विशाळगडावरील दर्ग्याला विरोध
दरम्यान आता विशाळगडच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून रस्त्यावर उतरले आहेत. विशाळगडावरील उरुसाला कायमस्वरूपी बंदी घाला अशी मागणी केली असून न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे.
ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला असून, अखेर कोर्टाच्या सूचनेनुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. गडावरील पुरातन वारसा जपण्यासाठी आणि कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.
गेल्या वर्षी १४ जुलै रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यातून विशाळगडाशेजारी दंगल झाली. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गडासह परिसरात संचारबंदी लागू केली होती. विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयाने पुरातत्त्व विभागाची सुनावणी घेऊन अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्याचे निर्देशित केले होते.
विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार गेल्या वर्षभरात वारंवार पुढे आली होती. या भागात असणारा दर्गा जुना असल्याने ते अतिक्रमण नाही, असे मुस्लीम संघटनांचे म्हणणे होते. अतिक्रमणासंबंधात गेल्या वर्षी १४ जुलैला ‘चलो विशाळगड’ अशी हाक शिवप्रेमींंना आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना देण्यात अाली होती. त्यानंतर विशाळगडाच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला हिंसक वळण लागले होते.
Vishalgad Curfew : शिवरायांचा हा किल्ला तब्बल सहा महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला; तहीही या असणार अटी
अतिक्रमणमुक्त विशाळगडाच्या मोहिमेला गेल्या वर्षी हिंसक वळण लागल्यानंतर आता विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. कोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद बराच जूना आहे.