सदावर्तेंचा हायकोर्टात युक्तिवाद काय? (फोटो- ani)
आंदोलकांना हायकोर्टाने सुनावले
गुणरत्न सदावर्ते यांचा हायकोर्टात मोठा युक्तिवाद
उद्या दुपारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी
High Court On Manoj Jarange Patil: मुंबईत सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान त्यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. दरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला काही महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. तसेच आंदोलकांना देखील सुनावले आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी देखील कोर्टात मोठा युक्तिवाद केला आहे.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यासाठी परवानगी दिलेली नसताना त्यांनी आमरण उपोषण सुरू केला आहे. या संदर्भात 29 ऑगस्टला आझाद मैदान पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मागच्या वेळेचे आंदोलन मी केलेल्या तक्रारीमुळे वाशीतच अडवण्यात आले होते. राज्याचा मुख्यमंत्री मराठा समाजाचा नाही म्हणून हे सगळे घडवून आणले जात असल्याचा मोठा युक्तिवाद गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
अनेक ठिकाणी जनजीवन ठप्प झाले आहे. कोर्टाच्या आजूबाजूलाही आंदोलक आहेत. अनेक संवेदनशील ठिकाणी आंदोलन केले जात आहेत. याबाबतचे काही व्हिडिओ देखील न्यायमूर्तींसमोर सादर करण्यात आले.
हायकोर्टाने आंदोलकांना फटकारले
मुंबईत सुरू असलेले आंदोलन हाताबाहेर गेले आहे. पावसाची शक्यता असताना तुम्ही मुंबईत आलात. पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा. मुंबईकरांना नाहक त्रास होता कामा नये. तुम्ही आंदोलनासाठी देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणार का? असा सवाल हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारणा केली आहे. 5 हजारांपेक्षा जास्त असलेल्या आंदोलकांनी परत जावे असे पत्रक तुम्ही काढणार का? असा सवाल देखील हायकोर्टाने विचारला आहे.
मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका. ठाण्यातच रोखावे. आंदोलनाच्या विरोधात पण नियमांचे पालन करावे. सरकारने जबाबदाऱ्या
पूर्ण कराव्यात. शौचालये, पथदिवे, खाण्याची दुकाने बंद होती. आंदोलकांवर जरांगे पाटलांचेही नियंत्रण नाही. सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांचा अवधी हायकोर्टाने दिला आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?
महाधिवक्ता कोर्टात काय म्हणाले?
हायकोर्टाच्या आदेशांचे मनोज जरांगे पाटलांकडून उल्लंघन झाले आहे. आंदोलकांचे उद्देश अजून स्पष्ट होत नाहीये. आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू राहू शकत नाही. व्हीडिओद्वारे धमकावण्यात येत आहेत. असेच सुरू राहिले तर कायद्याचे राज्य राहू शकत नाही. या आंदोलनामुळे मुंबई खोळंबली आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत. सर्व नियमांचे पालन करण्याची हमी जरांगे पाटील यांनी दिली होती. मात्र आंदोलकांनी नियमांचे पालन केले नाही. पोलिस संयम बाळगून आहेत, बळाचा वापर केलेला नाही. तुम्ही निर्देश द्यावेत, त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू.