Vadgaon News : मूलभूत सुविधांसाठी वडगावमधील नंदीवाले समाजाचा लढा; आधार, रेशन, मतदान हक्कांपासून वंचित (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
हे देखील वाचा : PM Kisan Yojana: पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार? ‘ही’ ३ महत्त्वाची कामे पूर्ण नसतील तर अडकणार २ हजार रुपये?
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेली सोळा वर्षांपासून वडगांव ता. खंडाळा येथे नंदीवाले समाजातील ९ कुटुंबे मोलमजूरी करून, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. परंतु तालुक्यातील वडगावमध्ये सोळा वर्षे वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबातील नागरिकांना आधार कार्ड,रेशनिंग कार्ड, मिळाले नसून मतदार यादीमध्ये नावनोंदणी करून न घेतल्यामूळे मतदानाच्या राष्ट्रीय हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. सदर कागदपत्रांसाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी अशा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सतत विनंती करून ही या नागरिकांना कागदपत्रांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे.
यामुळे या कुटुंबातील मुलांना जातीचे दाखले मिळत नसल्यामुळे शैक्षणिक सुविधांपासून पर्यायाने नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे.अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कागदपत्रे न दिल्यामूळे या कुटुंबांना घरकुल योजना,सुविध मिळत नाही.त्यामूळे गेली १६ वर्षांपासून ही कुटुंबे गायरान जागेत कुडाच्या छपरामध्ये आपल्या लहान मुलांसह राहतात. तसेच वंचित भटक्या नंदीवाले समाज बांधवांना घरासाठी राहत असलेली जागा उपलब्ध करून मिळावी अशी मागणीही निवेदनाव्दारे केली आहे.
हे देखील वाचा : Satara news : शाहू कलामंदिर की ठेकेदारांचा अड्डा? लाखो खर्चूनही सुविधा गायब? मनुष्यबळ व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह






