मुंबई:राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी त्यांनी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटींची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारले जाणार आहे. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 300 कोटी रुपये दिले जाणार आहेत.