इराण सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेईच्या हत्येमुळे रमजानवर शोककळा पसरली (फोटो - AI)
काश्मीरमधील निदर्शनांचे कारण म्हणजे खामेनेई हे अत्यंत लोकप्रिय पॅलेस्टिनी समर्थक नेते म्हणून ओळखले जात होते. त्याचबरोबर शिया मुस्लिमांना खामेनींबद्दल तीव्र सहानुभूती होती. खामेनी काश्मीरच्या शिया मुस्लिमांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते आणि म्हणूनच लोक त्यांच्या मृत्युवर शोक व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि बंगलौरमध्ये देखील ही निदर्शन दिसून येत आहेत. श्रीनगरमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले असून अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
हे देखील वाचा : Iran Israel वादाचे भारतात पडसाद; खामेनेईच्या मृत्यूनंतर शेकडो शिया मुस्लीम रस्त्यावर, श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शने
सध्या रमजानचा महिना सुरु आहे. मुस्लिम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा काळ मानला जातो. येत्या 20 मार्चला रमजान ईद देखील आहे. मात्र सर्वोच्च नेते अली खामेनेई यांची हत्या करण्यात आल्यामुळे रमजानवर शोककळा पसरली आहे. यामुळे शिया मुस्लीम बांधवांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी शिया मुस्लीमांनी माचम केला. तसेच अली खामेनेई अमर रहे अशा घोषणा देखील दिल्या आहेत.
पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या दुतावासाची तोडफोड
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचे सर्वात भीषण पडसाद शेजारील देश पाकिस्तानमध्ये उमटले आहेत. कराची शहरात रविवारी संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. खामेनी यांच्या हत्येला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप करत हजारो आंदोलकांनी कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाला (US Consulate) लक्ष केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, पोलीस आणि आंदोलकांमधील चकमकीत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी






