• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mahadevi Madhuri Elephant Return In Nandani Math Vantara Ambani Kolhapur News

Mahadevi Elephant: कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश! वनताराने टेकले गुडघे; ‘माधुरी’ लवकरच नांदणी मठात परतणार

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीच्या  जिनसेन मठातील आठ दिवसापूर्वी अंबानींच्या गुजरात वनतारामध्ये माधुरी उर्फ महादेवी हत्तीण्णीला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाठविण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2025 | 09:56 PM
Mahadevi Elephant: कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश! वनताराने टेकले गुडघे; ‘माधुरी’ लवकरच नांदणी मठात परतणार

'माधुरी' लवकरच नांदणी मठात येणार (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
कोल्हापूर:  कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीच्या  जिनसेन मठातील आठ दिवसापूर्वी अंबानींच्या गुजरात वनतारामध्ये माधुरी उर्फ महादेवी हत्तीण्णीला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाठविण्यात आले होते. माधुरीने निरोप घेतला त्यादिवशी हत्तीणीसह अखंड कोल्हापूरकरांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा पहायला मिळाल्या. यानंतर हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी कंबर कसली तब्बल ४५ किलोमिटरची आत्मक्लेश पदयात्रा काढली अन् याची दखल प्रत्यक्ष वनताराला मराठीमध्ये घ्यावी लागली. कोल्हापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अप्रत्यक्ष भाषाभिमानाच्या विजयाची घटना ठरली. बुधवारी वनतारा प्रशासनाच्या टिमने नांदणी मठाच्या महाराजांसह प्रसार माध्यमांशी बोलताना माधुरीला लवकरच नांदणीला परत देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नांदणीची माधुरी पुन्हा दिमाखात नांदणी मठात सर्वांनाच पहावयास मिळणार आहे. एकंदरीत माधुरी हत्तीणीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात कोल्हापूर आणि नांदणी येथील नागरिक, तसेच विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक आणि शांततामय या दोन्ही घटना लक्षात घेता, आंदोलने, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात जिओ बॉयकॉट आणि माधुरी कम बँकचा नारा दिला. तसेच गावागावात प्रशासनाला निवेदने देऊन सरकारवर दबाव आणून वनतारावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

mahadevi elephant : महादेवी हत्तीणचं काय होणार? सरकारच्या याचिकेनंतर वनताराचाही मोठा निर्णय

या पार्श्वभूमीवर वनताराने आपले सर्व व्हीडिओ आणि पत्र अधिकृत निवेदनही मराठीत प्रसिद्ध करून जनतेच्या भावनांचा आदर केला. सोशल मिडियावर अद्यापही याचा ट्रेंड सुरू आहे. मागील  आठ दिवसांत वनताराकडून जवळपास तीन निवेदने आणि तीन व्हिडीओ सादर करून माधुरीची पूर्ण देखभाल करण्यासाठी तिला मराठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. माधुरी किती चांगली आहे. तीला आम्ही काय खायला देतो. तिचे दिवसभराचे कसे नियोजन असते. यासह वनतारा ही प्राण्यांसाठी कसे काम करत आहे. असे अनेक मराठी व्हिडीओ सादर करून आपण किती चांगले आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजासह सर्व धर्मीयांतून भावना तीव्र होत माधुरी नांदणीला परत आणायचीच तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला जात होता.
 वनताराची टीम बुधवारी कोल्हापुरात दाखल
माधुरी हत्तीणीबाबत राज्यभर पडसाद उमटू लागल्यानंतर वनतारा हत्ती संवर्धन केंद्राने याची गांभीर्याने दखल घेऊन कोल्हापुरात चर्चेसाठी आले. यामध्ये वनतारा सीईओ विहान करणी  यांचे शिष्टमंडळ कोल्हापुरला भेट देऊन हत्तीला परत नांदणीत सोडण्यासाठी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करून त्यामध्ये आपली भूमिका सकारात्मक देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आता लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
 आत्मक्लेश पदयात्रेनंतर प्रशासन आणखी गतीमान
 माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात नांदणी मठ ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असा ४५ किमीचा विराट मुक निषेध मोर्चा काढण्यात आला. त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधुरी हत्तीबाबत आपण मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे सांगितले. यानंतर वनतारानेही मराठीमध्ये निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाला पूर्ण पाठींबा दिला. कोल्हापूरकरांनी उभारलेल्या लोकचळवळीला काही अंशी यश मिळत असले तरी माधुरीहत्तीण्णी परत येईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे. मंगळवारी मंत्रालयात बैठक झाल्यानंतर बुधवारी वनताराच्या टिमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. माधुरी नांदणी मठाला परत देण्यासाठी वनतारा ने संमती दर्शवली त्यानुसार वनताराचे सीईओ ने नांदणी मठाच्या महाराजांची भेट घेतली. आणि वनताराची सकारात्मक भूमिका मांडली.

Mahadevi Elephant: ‘माधुरी’ परत येणार? वनताराने भेट घेताच CM फडणवीस म्हणाले, “… त्यांनी आश्वस्त केले आहे”

वनताराचा जाहीर माफीनामा

नांदणीचा जैन मठ आणि कोल्हापूरमधल्या लोकांच्या आम्ही मनापासून आदर करतो. माधुरीशी असलेले सर्व  समुदायाचे  खास आणि प्रेमळ नाते वनताराला पूर्णपणे समजते आणि त्याचा वनतारा मनापासून सन्मान करतो. वनताराची भूमिका केवळ  सर्वोच्च न्यायालय आणि  मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माधुरीची काळजी घेण्यापुरती मर्यादित होती. स्थानांतरचा निर्णय आम्ही घेतलेला नाही, किंवा सुचवलेला नाही. कोल्हापूरकरांच्या भावना आम्हाला समजतात आणि आम्ही त्या मानतो. आमचा सहभाग न्यायालयीन आदेशापुरता मर्यादित असूनही, जर आमच्या कृतीमुळे कोणाला दुःख झाले असेल, तर आम्ही मनापासून क्षमा मागतो. मिच्छामी दुक्कडम. असे पत्र मराठीमध्ये सादर केले आहे. यामुळे कोल्हापूरकरांसह माधुरी हत्तीणीला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याला आता यश आले आहे.

Web Title: Mahadevi madhuri elephant return in nandani math vantara ambani kolhapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 09:56 PM

Topics:  

  • kolhapur
  • Madhuri Elephant
  • Mahadevi Elephant
  • vantara

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
1

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

“मराठ्यांचे भवन दिल्लीत व्हावे…; अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळाव्यात खासदार छत्रपती शाहू महाराजांचे प्रतिपादन
2

“मराठ्यांचे भवन दिल्लीत व्हावे…; अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळाव्यात खासदार छत्रपती शाहू महाराजांचे प्रतिपादन

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; ‘या’ तारखेपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश
3

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; ‘या’ तारखेपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भिकाऱ्यांची दादागिरी; भाविकांना सहन करावा लागतोय त्रास
4

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भिकाऱ्यांची दादागिरी; भाविकांना सहन करावा लागतोय त्रास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार;  १४ ते १५ बदलांची चर्चा

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार; १४ ते १५ बदलांची चर्चा

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

IND vs WI: कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजाचे स्वप्नं राहिले अपूर्ण, नाहीतर केला असता ‘हा’ रेकॉर्ड

IND vs WI: कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजाचे स्वप्नं राहिले अपूर्ण, नाहीतर केला असता ‘हा’ रेकॉर्ड

व्हिडिओ

पुढे बघा
RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.