाते. हा आजार संसर्गजन्य नसला तरी तो पाणी आणि न शिजलेल्या अन्नावाटे पसरतो. त्यामुळे स्वच्छता आणि पूर्ण शिजलेले अन्न खाणे, या आजारावर त्वरित वैद्यकीय उपचार घेण्यात यावेत. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी यांनी केले आहे.
पुण्यात GBS ने पुन्हा डोके वर काढले: ‘या’ भागात आढळले रूग्ण
सिंहगड रस्ता भागात पुन्हा एकदा ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) चे नवीन रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने सिंहगड रस्ता भागातील एकुण ४३ आर ओ प्लांट बंद केले आहेत. या प्लांट चालकांकडून नियमावलीचे पालन न केल्याने त्यांच्याविराेधात ही कारवाई केली आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नन्हे, आंबेगाव परिसरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जीबीएसचे रुग्ण आढळले होते. जानेवारी महीन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महीन्यात जीबीएस अाजार झालेल्या रुग्णांची संख्या घटली हाेती. या भागातील जीबीएसचा धाेका कमी झाला असतानाच, गेल्या आठवड्यात या भागात नवीन रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी पुरवठा विभागाला पत्र पाठवून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भात कळविले हाेते.
पुण्यात GBS ने पुन्हा डोके वर काढले: ‘या’ भागात आढळले रूग्ण; महापालिकेने बंद केले 43 आर ओ प्लांट
जानेवारी महीन्यात जीबीएस आजार हा अशुद्ध पाण्यामुळे हाेत असल्याचे आढळून आले हाेते. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेकडून या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणी केली होती. यात ३० मधील २७ प्रकल्पांचे पाणी दूषित असल्याचे समोर आल्याने हे प्रकल्प बंद केले होते. तसेच त्यांना पाणी शुद्धीकरणाची नियमावली घालून देण्यात आली होती. या नियमावलीनुसार प्लांट चालकांनी अर्ज केल्यानंतर त्याची पाहणी करून ताे सुरु करण्याची परवानगी दिली जात आहे. अात्तापर्यंत केवळ चार जणांना ही परवानगी दिली आहे.