Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 21.11.2026
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नेते नाना पाटेकर यांचे आज मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दुसरीकडे दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांचे आंदोलनादरम्यान लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हे आंदोलन अधिक चिळघले आहे. तर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार निदर्शनेही सुरूच आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीने (MPC) महागाई रोखण्यासाठी रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची वाढ करून तो ५.५०% केला. सायनशास्त्रातील (Chemistry) उत्कृष्ट संशोधनासाठी २०२६ चा नोबेल पुरस्कार हेन्री बी. कागन आणि केन्सो सोआई यांना जाहीर करण्यात आला आहे.
ज्यात मान्सूनच्या माघारीनंतर ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव वाढला असून मुंबई, पुणे आणि मराठवाड्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ हैदराबादमध्ये दाखल, कसून सराव सुरू आहे.
08 Oct 2026 05:59 PM (IST)
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत पक्षांतर्गत लोकशाही आणि पक्षघटनेच्या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद झाला. वकील नीरज किशन कौल यांनी निवडणूक आयोगाने नोंदवलेल्या निरीक्षणांचा दाखला देत शिवसेनेच्या पक्षरचनेवर आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.
08 Oct 2026 05:45 PM (IST)
जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir)च्या पुंछ जिल्ह्यातील मेंढर सब-डिव्हिजनमध्ये लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ गस्तीच्या वेळी लँडमाइन आढळल्याने सुरक्षा यंत्रणेत सतर्कता वाढली. भारतीय लष्कराच्या बॉम्ब डिस्पोजल पथकाने ही लँडमाइन सुरक्षितपणे नष्ट केली.
बालाकोटच्या फॉरवर्ड भागात नियमित गस्त सुरू असताना लष्कराच्या जवानांना लँडमाइन आढळली. त्यानंतर बॉम्ब डिस्पोजल पथकाला तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. पथकाने कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान होऊ न देता लँडमाइन नष्ट केली
08 Oct 2026 05:30 PM (IST)
पुण्यातील ओपन वॉटर जलतरणपटू गीता महेश मालुसरे हिने अवघ्या ९६ दिवसांत इंग्लिश चॅनेल, कॅटालिना चॅनेल आणि न्यूयॉर्कमधील ‘२० ब्रिजेस स्विम’ पूर्ण करून ‘ओपन वॉटर स्विमिंग (Sports) ट्रिपल क्राउन’ पटकावला. हा किताब मिळविणारी ती भारतातील पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. कमी कालावधीत ट्रिपल क्राउन पूर्ण करणारी ती जगातील सहावी आणि आशियातील दुसरी महिला ठरली आहे.
08 Oct 2026 05:15 PM (IST)
कन्नड अभिनेता दर्शन याला रेणुकास्वामी हत्या (Ranukaswami Murder Case) प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून धक्का बसला आहे. आरोपी क्रमांक 14 प्रदोष एस. राव याला सरकारी साक्षीदार (अप्रूव्हर) बनवण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे प्रदोषला सरकारी साक्षीदार बनवण्याचा कर्नाटक उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम राहिला आहे.
08 Oct 2026 04:59 PM (IST)
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचा वृत्त दुःखद आणि धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. मराठी, हिंदी सिनेमा, रंगभूमी, नाटक सर्व क्षेत्रात नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी मुलाचं काम केलेल आहे. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीत लक्ष घालून त्यांनी ग्रामीण भागात अनेक काम केली. अचानक त्यांची एक्झिट मनाला न पटणारी बाब आहे अस अशोक चव्हाण म्हणाले.
08 Oct 2026 04:45 PM (IST)
अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य २४व्या अधिवेशनाची कोल्हापूर येथे जोरदार आंदोलनाच्या घोषणेसह यशस्वी सांगता झाली. यावेळी दुष्काळ, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी, देवस्थान इनाम वर्ग-३, वनजमीन, गायरान व वरकस जमीन, पीक विमा आदी प्रश्नांवर राज्यव्यापी निर्णायक आंदोलन उभारण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथून मुंबईच्या दिशेने शेकडो वाहनांचा राज्यव्यापी वाहन लॉंग मार्च काढण्याची घोषणा करण्यात आली.
