Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या

Breaking News in Marathi: चंद्रनाथ रथ यांच्या हत्येवरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 07, 2026 | 05:55 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यानंतर आता तेथील राजकारण तापले आहे. त्यातच परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे बुधवारी रात्री भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यानंतर दोहरिया परिसरात गोळीबार केला. स्थानिक सूत्रांनुसार, चार गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या चंद्रनाथ यांच्या डोक्यात लागल्या.

चंद्रनाथ रथ हे एका कामानिमित्त कारने जात असताना हल्लेखोरांनी त्यांची गाडी थांबवली. गाडी थांबताच दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चंद्रनाथ यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे नंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

 

The liveblog has ended.
  • 07 May 2026 04:45 PM (IST)

    07 May 2026 04:45 PM (IST)

    डहाणू-दिवा लोकलमध्ये मराठी भाषेला दुय्यम

    डहाणू-दिवा लोकलमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. लोकलच्या डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुजराती भाषेतील जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्याने मराठी भाषिक प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.लोकलमधील विविध डब्यांमध्ये सर्वत्र गुजराती जाहिराती झळकत असून मराठी भाषेचा वापर अत्यल्प प्रमाणात दिसत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना सार्वजनिक वाहतुकीत मराठी भाषेला प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी आता मराठी भाषिकांकडून केली जात आहे.

  • 07 May 2026 04:40 PM (IST)

    07 May 2026 04:40 PM (IST)

    केडीएमसीत शिवसेना शिंदे गटात चाललय तरी काय ?

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आता शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी करणारे शहरप्रमुख रवी पाटील आहेत, तर दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी होत जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट पक्षातील नेत्यांवरच टीका केली आहे. त्यामुळे या वादाची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या फेरीवाल्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी एका फेरीवाल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर प्रशासन अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुख्य रस्ते आणि रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

  • 07 May 2026 04:35 PM (IST)

    07 May 2026 04:35 PM (IST)

    वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे नागरिक त्रस्त

    रबाले पोलीस स्टेशनच्या समोर 11kve सबस्टेशन 2019 मध्ये बनवण्यात आले आहे परंतु कार्यान्वित नाही पावसाळा तोंडावर आला असताना आता केबल भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे हे काम पावसाळ्या अगोदर पूर्ण होईल की नाही अशी शक्यता निर्माण झाली असल्यामुळे प्रभाग क्रमांक सातचे शिवसेनेचे नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अन्य नगरसेवकांसह वाशीतील महाराष्ट्र विद्युत महावितरण भांडुप विभागाचे शहर अभियंता संजय पाटील यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये विद्युत पुरवठा कधी सुरळीत होणार या संदर्भात चर्चा करण्यात आली 11 केव्हि सबस्टेशन पासून विविध परिसरात केबल टाकण्याचे काम जरी युद्ध पातळीवर सुरू असले तरीसुद्धा ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल की नाही अशी शक्यता सुद्धा या ठिकाणी निर्माण झाली आहे.

  • 07 May 2026 04:30 PM (IST)

    07 May 2026 04:30 PM (IST)

    कल्याणात फेरीवाला कारवाईविरोधात उपोषण,दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून शहरातील मुख्य रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवलीतील फेरीवाल्यांनी महापालिका मुख्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू केले. महापालिकेने फेरीवाला धोरण तातडीने राबवावे आणि पथविक्रेत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. डोंबिवली फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप करत भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केला. उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर आणि भारत पवार यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.संघटनेच्या म्हणण्यानुसार, डोंबिवली शहरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फुल विक्रेते, मच्छी विक्रेते, हातगाडी चालक यांच्यावर अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र ही कारवाई करताना फेरीवाला कायद्यातील नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

  • 07 May 2026 04:25 PM (IST)

    07 May 2026 04:25 PM (IST)

    शिवसेना पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही; शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेलाच प्राधान्य मिळणार!

