फोटो सौजन्य - Social Media
छत्रपती संभाजी नगर येथील आमखास मैदानावर जागतिक दर्जाचे फुटबॉल स्टेडियम तयार करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. याच संदर्भात, मंत्रालयामध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत क्रीडा मंत्री संजय बनसोडेदेखील उपस्थित होते. या बैठकीत स्टेडियम बांधणी संदर्भात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. निष्कर्षि, छत्रपती संभाजी नगर येथे स्थित असलेल्या वक्फ बोर्डाच्या मालकीच्या आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबाँल स्टेडियम बांधणीला सर्वसहमतीने मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांनी क्रिडा विभागास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत स्टेडियम संदर्भात अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजी नगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम तयार करणे तसेच गोरखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक घेण्यात आली होती. खेळाडूंना राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर यश साध्य करता यावे म्हणून प्रशासन सर्व साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे म्हणणे आहे.
हे सुद्धा वाचा : सेल्फीच्या नादात पडली १०० फूट खोल दरीत; रेस्क्यू ऑपरेशनचे व्हिडीओ व्हायरल
यादरम्यान पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले कि,” छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील खेळाडूंना क्रीडा संदर्भातील सर्व सोयी -सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम संदर्भातील प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांनी क्रीडा विभागास सादर करावा. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना यश मिळविता यावे, यासाठी सर्व साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.