08 Oct 2026 04:39 PM (IST)
नंदुरबारमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला आणि वी 1 तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. ही कारवाई सुमारास नंदुरबारच्या करण चौफुली ते जकातफाटी रस्त्यावर करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे, एफ डी ए पथकाने धुळ्याकडे जाणारे आयशर वाहन अडवून तपासणी केली. यात 39 लाख 47 हजार 150 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 30 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 69 लाख 69 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक मोहम्मद हलीम आणि इतरांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
08 Oct 2026 04:26 PM (IST)
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरुन महायुतीमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे. अनेकांना आपल्या उमेदवारीची खात्री झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र जनांना डावलण्याचा अंदाज आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी डावलल्यामुळे माजी संचालक प्रा. किसन चौगले यांनी काँग्रेसची वाट धरली आहे. त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेतल्यानंतर यांना समविचारी आघाडीतून उमेदवारी जाहीर केलीय.
08 Oct 2026 04:19 PM (IST)
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद व मनाला वेदना देणारी आहे. उत्कृष्ट अभिनय, सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नाना पाटेकर सदैव आपल्या स्मरणात राहतील. नाना पाटेकर यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
08 Oct 2026 03:59 PM (IST)
Wardha News : बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातही जि.प.च्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला वेग आला. जिल्ह्यात जि.प.च्या ६०० शाळा असून या सर्वच शाळांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. शिवाय ही यंत्रणा १०० टक्के कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले.
08 Oct 2026 03:50 PM (IST)
११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे आणि २० ऑक्टोबरला दसरा आहे. यादरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात येणार आहे. हे नियम ११ ऑक्टोबरपासून २० ऑक्टोबरपर्यंत लागू राहतील, याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
08 Oct 2026 03:40 PM (IST)
Baramati Politics: “शेवटच्या दिवसापर्यंत मला वाटत होतं की आपण सगळे एकत्र बसून काहीतरी मार्ग काढू. पण पुरुषोत्तम जगतापांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दादांचं कुटुंब म्हणजे आपण सगळेच आहोत. मात्र, आम्हा सगळ्यांना पुरुषोत्तम जगतापांनी डावललं,” असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी केला. तसेच माळेगाव कारखान्यातील तोट्याच्या मुद्द्यावरून युगेंद्र पवार यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवू नका; सभासद सर्व सत्य जाणतात, माळेगाव कारखाना दोन कोटी रुपये नफ्यात आहे,असे जय पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
08 Oct 2026 03:20 PM (IST)
पारोळा (वा.) महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ठोक मानधन व प्रवास भत्ता गेल्या २४ महिन्यांपासून प्रलंबित आहे. या निर्णयाची जशीच्या तशी अंमलबजावणी करून थकीत मानधन तात्काळ दिवाळी पूर्वी वितरीत करावे, याविषयी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटने’च्या वतीने कामबंद आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन तालुका स्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिले आहे, सन २००६-०७ पासून राज्यातील ग्रामरोजगार सेवक तुटपुंज्या मानधनावर सर्व प्रकारे मनरेगाची ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने गावातील जॉबकार्ड धारक रोजगाराची सर्व कामे करत आहेत. Jalgaon News:
08 Oct 2026 03:16 PM (IST)
रांजणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा सुरुवातीपासूनच चर्चेत आली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मितादेवी योगेश जाधव, महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यासह अनेक इच्छुक आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीचे चित्र बहुरंगी झाले आहे.