    "शासकीय समित्यांमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेनेलाच प्राधान्य मिळाले पाहिजे. यासंदर्भात मी स्वतः पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असून, शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही," असा ठाम विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा अहिल्यानगरचे नूतन संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी दिला.नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी निवड झाल्यानंतर उदय सामंत हे प्रथमच संगमनेर दौऱ्यावर आले होते. शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

  • 07 May 2026 04:20 PM (IST)

    07 May 2026 04:20 PM (IST)

    खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठकीत आमदार निलेश राणे यांच्याकडून कृषी विभाग अधिकारी फैलावर

    कुडाळ तालुका खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी नियोजन बैठक आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत खरीप हंगामातील बी-बियाणे, खते यांचा पुरवठा आणि उपलब्धता, पीक विमा, पीक नियोजन, फळबाग लागवड, कृषी विषयक सल्ले, गावठी बाजार मार्गदर्शन, शेतकरी मार्गदर्शन मेळावे, कृषी प्रदर्शन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कृषी विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना अधिकारी वर्गाला चांगलेच फैलावर घेतले. कृषी विभागाकडून अर्धवट असलेली कामे पूर्ण करून घ्या, पदावर आहात तर काम करावेच लागेल, आपल्याला काम करण्याची इच्छा नसेल तर आधीच सांगा. पूर्वीसारख्या १०-१० वर्षे मीटिंग होत नव्हत्या, असे आता चालणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

  • 07 May 2026 04:15 PM (IST)

    07 May 2026 04:15 PM (IST)

    कल्याणात कचऱ्याने तुंबलेल्या नाल्यात मनसेचे अनोखे क्रिकेट आंदोलन,

    कल्याण पश्चिमेतील मल्हार नगर आणि जोशी बाग परिसरातील नाले कचरा आणि गाळाने पूर्णपणे भरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही केडीएमसी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या निष्क्रियतेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन करत थेट नाल्यात उतरून क्रिकेट खेळत प्रशासनाचा निषेध नोंदवला. परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कचरा आणि साचलेला गाळ असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळा तोंडावर आला असताना नालेसफाई न झाल्यास परिसरात पाणी साचून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

  • 07 May 2026 04:08 PM (IST)

    07 May 2026 04:08 PM (IST)

    वाढत्या उन्हाचा 'दूध' व्यवसायाला फटका; दुग्धोत्पादनात 30 टक्के घट, चाऱ्याचे दरही कडाडले

    अहिल्यानगर : राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असून, अहिल्यानगर जिल्ह्यालाही उष्णतेच्या लाटेचा मोठा तडाखा बसत आहे. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आता दुभत्या जनावरांवर होऊ लागला असून, जिल्ह्यातील दुग्धोत्पादनात तब्बल ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. वाढती उष्णता आणि चाऱ्याचे गगनाला भिडलेले भाव यामुळे दूध व्यावसायिक सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.उष्णतेमुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून शहरातील अनेक दूध व्यावसायिकांनी आपल्या गोठ्यांमध्ये पंख्यांची व्यवस्था केली आहे. जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी दिवसभरातून किमान तीन वेळा गार पाण्याचे फवारे मारले जात आहेत. वाढत्या उष्म्यामुळे जनावरांच्या खाण्यावर परिणाम झाला असून, पर्यायाने दूध उत्पादनात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, दुभत्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या आणि पेंडीच्या दरात मोठी वाढ झाल्याने 'दुभती जनावरे सांभाळायची कशी?' असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

  • 07 May 2026 04:00 PM (IST)

    07 May 2026 04:00 PM (IST)

    Zee Marathi : जीव जडला; अखेर स्वानंदी पडली समरच्या प्रेमात

    Zee Marathi Veen Doghantali Hi Tutena Promo: वीण दोघांतली तुटेना ही तुटेना मालिका आता नव्या वळणार येताना दिसत आहे. जेव्हा समर आणि स्वानंदी याचं लग्न झालं तेव्हा ते नातं तडजोडीवर आधारित होतं. समर आणि स्वानंदी फक्त जागाला दाखवण्यासाठी म्हणून नवरा बायकोसारखं राहतात पण ते दोघं एकत्र असताना मात्र अनोळखी. सुरुवातीच्या काही दिवस ही दोन अनोळखी माणसं एकमेकांना चेहरा बघितला तरी भांडायचे. हळूहळू समर स्वानंदी यांच्यात मैत्री निर्माण झाली. रोज कचाकचा भांडणारे दोन माणसं आता चांगले मित्र झाले होते. समर स्वानंदी यांची मैत्री आणखी घट्ट होणार तेच मीठाचा खडा पडावा तशी किमयाची एन्ट्री झाली.

