नाशिक : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जेव्हापासून शिवसेनेत म्हणजे ठाकरे गटात (Thackeray Group) प्रवेश केला आहे, तेव्हापासून त्या खूपच आक्रमक होत विरोधकांचा समाचार घेताना दिसत आहेत. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण खूप गाजले. यानंतर त्या सतत माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडताना दिसत आहेत, व विरोधकांवर प्रहार करताना दिसत आहेत. दरम्यान, उपनेत्या सुषमा अंधारे आज नाशिकमध्ये कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नाशिकमध्ये होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, आपण नाराज आमदार सुहास कांदेंची (Suhas Kande) भेट घेणार असल्याचं सांगितले.
[read_also content=”हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये पर्यटकांना मिळणार १६० वर्षे जुन्या वास्तूला भेट देण्याची संधी – मंगलप्रभात लोढा https://www.navarashtra.com/maharashtra/tourists-will-get-a-chance-to-visit-architecture-at-hafkin-institute-mangalprabhat-lodha-348854.html”]
आपण सर्व एका पक्षाचे एका कुटंबासारखे असतो, परंतु जर एक कुटुंब आहे, तर कुटुंबामध्ये काय केलं, काय नाही केलं आणि काय चुकलं हे विचारण्याचा अधिकार बहिणीला असतो. त्यामुळं मी बहिणीच्या नात्याने सुहास कांदेंची मी भेट घेणार आहे, सुहास कांदे हे मला भाऊ आहेत. म्हणून बहीण म्हणून त्यांना प्रश्न विचारणार असल्याचे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
एकेकाळी शिवरायांचा बाळासाहेबांचा वारसा सांगणारे आमचे भाऊ आता भाजपाच्या वळचणीला गेल्यानंतर त्यांचा स्वभाव बदललेला आहे. त्यामुळं दादा भुसे, सुहास भाऊ, हेमंत गोडसे हे सगळे भाऊ आहेत. या सगळ्या भावांना भेटणार आहे. कुटुंबात काय चुकलं हे विचारणार आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. नाशिक, मालेगाव, नांदगाव या भागामध्ये महाप्रबोधनच्या सभा होणार आहेत.