08 Oct 2026 03:10 PM (IST)
Pune MPSC Students Protest: पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पत्रकार भवनाजवळील एस.एम. जोशी पुलावर गेल्या आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पण ही जागा तातडीने रिकामी करावी, असे आदेश पुणे पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले आहेत. आंदोलकांनी पर्यायी ठिकाणासाठी परवानगी मागितल्यास त्यासंबंधी सकारात्मक विचार करू, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. पण पुणे पोलिसांच्या या आदेशामुळे पुण्यातही राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Pune MPSC Student Protest)
08 Oct 2026 03:01 PM (IST)
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर ३ मधील चिकणेश्वर गार्डन परिसरात ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या किरकोळ वादातून गंभीर मारहाण झालेल्या गणेश पांडुरंग पारकर (वय ५०) यांचा बुधवारी उपचारादरम्यान वाशी येथील ‘न्यू एरा’ रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे कोपरखैरणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयाने दिलेल्या मृत्यूनंतर कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणात हत्येचे कलम वाढवले असून उर्वरित पसार आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे. (Navi Mumbai Crime)
08 Oct 2026 02:56 PM (IST)
Pune MPSC Students Protest: पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पत्रकार भवनाजवळील एस.एम. जोशी पुलावर गेल्या आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पण ही जागा तातडीने रिकामी करावी, असे आदेश पुणे पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले आहेत. आंदोलकांनी पर्यायी ठिकाणासाठी परवानगी मागितल्यास त्यासंबंधी सकारात्मक विचार करू, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. पण पुणे पोलिसांच्या या आदेशामुळे पुण्यातही राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Pune MPSC Student Protest)
08 Oct 2026 02:45 PM (IST)
कोपरखैरणे सेक्टर ३ मधील चिकणेश्वर गार्डन परिसरात ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या किरकोळ वादातून गंभीर मारहाण झालेल्या गणेश पांडुरंग पारकर (वय ५०) यांचा बुधवारी उपचारादरम्यान वाशी येथील ‘न्यू एरा’ रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे कोपरखैरणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयाने दिलेल्या मृत्यूनंतर कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणात हत्येचे कलम वाढवले असून उर्वरित पसार आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे. (Navi Mumbai Crime)
08 Oct 2026 02:35 PM (IST)
फिल्डिंग प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी पंजाब किंग्स संघ सोडला आहे. होप्स आणि रिकी पाँटिंग यांनी एकत्र मोठ्या प्रमाणावर काम केले असून ते दिल्ली कॅपिटल्स संघाचाही भाग होते. दुसरीकडे, हॅडिन काही वर्षांपूर्वी पंजाब किंग्समध्ये सामील झाले होते. आता, त्या दोघांनीही संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, ब्रॅड हॅडिन आणि जेम्स होप्स यांनी अलीकडेच फ्रँचायझीला संघ सोडण्याबद्दल कळवले आहे. पंजाबला आता पुढील वर्षीच्या आयपीएलपूर्वी तीन नवीन प्रशिक्षक शोधावे लागतील.
08 Oct 2026 02:25 PM (IST)
नाना पाटेकर हे एक अत्यंत उत्तम अभिनेते होते. त्यासोबतच ते एक रायफल शूटर (नेमबाज) होते. नाना पाटेकर यांनी राष्ट्रीय स्तरावर रायफल शूटिंगमडफहीए देखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मेडल देखील जिंकले होते. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात देखील त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते. एका पिक्चरच्या भूमिकेत काम करण्यासाठी त्यांनी रायफल शूटिंग शिकण्यास सुरूवात केली होती. त्यांनी भारतीय सैनीअसोबत जी-3 रायफल शूटिंगचे प्रशिक्षण देखील घेतले होते.
08 Oct 2026 02:15 PM (IST)
नाना पाटेकर यांच्या अंतिम संस्काराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांच्या इच्छेनुसार पुण्यातील डोणजे गावातील त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सायंकाळी ४ वाजता शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाना पाटेकर यांची शेवटची इच्छा डोणजे येथील त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार व्हावेत, अशी होती. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार डोणजे येथील निवासस्थानी अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत आहे.
08 Oct 2026 02:05 PM (IST)
या प्रयोगासाठी संशोधकांनी १८९ सहभागींना एका व्हीआर (Virtual Reality) ऑफिसच्या वातावरणात काम करायला लावले. या आभासी कार्यालयात त्यांच्या मदतीसाठी दोन एआय एजंट ठेवण्यात आले होते एक ‘जोनाह’ (Jonah) नावाचा पुरुष एआय एजंट आणि दुसरी ‘जोहाना’ (Johanna) नावाची महिला एआय एजंट. दोन्ही एआय एजंट्समागे वापरलेले अल्गोरिदम, तंत्रज्ञान, बौद्धिक क्षमता आणि दिलेली कामे १००% सारखीच होती.
