पुणे : पुण्यात ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ म्हणून सिंहगड किल्ला (Sinhgad Fort) प्रसिद्ध आहे. पुण्यापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढताना दिसत आहे. पण आता या गडावर जाताना तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. याच दिवसांत अनेक पर्यटक सिंहगडावर ट्रेकिंग किंवा फिरण्याचा आनंद लुटतात. त्याची संख्याही जास्त आहे. मात्र, आता सिंहगडावर जाताना विशेष लक्ष देऊन जावे लागणार आहे. कारण सिंहगडाच्या घेऱ्यात बिबट्या आणि बछड्याचे दर्शन झाले आहे. बिबट्या अचानक दिसल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
घेरा सिंहगड गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला आहे. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये याबाबत नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, पावसाळ्यात सिंहगडावर येणाऱ्यांची संख्या मोठी असते. असे असताना नेमकं याच दिवसांत बिबट्या आणि त्याचा बछडा दिसल्यानंतर नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले आहे.