फोटो सौजन्य - सोशल मिडीया
काही दिवसांपूर्वी पुण्यात एका डॉक्टर आणि मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता ही संख्या ६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत पुण्यातील ६ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये दोन गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. झिका व्हायरस बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या घनेनंतर आता पुणे आरोग्य विभाग आणि पुणे महापालिका सतर्क झाली आहे. पुण्यातील एरंडवणे या भागात २८ वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाली आहे. या महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आली आहे. तसेच याआधी एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाली होती. सध्या या दोन्ही गरोदर महिलांची प्रकृती स्थिर आहे.
पुण्यात झिका व्हायरस वेगानं पसरत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याबाबत महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश दिघे सांगितलं आहे की, पुण्यातील झिका व्हायरस बाधितांची संख्या ६ वर पोहोचली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेनंतर पुणे आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासननं सतर्क झाली असून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. ३५ वर्षीय गर्भवती महिलेचे नमुने २७ जून रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले होते. एनआयव्हीने सादर केलेल्या अहवालात या महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान केले. सहा महिन्यांची गरोदर असलेल्या २८ वर्षीय महिलेची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्यातील झिका व्हायरसचा पहिला रुग्ण एरंडवणे परिसरात आढळला. एरंडवणे परिसरात एका ४६ वर्षीय डॉक्टरला झिका व्हायरसचा संसर्ग झाला होता. डॉक्टरच्या १५ वर्षीय मुलीलाही झिकाची लागण झाली होती. त्यानंतर मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात झिका व्हायरसचे २ रुग्ण आढळले होते. त्यानंतर एक ४७ वर्षीय महिला आणि एका २२ वर्षीय व्यक्तिला झिका व्हायरसचे निदान झाले होते.