मुंबई : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. लातूर, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस हवामान विभागाने (Department Of Meteorology) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी जोर वाढणार आहे. मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात (Farmer In Trouble) सापडला आहे. मुंबई (Mumbai) आणि परिसरात चांगला पाऊस सुरु असला तरी लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
27 July, राज्यात ह्या 2,3 दिवसात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासहीत ?? पावसाची शक्यता.
इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाउस. ⛅?
मुंबई ठाणे भागात तीव्र हवामानाचे इशारे नाहीत…
-IMDFor detail info pl visit IMD websites
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 27, 2022
लातूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. चांभरगा गावाजवळील पूल, नरसिंगवाडी पाटी येथील पर्यायी पूल पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे उदगीरसह चामरगा, बावलगाव, जंगम वाडी, वेरूळसह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. संभाजीनगरमधील खुलताबाद तालुक्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कसाबखेडा गाव आणि परीसरात झालेल्या पूल वाहून गेल्याने तब्बल ६ गावांचा संपर्क तुटला आहे.