मात्र, कामाचा मोबदला देण्याची वेळ आली तेव्हा सहभागींनी जोनाला (पुरुष एआय) जोहानापेक्षा (महिला एआय) १०.२५% जास्त मोबदला दिला. संशोधकांच्या मते, हा १०.२५% चा फरक अत्यंत लक्षणीय आहे, कारण दोन्ही एजंट्समध्ये फरक फक्त एवढाच होता की एकाला ‘पुरुष’ म्हणून सादर केले होते आणि दुसऱ्याला ‘महिला’ म्हणून.
08 Oct 2026 02:00 PM (IST)
युरोपातील महत्त्वाचा देश मानल्या जाणाऱ्या फ्रान्समध्ये सध्या शिक्षण व्यवस्थेची ढासळलेली स्थिती आणि शाळांच्या निधीत झालेल्या कपातीवरून अभूतपूर्व असंतोष पाहायला मिळत आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळांना पुरेसा निधी मिळावा या मुख्य मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन आता संपूर्ण फ्रान्समध्ये पसरले आहे. सुरुवातीला केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरते मर्यादित असणाऱ्या या आंदोलनात आता शिक्षक, महाविद्यालयीन तरुण आणि पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. मंगळवारी फ्रान्सभरात २,६६,००० हून अधिक लोक रस्त्यावर उतरले, ज्यामुळे संपूर्ण देशातील वाहतूक आणि शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. (France Student Protest)
08 Oct 2026 01:55 PM (IST)
सोबत काम करणाऱ्या एका तरुणाने आधी मैत्री करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे सतत शोषण केले. तरुणीने त्याला विरोध करत दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या आरोपीने तिचे अश्लील फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून ते व्हायरल केले. ही संतापजनक घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.
08 Oct 2026 01:45 PM (IST)
पुणे-सातारा महामार्गावरील शिवापूर गावच्या हद्दीत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. मोठ्या भावासोबत वीटभट्टीजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. खुशबू बसंत बसदेवा (वय १०, रा. आर्वी, ता. हवेली) असे मृत मुलीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे बसदेवा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
08 Oct 2026 01:40 PM (IST)
फेसबुकमध्ये आता मोठं अपडेट आले आहे. आधी अॅप उघडलं की फोटो आणि पोस्ट दिसायच्या पण आता तसं न होता अॅप उघडताच थेट तुम्हाला टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्स सारखा मोठा व्हिडिओ दिसतील. हा बदल सगळ्यात आधी भारतातच टेस्ट केला जातोय. कारण भारतात फेसबुकचे 40 कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत. त्यामुळे भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ असल्याने हा प्रयोग सुरू झाला. Facebook New Update:
08 Oct 2026 01:35 PM (IST)
इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. आता तुम्हाला इन्स्टाग्रामच्या शेअर मेनूमध्ये MUSE नावाचा एक नवीन ऑप्शन दिसत असेल. वरवर बघितलं तर वाटेल की हा पोस्ट शेअर करण्याचाच एक पर्याय नसून हा मेटाचा Meta एक नवीन AI एजंट आहे ज्याचा नाव MUSE असं ठेवलं आहे. तर हा तुमचा पर्सनल असिस्टंट म्हणून काम करणार आहे. तुमची रोजची कामं तो चुटकीसरशी करून देणार आहे. Instagram
08 Oct 2026 01:25 PM (IST)
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
08 Oct 2026 01:15 PM (IST)
भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि टी 20 सामन्यांची सिरिज खेळणार आहे. भारतीय महिला संघाची कमान आता स्मृती मंधानाच्या हातात असणार आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघ आता मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने वनडे आणि टी-२० या दोन्ही फॉरमॅटसाठी स्वतंत्र उपकर्णधारांची निवड केली आहे. त्यानुसार टी-२० संघात धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्मा हिच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे, तर ५० षटकांच्या वनडे मालिकेत अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा ही संघाची उपकर्णधार असणार आहे.
