Photo Credit- Social Media महाविकास आघाडीच्या नेत्यांचा शपथविधीवर बहिष्कार
मुंबई: “ईव्हीएममुळे लोकशाहीची हत्या होत असल्याने आजच्या आमदारांच्या शपथविधीवर आम्ही बहिष्कार टाकला. आम्हाला ईव्हीएमबाबत शंका आहेत. हा महाराष्ट्रातील जनतेचा जनादेश नाही. हा ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाचा आदेश आहे, त्यामुळे उद्धव गटाचे आमदार आज शपथ घेणार नाहीत. जनादेश असता तर लोकांनी आनंद साजरा केला असता, पण जनतेने कोणताही जल्लोषही केला नाही, लोकांच्या मनात शंका असल्याने आम्ही शपथ घेणार नाही, ” अशी प्रतिक्रीया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला सर्वाधिक 230 जागांवर विजय मिळाला. पण निकालाच्या दिवसापासून विरोधीपक्षनेत्यासह देशभरातील राजकीय विश्लेषकांनीही या निकालावर संशय घेण्यास सुरूवात केली. विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांकडून इव्हीएममध्येच घोळ असल्याचा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडताना दिसत आहेत. अशातच आजपासून महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे.
Karad Accident News: ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह एनडीएच्या अनेक सदस्यांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. मात्र महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात निकाल जाहीर झाल्यापासून विरोधी महाविकास आघाडी ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत आहे. अनेक जागांवर मतमोजणी मतदानापेक्षा जास्त झाली असून अनेक जागांवर मतदानापेक्षा कमी मतमोजणी झाल्याचा त्यांचा दावा आहे. अनेक उमेदवार फेरमतमोजणी करण्याची मागणीही करत आहेत.
दुसरीकडे आज शिवसेना-यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या सभेसाठी नाना पटोले मातोश्रीवर पोहोचले आहेत. या बैठकीत ईव्हीएमद्वारे मतदानाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. विशेषत: मारकडवाडी गावातील वातावरणावर विरोधक आपली भूमिका घेणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, निकालाने प्रश्न निर्माण केले आहेत. संपूर्ण प्रक्रियाच भ्रष्ट असल्याचे दिसते. जनता नाखूष आहे आणि काहीतरी चुकले आहे असे दिसते. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हंगामी सभापती कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी अधिवेशनापूर्वी भाजप नेते कोळंबकर यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली.
महाविकास आघाडीला मोठा झटका! मविआतून बाहेर पडण्याचा समाजवादी पक्षाचा
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “असे आरोप करण्यात काही अर्थ नाही. विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे जावे आणि तेथेही न्याय न मिळाल्यास न्यायालयात जावे. विरोधक आज सभागृहावर बहिष्कार का घालत आहेत, हेच कळत नाही. लोकांनी मतदान करून निर्णय घेतला आहे. आता बाहेर पडण्यात काही अर्थ नाही.”