पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्या देशात केंद्राची हुकूमशाही चालू आहे, असं विधान केले होते. पवारांच्या या विधानावर भाजपचे नेते गिरीष बापट यांनी उत्तर दिले आहे. पवारांच्या बोलण्यावर दिल्लीत राजकारण चालत नाही, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.
खासदार गिरीश बापट यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांची विविध समस्या विषयी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. बापट म्हणाले की, मी दोन महिन्यांनी आयुक्तांची भेट घेत असतो. खडकीमध्ये मेट्रोचे काम थांबले आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आलो होतो असे ते म्हणाले. जागा निश्चित झाली असून, त्याचा मोबदला देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारकडे महापालिकेचे काही प्रस्ताव आहेत. जसे की, अमृत महोत्सव, जायका ते सर्व हळू हळू मार्गी लागतील. पुणे एअरपोर्टमध्ये जो रस्ता होता तो आता महापालिकेकडे आला आहे. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, असे गिरीश बापट म्हणाले.
[read_also content=”ना ओळख ना वाद, फक्त दहशतीसाठी मारहाण; केळकर रस्त्यावरील मारहाणीचे सत्य https://www.navarashtra.com/maharashtra/neither-recognition-nor-argument-only-beatings-for-terror-the-truth-about-the-beating-on-kelkar-road-nrdm-304654.html”]