  • 07 May 2026 03:50 PM (IST)

    07 May 2026 03:50 PM (IST)

    RCB Vs LSG Pitch Report: विराट कोहली विरुद्ध शामी?

    Tata IPL 2026 LSG Vs RCB Live Updates: आज लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबी असा सामना होणार आहे. लखनौचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. तर आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप 4 मध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी आरसीबीचा आणि आपले उरलेले काही सामने जिंकून स्पर्धेचा शेवट चांगला करण्याचा प्रयत्न लखनौच्या संघाचा असणार आहे. ऋषभ पंतला यंदाच्या हंगामात लखनौच्या संघाला साजेशी कामगिरी करता आली नसल्याचे पाहायला मिळाले.

  • 07 May 2026 03:40 PM (IST)

    07 May 2026 03:40 PM (IST)

    Thalapathy Vijay : थलपती विजयची १०वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल!

    Thalapathy Vijay 10th Result: तमिळनाडूचे प्रसिद्ध अभिनेते आणि नेते थलपती विजय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची १० वीची मार्कशीट सोशल मीडियावर वायरल होत आहे. विजय यांनी चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावले असून त्यांनी राजकारणातही मजबूत पाऊल टाकले आहे. त्यांच्या  पक्षाच्या दमदार कामगिरीनंतर त्यांचे नाव अधिकच चर्चेत आले आहे. विजय यांना १०वीच्या बोर्ड परीक्षेत एकूण ११०० पैकी ७११ मिळाले होते. याची टक्केवारी  ६५ टक्क्यांच्या आसपास येते. त्यांना तमिळमध्ये २०० पैकी १५५ गुण तर इंग्रजीत १३३ तसेच विज्ञानात २०६ गुण मिळाले होते. दुसरीकडे सामाजिक शास्त्रात ३०० पैकी १२२ गुण मिळाले होते. तर गणितात २०० पैकी ९५ गुण मिळाले होते. त्यांना सर्वात कमी गुण हे गणित विषयांत होते.

  • 07 May 2026 03:32 PM (IST)

    07 May 2026 03:32 PM (IST)

    संध्याकाळच्या नाश्त्यात ओव्हनचा वापर न करता बनवा Bread Pizza Pockets

    दिवसभर काम करून थकल्यानंतर सगळ्यांच खूप जास्त भूक लागते. अशावेळी पाणीपुरी, शेवपुरी, समोसा, भेळ अतिशय आवडीने खाल्ली जाते. पण नेहमीच विकतचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले नाही. तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात कायमच घरी बनवलेले पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. लहान भूक लागल्यानंतर कायमच विकतचा पिझ्झा, बर्गर खाण्यास मागतात. किंवा घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी कोणता पदार्थ बनवावा लवकर सुचत नाही. अशावेळी तुम्ही ओव्हनचा वापर न करता ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवू शकता. हा ब्रेड पिझ्झा पॉकेट्स घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल. घरी बनवलेले पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी खुप जास्त फायदेशीर आहेत. ब्रेड पिझ्झा पॉकेट्स तुम्ही चटणीसोबतसुध्दा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

  • 07 May 2026 03:30 PM (IST)

    07 May 2026 03:30 PM (IST)

    संध्याकाळच्या नाश्त्यात ओव्हनचा वापर न करता बनवा Bread Pizza Pockets

    दिवसभर काम करून थकल्यानंतर सगळ्यांच खूप जास्त भूक लागते. अशावेळी पाणीपुरी, शेवपुरी, समोसा, भेळ अतिशय आवडीने खाल्ली जाते. पण नेहमीच विकतचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले नाही. तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात कायमच घरी बनवलेले पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. लहान भूक लागल्यानंतर कायमच विकतचा पिझ्झा, बर्गर खाण्यास मागतात. किंवा घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी कोणता पदार्थ बनवावा लवकर सुचत नाही. अशावेळी तुम्ही ओव्हनचा वापर न करता ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवू शकता. हा ब्रेड पिझ्झा पॉकेट्स घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल. घरी बनवलेले पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी खुप जास्त फायदेशीर आहेत. ब्रेड पिझ्झा पॉकेट्स तुम्ही चटणीसोबतसुध्दा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

