विजयकुमार कांबळे, चंदगड : सद्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत.मात्र यावर्षी लग्नाचे मुहूर्त कमी प्रमाणात असल्यामुळे वधूच्या (मुलींच्या ) शोधात मुलाकडील मंडळी आहेत. मुली शोधताना सर्वांचीच धावपळ होत आहे. प्रत्येक जण आपल्या मुला-मुंलीचे ‘अवंदा लगीन करायचेच’ म्हणून मुंलीच्या शोधात आहेत. अनेक गावा-गावात जाऊन पाव्हणं……गावात कुणाची मुलगी द्यायची हाय… काय……..?अशी विचारणा केली जात आहे. मुली हाईत खरं लयी शिकलेल्या हाईत. त्यांना मिलेट्रीवाला किंवा मुंबईत सरकारी नोकरीला असलेला नवरा मुलगा पाहिजेत. आणि तेथे स्वता:ची रुम पाहिजेत.अशी आई- बाबांची मोठी अपेक्षा हाय.पाव्हणं तुम्ही त्यांच्या घरी जाऊन विचारून बघा त्यांना. असाच सल्ला दिला जातो.
मुलीच्या घरी गेल्यानंतर मात्र आई -बाबांचा भाव भलताच वधारलेला दिसतोय. मुली बघताना मात्र आई-वडील, नातेवाईक,मित्र मंडळींची भलतीच तारांबळ होताना दिसते. मुलाला नवरी मिळेना, मुहूर्त मात्र सापडेना. अशी विचित्र अवस्था पहायला मिळते.मुला -मुलींच्या पत्रिका बघण्यासाठी भटजीच्या घराचा उंबरठा ओलांडून जाण्याची वेळ आई, वडील आणि नातेवाईकांच्यावर आली आहे.मात्र सुनबाई माझ्या घरचा उंबरठा कधी ओलांडून येणार? याचीच चिंता करत बसण्याची वेळ आई-बाबांच्यावरआली आहे.
अलीकडच्या काळात कोण कुणाला जुमानत नाहीत… म्हणूनच मुलींच्या पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुर्वीच्या काळी थोरा-मोठ्यांचा आदर होता.माणसं एकमेकांच्या शब्दाला मान-सन्मान देत असत. मनात आदराची भावना आणि तितकिच भिती ही होती. मात्र आज लहान मुले मुली सुद्धा कुणाचेही ऐकत नाहीत.त्यामुळे मुलं-मुली पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.पाहुणे आणि नवरा मुलगा आला, त्यांनी तीला बघीतले,नावरस जुळून आले. सर्वच काही ठरल्याप्रमाणे गोष्टी केल्या.उपस्थित पाहुणे मंडळी नी यांचा मुलगा…. त्यांच्या मुलाला दिली. असे गावकरी पंचासमोर तसेच चारचौघात जाहिर करण्यात आले.आणि मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाला. उपस्थित पाहुणे मंडळी नी मुलीसह आपलेही तोंड गोड केले.
लग्नाची तारीख, वेळ, विवाह स्थळ, आमचेही आग्रहाचे निमंत्रण. कै….यांची नातं, यांची..कन्या… मुलीचा मामा….काका अशी सगळ्यांच पै.पाहुणे, आमदार – खासदार आदीची नावे घालून महागडी लग्नं पत्रिका काढली. आमच्या ताईच्या,माईच्या, मावशीच्या लग्नाला यायचं ह…! अशी छोट्या निमंत्रक मंडळीनी विनंती केली. मात्र नवरी मुलगी लग्नाच्या आदल्याच दिवशी दुस-या मुलांबरोबर पळून गेल्याने सर्वांनाच मानखाली घालण्याची वेळ आली आहे.
अनेक गावांमध्ये मुलांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येते.अनेक तरुण विविध कारणांमुळे आपले लग्न पुढच्या वर्षी करुयात असे म्हणत वय वाढत चालले. आणि आज ३० ते ३२ वर्षे झाली तरी जुळेना…..मग या तरूणाने करायचे तरी काय….? असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
तालुक्यात एजंटांचा सुळसुळाट
वधू आणि वरांच्या गरीब श्रीमंतीकडे बघून वधू-वर सुचक (एजंट ) मंडळी काम करत आहेत.मुलींचे फोटो दाखवितो,बायोडाटा आणि सर्व माहिती सांगतो खरं पहिल्यांदा एक हजार ते दोन हजार रुपये द्या. आणि लग्न ठरविल्यानंतर दहा हजार आणि त्यापुढे रक्कम द्यावी लागेल, असे बीन दख्खतपणे न भाड-भिडाठेवता एजंटा कडून मागणी केली जाते. त्यामुळे जशी माणसं तशी मागणी…असेच चित्र पहायला मिळत आहे. तालुक्यात मात्र अशा एजंटांचा सुळसुळाट वाढला असून मुलींच्या पेक्षा एंजटांचीच मनधरणी करण्याची वेळ मुला-मुलींच्या आई-बाबावर आली आहे.
लग्नाची तारीख, वेळ, विवाह स्थळ, आमचेही आग्रहाचे निमंत्रण. कै….यांची नातं, यांची..कन्या… मुलीचा मामा….काका अशी सगळ्यांच पै.पाहुणे, आमदार -खासदार आदीची नावे घालून महागडी लग्नं पत्रिका काढली. आमच्या ताईच्या, माईच्या, मावशीच्या लग्नाला यायचं ह…! अशी छोट्या निमंत्रक मंडळीनी विनंती केली. मात्र नवरी मुलगी लग्नाच्या आदल्याच दिवशी दुसऱ्या मुलांबरोबर पळून गेल्याने सर्वांनाच मानखाली घालण्याची वेळ आली आहे.