भारतामधील सर्वांत मोठ्या शहर गॅस वितरण (सीजीडी) कंपन्यांपैकी एक असणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने ‘एमजीएल पीएनजी खुशियां लाखों की’ ही विशेष ऑफर 15 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर 2024 या दरम्यान एमजीएल पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) कनेक्शनसाठी नोंदणी करणाऱ्या गॅसिफाइड इमारतींमधील नवीन ग्राहकांसाठी सुरु केली आहे.
ही ऑफर गॅस बसवलेल्या इमारतींमधील सर्व नवीन पीएनजी नोंदण्यांवर लागू आहे व बक्षिसे लकी ड्रॉच्या आधारे ₹१,००० पासून ₹१,००,००० च्या भव्य बक्षिसापर्यंत मिळू शकतात. एकूण २,१७२ विजेते पात्र प्रवेशांमधून निवडले जातील. लकी ड्रॉ ०७ जानेवारी २०२५ रोजी काढला जाईल. यामध्ये रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
बक्षिसाची रक्कम आणि विजेत्यांची संख्या
₹1,00,000 – 2 विजेते
₹50,000- 10 विजेते
₹25,000 – 20 विजेते
₹10,000- 40 विजेते
₹5,000- 100 विजेते
₹1,000- 2,000 विजेते
लकी ड्रॉ वेबकास्ट
लकी ड्रॉ वेबकास्ट लाइव्ह असेल ज्यामध्ये सर्व पात्र ग्राहक लॉग इन करू शकतील आणि थेट बघू शकतील. ₹१,०००, ₹५,००० आणि ₹१०,००० चे विजेत्यांना त्यांच्या एमजीएल गॅस बिलांवर क्रेडिट मिळेल, ज्यामुळे बक्षिसे मिळवण्याचा अनुभव सहज घेता येईल. तसेच, कर आकारणीच्या नियमांनुसार, ₹२५,०००, ₹५०,००० आणि ₹१ लाखाच्या विजेत्यांनी त्यांचे KYC तपशील देणे आवश्यक आहे ज्यानंतर बक्षीस रक्कम TDS कमी करून चेक किंवा भेट कार्डद्वारे दिली जाईल.
कंपनीच्या विविध ऑफर्स
याव्यतिरिक्त, एमजीएलने त्यांच्या वेबसाइटद्वारे किंवा वॉक-इन केंद्रांवरून नोंदणी करणाऱ्या नवीन ग्राहकांसाठी ₹१०००/- चे इन्सेंटिव्ह घोषित केले आहे. या व्यतिरिक्त, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पीएनजी वापरण्यासाठी एमजीएलने या घटकांसाठी ₹८८५/- चे अर्ज शुल्क माफ केले आहे आणि त्याबरोबरच नवीन अर्ज करणाऱ्यांना द्यावे लागणारे ₹५०००/- लास्ट माइल कनेक्टिव्हिटी डिपॉझिटही या घटकांसाठी माफ केले आहे.
‘खुशियां लाखों की’ मधून ग्राहकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता
या उद्घाटनाच्या निमित्ताने बोलताना, महानगर गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आशु सिंघल म्हणाले की, ‘‘महानगर गॅस लिमिटेड येथे आमचे काम सुरक्षित आणि विश्वसनीय ऊर्जा देण्यापलीकडचे आहे आणि आमच्या ग्राहकांची आयुष्ये अर्थपूर्णपणे प्रभावित करणे हे सुद्धा आमचे कर्तव्य आहे.‘खुशियां लाखों की’ या मोहिमेतून, मुंबई आणि सभोवतालच्या प्रांतांमधील रहिवाशांप्रती त्यांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आणि एका हरित आणि निर्वाहक्षम भविष्याच्या दिशेने खंबीरपणे कटिबद्ध राहण्यास आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. प्रत्येक नवीन ग्राहकासोबतच्या आमच्या या प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’
एमजीएलने असेही जाहीर केले की, ग्राहक लवकरच मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील 2500 कॉमन सर्व्हिस सेंटर्सपैकी कोणत्याही किओस्कमध्ये त्यांची पीएनजी नोंदणी करू शकतील.