  • 07 May 2026 03:22 PM (IST)

    07 May 2026 03:22 PM (IST)

    RCB Vs LSG Pitch Report: विराट कोहली विरुद्ध शामी? टॉस जिंकून थेट…

    Tata IPL 2026 LSG Vs RCB Live Updates: आज लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबी असा सामना होणार आहे. लखनौचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. तर आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप 4 मध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी आरसीबीचा आणि आपले उरलेले काही सामने जिंकून स्पर्धेचा शेवट चांगला करण्याचा प्रयत्न लखनौच्या संघाचा असणार आहे. ऋषभ पंतला यंदाच्या हंगामात लखनौच्या संघाला साजेशी कामगिरी करता आली नसल्याचे पाहायला मिळाले.

  • 07 May 2026 03:00 PM (IST)

    07 May 2026 03:00 PM (IST)

    २०३० पर्यंत रेल्वेचे जाळे ९०१ किमीने विस्तारणार; २३,४३७ कोटींच्या ३ रेल्वे प्रकल्पांना केंद्राची मंजुरी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींवरील मंत्रिमंडळ समितीने सुमारे २३,४३७ कोटी रुपयांच्या रेल्वे मंत्रालयाच्या तीन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे केवळ देशाची पायाभूत सुविधाच बळकट होणार नाही, तर आर्थिक विकासाचा वेगही वाढणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील १९ जिल्ह्यांना या रेल्वे प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे संपर्क यंत्रणा अधिक सक्षम होऊन देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणेही अधिक सुलभ होईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर दिली आहे.

  • 07 May 2026 02:55 PM (IST)

    07 May 2026 02:55 PM (IST)

    माण-खटावमध्ये पाणी प्रश्न गंभीर! “नियोजित पाणी घोटाळा” झाल्याचा प्रशासनावर गंभीर आरोप

    सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यातील पाणीवाटपाचा प्रश्न आता गंभीर राजकीय आणि प्रशासकीय संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या कारभारावर “संगनमत, भ्रष्टाचार आणि नियोजित पाणी घोटाळा” असे गंभीर आरोप होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत प्रशासनाला थेट अंतिम इशारा दिला आहे.

  • 07 May 2026 02:45 PM (IST)

    07 May 2026 02:45 PM (IST)

    अमेरिकेचं सत्य उघडं! इराणच्या हल्ल्यात २२८ लष्कीर तळं उद्ध्वस्त?

    अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) सध्या निवळताना दिसत आहे. अमेरिकेने इराणविरोधी लष्करी मोहिम थांबवली आहे. इराणला एक शांतता प्रस्ताव पाठवला असून कराराच्या अटी मान्य करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, अद्याप इराणकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या सर्व घडामोडींदरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचे काही सॅटेलाईट फोटो समोर आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

  • 07 May 2026 02:35 PM (IST)

    07 May 2026 02:35 PM (IST)

    निसान ग्रेवाईटमध्ये प्रथमच ट्विन-सिलेंडर CNG टेक्नॉलॉजी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

    जपानी कार निर्माता कंपनी निसानने आपल्या लोकप्रिय एमपीव्ही, ग्रॅव्हाइटसाठी सरकारमान्य सीएनजी रेट्रोफिट किट सादर केले आहे. ८२,९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आलेले हे किट १६ राज्यांमध्ये उपलब्ध होईल. या किटचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्मार्ट ट्विन-सिलेंडर प्रणाली, जी या सेगमेंटमध्ये प्रथमच वापरली जात आहे. विशेष म्हणजे या MPV मध्ये सेगमेंटमधील पहिली स्मार्ट ट्विन-सिलेंडर प्रणाली वापरण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक मायलेजसोबतच जास्त बूट स्पेसही मिळणार आहे.

