Zilla Parishad Election 2026: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले असले, तरी आज १२ जानेवारीपर्यंत निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे उर्वरित केवळ २१ दिवसांत १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता धुसर दिसत आहे.
दरम्यान, ३२ पैकी २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका आरक्षणाच्या कारणामुळे आधीच लांबणीवर पडल्या आहेत. त्यातच महापालिका निवडणुकांमुळे ईव्हीएमची कमतरता भासत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका दहावीच्या परीक्षेनंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




