नागपूर : नागपुरच्या लक्ष्मीनगर चौकात भाजपा नेते व विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुडी उभारण्यात आली. यावेळी रामाच्या पालखीचं पूजन व आरती करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ढोल,ताशेच्या गजरात लेझीम पथकाचा समावेश करण्यात आले.
आज तब्बल 2 वर्षानंतर राज्यसरकारकडून कोरोना निर्बंध उठवण्यात आले. त्यामुळे राज्यात यावर्षी निर्बंधमुक्त गुढीपाडवा साजरा करण्यात येता आहे. नागपुरातही आज गुढीपाडवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गुढीपाडवा साजरा करण्यात आला. लक्ष्मीनगर चौक परिसरात शोभायात्रा काढण्यात आली आहे. या दरम्यान विरोधीपक्ष नेता देवेन्द्र फडणवीस यांनी जनतेला गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई मेट्रोच्या उद्घाटनही आज करण्यात येत आहे. तत्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मेट्रोच्या कामावरून त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला. मेट्रो 3 आतापर्यंत सुरू झाली असती. मात्र, त्याला सुरू होण्यासाठी अजून 4 वर्ष लागतील. त्यामुळे रखडलेल्या कामाला सुद्घा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले.
[read_also content=”वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विठुरायाचं थेट दर्शन आजपासून सुरु https://www.navarashtra.com/latest-news/good-news-for-warakaris-direct-darshan-of-vithuraya-starts-from-today-nrps-263107.html”]