सोलापूर : केंद्र सरकारने जीवनावश्यक अन्नधान्य, गहू, तांदूळ, डाळी, गूळ व इतर खाद्याने वस्तूवर ५ टक्के जीएसटी लागू केली आहे.
या कायद्याच्या प्रखर विरोधात भारतीय उद्योग व्यापार मंडळ (नवी दिल्ली), पुणे मर्चंट चेंबर, कॅमेट, फाम या वरिष्ठ शिखर संघटनेच्या आदेशानुसार शनिवार (दि.१६) सोलापुरातील भाजीपाला मार्केट वगळता मार्केटयार्डातील भुसार विभाग व शहरातील किराणा मार्केट हा एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरमधील भुसार आडत व्यापारी संघाने दिली आहे.
२८ व २९ जून रोजी चंदिगढ येथील जीएसटी कौन्सिल या मीटिंगमध्ये प्रिपॅक्ड व प्रीलेबल्ड अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू वस्तूवर ५ टक्के जीएसटी लागू करण्यासंबंधी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने १३ जुलै २०२२ रोजी अधिसूचना जारी केली आहे.






