कचऱ्याच्या वासाने पर्यटक हैराण झाले आहेत. रस्त्यावरील हे कचऱ्याचे ढीग जर महापूर आल्यावर घराघरात जातात प्रती वर्षीच्या या समस्येकडे प्रशासनाकडून मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.शिवाजी पुलापासूनच या राष्ट्रीय महामार्गाला घरघर लागली आहे. पुलापासून पन्हाळ्याकडे येताना आंबेवाडी फाट्यावरुन कोल्हापूरकडे जाताना महामार्गाच्या उजव्या बाजूला यावे लागते.तिथे वाहनांची कोंडी होते. जोतिबा देवदर्शनासाठी जाताना महामार्गाच्या उजव्या बाजूला वळून जोतिबावर जावे लागते.
याठिकाणी येणारी व जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक कोंडी व अपघात होतात. कोतोली फाट्यावर कोल्हापूरकडे जाताना महामार्गाच्या डाव्या बाजूला यावे लागते. याठिकाणी पन्हाळ्याकडुन वेगाने वाहने येतात. या सर्वच ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी होत आहे.
या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास जिवघेणा ठरत आहे. 1996 पासून कोकणाला जोडणारा रस्ता म्हणजे कोल्हापूर-रत्नागिरी राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला. तरी समस्त कोल्हापूरकर याला रूढीने कोल्हापूर-पन्हाळा मार्ग असेच म्हणतात राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून याची वेळोवेळी दुरुस्ती केली, रस्त्याच्या कडेच्या बाजू अस्तित्वात ठेवल्या नाहीत. फळांचे रस विक्रेते आणि खेळणी विक्रेते ठाण मांडून बसलेले असल्याने वाहन चालकांचे लक्ष विचलित होत आहे.
शिवाजी पुल ते वाघबीळ घाटाच्या सुरवतीपर्यंत कचऱ्याचे साम्राज्य वाढते आहे. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने एकूणच या महामार्गावरील वाहतूक सध्या धोकादायक झाली आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली वाघबीळ घाटात वाहन चालक कसरत करत वाहने चालवत आहेत.
वारंवार होणारी रस्त्याच्याकडेची यंत्रणेला पत्र व्यवहार सुरू आहे. महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत सिग्नल यंत्रणा बसवता येणार नाही. पण, पोलिस यंत्रणेद्वारे लवकरच महामार्गावर येणा-या वाहनांना रमलर स्टिकद्वारे वाहनांची वेग मर्यादा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलिस उपअधीक्षक, पन्हाळा, शाहुवाडी आप्पासाहेब पवार यांनी सांगितलं.






