'आता बाहेर बोलायचीही चोरी'; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटली असं का म्हणाले?
मुंबई: भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय नेता पैसे वाटताना सापडतो यावरूनच सिद्ध होते की भाजप या निवडणुकीत काय करत आहे. आज भाजप महाराष्ट्राला खरेदी करायला निघाला आहे. पण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. तो विकला जाणार नाही, 23 तारखेला मतमोजणी झाल्यावर कळेल की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. स्वाभिमान जपणार महाराष्ट्र आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे.
आज सकाळी जयंत पाटील यांनी त्यांच्या इस्लामपूरच्या साखराळे मतदारसंघात मतदानचा ह्क्क बजावला. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केलं. जयंत पाटील म्हणाले की, इस्लामपूर मतदारसंघाने मला आजपर्यंत भरघोस मतांनी निवडून दिले आहे. यावेळीही मोठ्या मताधिक्याने मला निवडून देतील. इतकेच नव्हे तर,संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे मतदार मोठ्या संख्येने निवडून येतील. राज्यात बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Suhas Kande: ‘आज तुझा मर्डर फिक्स…’, सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी
काल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरारमध्ये पैशांसह पकडण्यात आले, ते पाहून देशभरात खळबळ माजली होती. ही खळबळ थांबवण्यासाठी सुप्रियाताईंचा ऑडिओ क्लिपचे षडयंत्र रचण्यात आले. पण लोकांनी भाजपला ओळखले आहे. भाजप हा खोटं बोलणारा आणि इतरांचे पक्ष फोडणारा पक्ष आहे. भाजपचे लोक असे वागतात हे दुर्दैवी आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप काय करते हे विरारमध्ये काल झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण राज्यातील जनतेला कळले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. विनोद तावडे हे एका पिशवीत पैसे घेऊन तेथील लोकांना बोलावून पैसे वाटून घेत होते. ही बातमी जनतेला समजताच मोठा गोंधळ उडाला. विनोद तावडेंचे पैसे घेऊन अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. महाराष्ट्रात मतदान होण्याआधीच भाजपचे नेते पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.