08 Oct 2026 01:05 PM (IST)
भारतातील उपग्रह संचार (Satellite Communication) क्षेत्रातील नियामक चौकटीवरून आणि सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्यावरून एक नवीन वाद समोर आला आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि ‘स्पेसएक्स’ (SpaceX) चे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) यांनी भारतात स्टारलिंक (Starlink) सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नांवरून थेट आरोप केले होते. भारतातील काही “प्रभावशाली उद्योगपती” आपल्या मक्तेदारीचा वापर करून स्टारलिंकला भारतात येण्यापासून रोखत असल्याचा दावा मस्क यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे केला होता.
08 Oct 2026 01:01 PM (IST)
08 Oct 2026 12:45 PM (IST)
राज्य सरकारने राज्यातील विविध तालुके दुष्काळी जाहीर केले, परंतु आंबेगाव तालुक्याला त्यामध्ये वगळले आहे. आंबेगाव तालुक्याचा दुष्काळी यादीमध्ये समावेश करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने आंबेगाव तालुक्यातील अनेक भागांत शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेजारील तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू करून पंचनामे व पीक परिस्थितीचे सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तालुक्यातील आदिवासी व डोंगरी भागासह लोणी-धामणी परिसरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. अनेक ठिकाणी पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष शेतशिवारातील परिस्थितीची पाहणी करून वस्तुनिष्ठ नोंद करावी आणि पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी,अशी मागणी होत आहे. दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, कर्जवसुलीस स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्गठन व मुदतवाढ यांसह विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात सवलत मिळू शकते. त्यामुळे शासनाने आंबेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त भाग म्हणून तातडीने विचार करावा,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
08 Oct 2026 12:35 PM (IST)
हिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील न्यू आर्ट्स कॉलेजच्या पाठीमागे गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची भरदिवसा चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि.७) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली आहे. रवींद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५, रा. बोल्हेगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रवींद्र चव्हाण हे सायंकाळी बालिकाश्रम रोड परिसरात असताना त्यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला झाला. दोन अज्ञात व्यक्तींसोबत त्यांचा गाडीचा कट लागण्यावरून वाद झाला, असे सांगितले जाते. रागाच्या भरात या दोन अज्ञात व्यक्तींनी चव्हाण यांची चाकूने भोकसून हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
08 Oct 2026 11:55 AM (IST)
भारताला जगातील सर्वांत तरुण लोकसंख्या असलेला देश म्हटले जाते आणि कोणत्याही देशाच्या युवकांचे भवितव्य तेथील शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असते. भारत सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये अशी शिफारस करण्यात आली आहे की, केंद्र आणि राज्यांनी मिळून आपल्या जीडीपीच्या (GDP) किमान ६ टक्के हिस्सा शिक्षणावर खर्च केला पाहिजे. परंतु, अलीकडील सरकारी आकडेवारी, आरबीआय (RBI) आणि नीती आयोगाचा अहवाल पाहिल्यास देशातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती याच्या पूर्णपणे विपरीत असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय स्तरावर शिक्षणावर होणाऱ्या खर्चाबाबत अनेक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
08 Oct 2026 11:40 AM (IST)
हिंजवडी आयटी पार्कमधील बहुप्रतिक्षित ‘मेट्रो मार्गिका ३’ सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच, मेट्रोतून उतरल्यानंतर प्रवाशांना कार्यालये व घरांपर्यंत पोहोचवणारा अंतर्गत प्रवास गतिमान करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. मेट्रो प्रवाशांच्या ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी राज्य शासनाने तब्बल ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे.
