हदगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाही तर होमगार्ड काम करत आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded Police : नांदेड : हदगाव पोलीस ठाण्याचे पद पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला. मात्र पोलिस ठाण्याचा कारभार एक होमगार्ड चालवत असल्याची माहिती आहे. याशिवाय पोलिस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे. मात्र सहायक पोलिस निरीक्षक संकेत दिघे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून सध्या संकेत दिघे काम पाहत आहेत. यापूर्वी ते मरखेल पोलिस ठाण्यात कार्यरत होते. मरखेल येथे असताना लाच स्वीकारण्याच्या आरोपाखाली लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. यात ते जवळपास तीन महिने निलंबित होते. तपासाअंती लाचलुचपतने त्यांना क्लीन चिट दिल्याने ते पोलिस सेवेत पुन्हा रुजू झाले. रुजू होताच त्यांना हदगाव पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला, दुसरीकडे नियंत्रण कक्षात अनेक पोलिस निरीक्षक असताना दिघे यांच्यावर वरिष्ठांनी मर्जी दाखविण्याचे कारण काय? असे खुद्द पोलिस अधिकारीच खाजगीत बोलताना विचारतात. एखाद्या गंभीर प्रकरणातील अधिकाऱ्याला लगेच पोलिस ठाणे असे असलेले ‘संकेत’ दुर्लक्षित करण्यात आले.
हे देखील वाचा : सरकारी जमीन खाऊनही FIR मध्ये नाव नाही; पार्थ पवारांवर अंजली दमानियांचा चढला पारा
सी.सी.टीव्ही तपासा, होमगार्डचा वावर दिसेल
संकेत दिघे यांनी दिलेल्या संधीचे सोने करण्याऐवजी मनमानी पद्धतीने कारभार सुरू केल्याचा आरोप होत आहे. ठाण्यात आलेल्या फिर्यादीचा अपमान करणे, उलट अवैध व्यावसायिकांना चांगली वागणूक देणे, असा आरोप त्यांच्यावर आहे. निवघा पोलिस चौकीअंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहेत. मुळात नांदेडपासून जवळपास ६० किलोमीटर अंतरावर हदगाव आहे. यातील निवघा चौकी मालदार म्हणून ओळखली जाते. या भागातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न आहेत. बागायती भाग आहे. अवैध व्यवसाय ह्या भागात सुरू असल्याचा आरोप आहे. दरम्यान, पोलिस ठाण्याचा कारभार व्यवस्थित चालावा, म्हणून पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी योग्य ते मनुष्यबळ हदगाव येथे दिले, मात्र चार अक्षरी आडनावाचा होमगार्ड संपूर्ण ठाण्याचा कारभार चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे. दिघे यांच्या खास मर्जीतील म्हणून होमगार्ड यांची ओळख आहे. तपास डायरी लिहिणे, तक्रारी घेणे, अवैध व्यवसायाची वसुली करणे, पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कामे सांगणे ही कामे होमगार्ड करतो. होमगार्डचा पोलिस ठाण्यातील वावर सीसी टीटीव्ही तपासल्यावर निष्पन्न होतील, असे अनेकांचे म्हणणं आहे.
संकेत दिघे यांच्याशी झालेला संवाद
प्रश्नः हदगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे.
उत्तर: असे काही प्रकार नाहीत…. मला दाखवा कुठे सुरू आहेत अवैव व्यवसाय….? १०० टक्के कारवाई करतो…
प्रश्नः पोलिस ठाण्यात येणाऱ्या फिर्यादीला अपमानास्पद वागणूक दिली जाते आणि अवैध व्यवसाय, आरोपींना चांगली. हे खरे आहे काय?
उत्तरः असे होणार नाही नाही.. एखादे उदाहरण असेल तर सांगा..
प्रश्न : हदगाव पोलिस स्टेशनचे पद पोलि निरीक्षक पदाचे आहे, आपण सहाय्यक पोलि निरीक्षक आहात, हे कसे?
उत्तर: पोलिस अधीक्षक साहेबांनी आदेश दिला काम करण्याची माझी तयारी आहे, त्यांच आदेशानुसारच काम करीत आहे.
प्रश्न: हदगाव पोलिस ठाण्याचा कारभार चार अक्ष आडनावाचा होमगार्ड चालवतो, असा आरोप आ
हे खरे आहे काय?
उत्तर: हदगाव पोलिस ठाण्याचा कारभार कायद्यान चालतो. असा काही प्रकार नाही..
हे देखील वाचा : शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सोहळा; मात्र भाजपचाही मुंबई पालिकेवर खास डोळा
जागा बदलून सुरू असतात क्लब !
निवधा बाजार, तळणी येथे जागा बदलून क्लब सुरू असतात. मोबाईलवर मटका सुरू आहे. निवधा – हदगाव, निवधा – आखाडा बाळापूर, निवधा तळणी मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक बिनदिक्कपणे सुरू आहे. निवधा येथून शिरड, बोरगाव यासह अन्य ठिकाणी अवैध दारू विक्री केली जाते. पैनगंगा, कयादु नदीतून अवैध वाळू उपसा सुरू आहे. याशिवाय निवधा येथे वेश्याव्यवसाय जोरात सुरू आहे. चंद्रपूर, नागपूर, मुंबई, अहिल्यानगर, तेलंगणा आदी भागातून मुली, युवती, महिला ह्या व्यवसायासाठी निध्यात आल्या आहेत.






