मुंबई- 2022 या वर्षाला निरोप देत, आपण 2023 या नवीन वर्षाचे स्वागत केले, मात्र या नवीन वर्षात नियमांचे बदल केल्यामुळं याचा फटका सर्वसामान्यांना बसणार याचे सरकारला काय देणे घेण नाही, यावरुन सामनातून केंद्र सरकारवर टिका करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सूर्योदयालाच केंद्र सरकारने विविध क्षेत्रांतील नवे नियम आणि बदलांचा दणका देत सर्वसामान्यांच्या बजेटला ‘दे धक्का’ दिला आहे. नवीन वर्षात जनतेच्या समस्या कमी करण्याचे मोदी सरकारचे वादे आणि दावे फोल ठरण्याची, सरत्या वर्षाला निरोप देताना सरकारने सोडलेले आश्वासनांचे फुगे फुटण्याची आणि 2023 मध्ये तरी जुन्या प्रश्नांची गाठोडी हलकी होतील, या जनतेच्या अपेक्षेवर पाणी फेरण्याची ही सुरुवात आहे. पुढे आणखी काय होते ते वर्षभरात दिसेलच. मात्र नव्या युगाच्या बाता करणाऱ्यांच्या राज्यातही वर्ष बदलले, प्रश्न कायम हे चित्र नवीन वर्षातही बदललेले नाही. अशी टिका सामनातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.
दरम्यान, जरी आपण नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले असले तरी नवीन वर्षात मूळ प्रश्न तेच आहेत. नवीन वर्षात सरकारच्या काही नियमातील बदलामुळं सामान्य माणसाला भुर्दड सोसावा लागणार आहे, विमा, वाहन, बँका, टपाल खाते आदीमुळं सामान्य लोकांचे नुकसान होणार आहे. आधीच 2022 या वर्षात महागाई, बेरोजगार, इंधानाचे सतत वाढणारे भाव यामुळं सामान्य माणूस आधीच कंटाळलेला आहे, या महागाईच्या गर्दीत सापडलेला असताना, आता नवीन नियमावली लादून केंद्र सरकारने लोकांचे जगणे मुश्किल करुन ठेवले आहे, अशी टिका सामनातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.
अपेक्षांची नवी नवलाई संपणार आहे, बँका, विमा, वाहन खरेदी, टपाल, पॅन कार्ड लिंक या नवीन वर्षातल नियमांमुळं सरकार काय साध्य करणार आहे, कर्जाचे हफ्त्यामध्ये वाढ होणार आहे, मोदी सरकारच्या काळात जीडीपी घसरला आहे, महागाईनं डोके वर काढले आहे. तसेच अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, आता मोदी सरकारनं नवीन नियमावली जारी करत, सामान्य लोकांचे जगणं मुश्किल केल आहे. अशी टिका सामनातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.