08 Oct 2026 11:35 AM (IST)
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात ‘दृश्यम’ चित्रपटाच्या धर्तीवर वडिलांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरबां गावात रघुवीर सहनी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा शिवशंकर याला सुरतमधून अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जमिनीचा वाद आणि पत्नीला वडिलांनी शिवीगाळ केल्याच्या रागातून शिवशंकरने हत्येचा कट रचला. त्यासाठी त्याने ‘दृश्यम’ चित्रपटातील कल्पनेचा आधार घेत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
08 Oct 2026 11:25 AM (IST)
लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्यास दोघांनी लोखंडी पाईपने मारहाण करून खून केला. या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास नजीकच्या आपटी परिसरात घडली.
नागसेन मारोतराव भगत (वय ४५, रा. आपटी) असे मृताचे नाव आहे. तर गिरीश पद्माकर कोल्हे (वय ४८) व अविनाश जनार्दन कोल्हे (वय ४३, रा. दोघेही आपटी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
08 Oct 2026 11:15 AM (IST)
मेडिकलच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रचंड मानसिक आणि शैक्षणिक ताणतणाव सहन करावा लागतो. यासंदर्भातील एका नवीन अभ्यासात अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नवी दिल्लीतील एका सरकारी मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस (MBBS) विद्यार्थ्यांवर केलेल्या या संशोधनामध्ये तब्बल ७७% विद्यार्थ्यांमध्ये मध्यम ते उच्च स्वरूपाचा ताण असल्याचे आढळून आले आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची चिंता, कमी गुण मिळण्याची भीती आणि शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे न देता येण्याची भीती ही विद्यार्थ्यांच्या तणावाची प्रमुख कारणे असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
08 Oct 2026 11:10 AM (IST)
लाईट्स, कॅमेरा आणि ॲक्शनच्या झगमगाटात वावरलेले एक अभिनेते, ज्यांना जगाने त्यांच्या साधेपणामुळे ओळखले, त्यांचे कौतुक केले. आज पहाटे नाना पाटेकर यांचे निधन झाले. सूट-बूटच्या दुनियेत असूनही, गळ्यात गमछा आणि खादीचा कुर्ता-पायजमा घातलेले नाना सर्वांचे आवडते होते. त्यांना आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांची संवादफेक, ज्यामुळे ते इतर अभिनेत्यांच्या गर्दीतून वेगळे ठरले.
08 Oct 2026 10:55 AM (IST)
सिनेमासृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७५ वर्षीय नाना पाटेकर यांना गोवा येथील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार त्यांना कार्डियाक अरेस्ट (हृदयविकाराचा झटका) आला होता. नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक विशेष ओळख निर्माण केली, परंतु चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपली शिक्षण कला क्षेत्रातच पूर्ण केली होती.
08 Oct 2026 10:45 AM (IST)
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी आणि रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयामुळे चाहत्यांना खळखळून हसवले तर कधी रडवले. आजही त्यांचे अनेक डायलॉग चाहत्यांचे तोंड पाठ आहेत. नाना पाटेकरांच्या जाण्यामुळे सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दमदार अभिनय, भारदस्त आवाज आणि संवादफेकीची खास शैली असलेले नाना त्यांच्या डायलॉगमुळे लोकप्रिय झाले. चला तर पाहुयात नाना पाटेकर यांच्या गाजलेल्या भूमिका आणि त्यातील फेमस डायलॉग
08 Oct 2026 10:35 AM (IST)
शहरातील गजबजलेल्या बालिकाश्रम रोड परिसरात सायंकाळच्या सुमारास ५५ वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. रविंद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
08 Oct 2026 10:25 AM (IST)
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. सकाळी सुमारे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या असं अचानक जाण्याने सर्वांनाच मोठ धक्का बसला आहे.
08 Oct 2026 10:15 AM (IST)
मनोज जरांगे यांच्या बायकोचा भाऊ विलास खेडकर हा वाळूचोर आहे. मनोज जरांगे यांनी एक टोळी तयार करुन कंत्राटे घेण्याचा उद्योग सुरु केला आहे. किशोर बलांडे हा त्याचा पार्टनर आहे. मनोज जरांगे आता संघर्ष योद्धा राहिलेला नाही तर तो आता टेंडर योद्धा बनला आहे, अशी टीका अजय बारस्कर यांनी केली.
