कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
चंद्रपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. अनेक नेतेमंडळींकडून पक्षबदल होताना दिसत आहे. त्यात आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. थेमस्कर यांनी राजीनामा दिल्याने चंद्रपूरच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाल्या आहेत.
हेदेखील वाचा : ‘आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला, सत्ता आल्यास मनोज जरांगे मुख्यमंत्री’; ‘या’ नेत्याची मोठी घोषणा
विधानसभा निवडणुकाजवळ येऊ लागल्याने राजकीय पक्षात अंतर्गत कलह अधिक वाढल्याचे समोर येत आहे. यापूर्वी ब्रह्मपुरी येथे एका कार्यक्रमात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने एक विशिष्ट समाजालाच निवडून आणण्याचे वक्तव्य केल्याने जिल्ह्यात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. आता ठेमस्कर यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केवळ पक्षात घराणेशाहीला चालना देत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते पक्षातील पदाधिकारी तसेच अल्पसंख्यांक समाजातील लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्याच परीवारातील सदस्यांना निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, पक्षात राहून अनेक आंदोलनात सहभाग घेतला. परंतु, काँग्रेस पक्ष काही दिवसांपासून सर्वधर्म समभावाला तिलांजली देत आहे. नुकत्याच पक्षाने विधानसभानिहाय इच्छूक उमेदवारांची यादी मागितली होती. त्यात ठेमस्कर यांच्यासह अनेकांनी अर्ज दाखल केले. परंतु वरिष्ठांकडून पदावरून काढून टाकण्याची अप्रत्यक्ष धमकी देण्यात आली.
अल्पसंख्यांक समाजावर अन्याय
राजीनामा देताना ठेमस्कर यांनी काँग्रेसच्या खासदारांवर थेट हल्ला चढवत केवळ त्यांच्या कुटुंबाचा, निवडक समाजातील लोकांना पक्षात प्रोत्साहन देत असल्याने काँग्रेसमध्ये महिला व अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
…म्हणून घेतली राजीनाम्याची भूमिका
कामगारांनी वारंवार विनंती करूनही त्यांच्या संस्थेतील योगदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठांकडून आत्मसन्मान दुखावल्याने राजीनाम्याची भूमिका घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश महिला अध्यक्ष संध्या सव्वालाखे तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महासचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे पाठविला असल्याची माहिती दिली.