08 Oct 2026 10:05 AM (IST)
Ashok Saraf Heartfelt Tribute Loss of Close Friend: मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना आपल्या अत्यंत जवळच्या मित्राच्या अकाली निधनावर तीव्र शोक आणि दुःख व्यक्त केले आहे. मित्राच्या जाण्याची बातमी ऐकून आपल्याला मोठा धक्का बसल्याचे सांगत, "मला अजूनही यावर विश्वास बसत नाहीये, ही अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
अशोक सराफ यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, "आम्हा दोघांची कलाक्षेत्रातील सुरुवात एकत्रच झाली होती. आम्ही एकत्र नाटकात काम केले आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत मजबूत, ताकदीचा माणूस होता. गेल्या काही दिवसांपासून आमची भेट किंवा संवाद झाला नव्हता, तरीही आमची जिवाभावाची मैत्री होती. असा खंबीर मित्र गमावल्याचे दुःख आयुष्यभर कायम राहील." ज्येष्ठ अभिनेत्याच्या या भावुक प्रतिक्रियामुळे संपूर्ण कलासृष्टीत आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
08 Oct 2026 09:55 AM (IST)
IND vs WI 1st T20I Shreyas Iyer Century: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेची दणदणीत विजयाने सुरुवात केली आहे. लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव १७१ धावांवर आटोपला होता. विजयासाठी मिळालेले १७२ धावांचे आव्हान भारतीय संघाने अवघ्या १५व्या षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. या मोठ्या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
08 Oct 2026 09:45 AM (IST)
CNG Price Hike Inflation Impact: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे सरकारी आणि खासगी तेल कंपन्यांच्या नफ्यावर मोठा ताण आला आहे. वाढत्या आयात खर्चामुळे देशांतर्गत बाजारात महागाई आणि चलनाचे मूल्य घटण्याचे संकट गडद झाले असून, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात (Repo Rate) वाढ करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. एकीकडे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात यश आले असले, तरी आंतरराष्ट्रीय गॅस निर्देशांकातील वाढीमुळे देशात सीएनजीच्या (CNG) किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.
08 Oct 2026 09:35 AM (IST)
MPSC Protest Pune Resignation Demand: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या तातडीच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर गेल्या आठ दिवसांपासून एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण व तीव्र आंदोलन सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, सत्ताधारी व विरोधक खासदार-आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. दरम्यान, सलग सात दिवस चाललेल्या उपोषणामुळे काल रात्री दोन आंदोलक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीररीत्या खालावली असून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
08 Oct 2026 09:25 AM (IST)
Prakash Raj Dhruv Rathee EC Protest Bangalore: अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज यांनी बंगळुरू येथे सुरू असलेल्या विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेविरोधातील (SIR) आंदोलनाची धार अधिक तीव्र करत देशवासीयांना मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत प्रकाश राज यांनी आंदोलनात एक विशेष पाहुणा सहभागी होणार असल्याची घोषणा केली होती, ज्यानंतर त्यांनी प्रसिद्ध युट्यूबर आणि राजकीय विश्लेषक ध्रुव राठी (Dhruv Rathee) या आंदोलनात थेट सामील होत असल्याचे स्पष्ट केले.
08 Oct 2026 09:15 AM (IST)
IndiGo Flight Lightning Strike Emergency Landing: पटनाहून लखनऊकडे जाणाऱ्या इंडिगोच्या (IndiGo 6E925) प्रवाशांच्या जीवाचा थरकाप उडवणारी घटना हवेत १७,००० फूट उंचीवर घडली आहे. उड्डाणादरम्यान वादळी हवामानात विमानावर अचानक वीज कोसळल्याने विमानाचा पुढील भाग (Nose Cone/Radome) पूर्णपणे चक्काचूर होऊन गंभीर नुकसान झाले. अचानक झालेल्या या मोठ्या दुर्घटनेनंतरही वैमानिकाने (Pilot) प्रचंड प्रसंगावधान आणि संयम राखत विमानावर पूर्ण नियंत्रण मिळवले.