  • 07 May 2026 02:25 PM (IST)

    07 May 2026 02:25 PM (IST)

    नसरापूर, पर्वतीनंतर आता अकोल्यातील अत्याचार प्रकरण समोर; 60 वर्षीय नराधमाचा बालिकेवर अत्याचार

    नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. असे असताना अकोल्याच्या पातूर तालुक्यातील एका गावात असाच धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वृद्धाने शेजारी राहणाऱ्या एका 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

  • 07 May 2026 02:17 PM (IST)

    07 May 2026 02:17 PM (IST)

    होय, तुमची सावली सोडणार तुमची साथ; 19 मे ला ‘झिरो शॅडो डे’

    ‘शून्य सावली दिवस’ म्हणजेच ‘झिरो शॅडो डे’चा अनुभव छत्रपती संभाजीनगरकरांना अनुभवण्याची संधी मिळणार असून, यंदा १९ मे रोजी तुमची सावली तुमची साथ सोडणार आहे. असे म्हणतात की, आपली सावली आपली साथ कधीच सोडत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. दिवसाच्या उजेडात मोकळ्या जागेत उभे असताना, चालताना आपली सावली आपली सोबत देत असते. सुरूवातीला कमी उंची असलेली सावली सूर्योदयावेळी जास्त उंचीही होते.

  • 07 May 2026 02:08 PM (IST)

    07 May 2026 02:08 PM (IST)

    शाळा सुधारण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; नवीन ‘SMC मार्गदर्शक तत्त्वे २०२६’ जाहीर!

    आपल्या देशाच्या तळागाळातील शाळांचे व्यवस्थापन सुधारण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल (६ मे) रोजी शाळा व्यवस्थापन समितीची मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत. याचा उद्देश देशभरातील शालेय शिक्षणामध्ये लोकसहभाग, पारदर्शकता आणि प्रभावी प्रशासन मजबूत करणे हा आहे.

  • 07 May 2026 01:50 PM (IST)

    07 May 2026 01:50 PM (IST)

    सवलत बंद करुन रशियाने वाढवले तेलाचे भाव

    पश्चिम आशियातील तणावामुळे सध्या जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेने होर्मुझ (Hormuz) नाकेबंदी हटवली असली तर इराणने अद्याप माघार घेतलेली नाही. यामुळे जागतिक बाजारात तेल पुरवठ्यात अद्यापही अडथळा येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतासमोर एक मोठे आव्हान उभे राहीले आहे. भारताला रशियाकडून मिळणाऱ्या तेलासाठी  मोठी किंमत मोजावी लागत आहे. वाचा सविस्तर

  • 07 May 2026 01:40 PM (IST)

    07 May 2026 01:40 PM (IST)

    अंदमानच्या समुद्रात भारतीयांनी रचला नवा इतिहास

    अंदमान निकोबारच्या समुद्रात पाण्याखाली देशाचा सर्वात मोठा तिरंगा फडकवल्याचा पराक्रम सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. मुख्य म्हणजे याची नोंद गिनीज वर्ल्ड बुक रेकाॅर्डमध्येही करण्यात आली होती. यातच आता अंदमान-निकोबारच्या प्रशासनाने आणखी एक विक्रमी पराक्रम घडवून आणल्याचे समोर आले आहे. यावेळी इथल्या स्वराज्य बेटावरील समुद्रात पाण्याच्या आत मानवी पिरॅमिड साकरल्याची घटना समोर येत आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारताचा मान आणखी वाढला कारण या घटनेची नोंद आता गिनिज वर्ल्ड बुक रेकाॅर्डमध्ये करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

  • 07 May 2026 01:30 PM (IST)

    07 May 2026 01:30 PM (IST)

    सौदीने अमेरिकेला हवाई हद्दीत प्रवेश नाकारला

    सौदी अरेबियाने अमेरिकेला आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्यास नकार दिला अशल्याची माहिती समोर आली आहे. ०४ मे रोजी ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रीडम सुरु केले होते. याचा उद्देश होर्मुझमध्ये अडकलेल्या व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करणे होते. परंतु ही मोहिम एक दिवसानंतरच थांबवण्यात आली असून पाकिस्तानच्या विनंतीवरुन स्थगित केली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

    परंतु काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या मोहिमेत अमेरिकन विमानांना आपली हवाई हद्द आणि हवाई तळे वापरण्यास सौदीने नकार दिला. यामुळे ही मोहिम थांबण्यात आली. रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी या मोहिमेची थेट सोशल मीडियावर घोषणा केली. याबाबतीत आखाती देशांनी कोणतीही माहिती पुरवण्यात आली नाही. ट्रम्प यांच्या याच कृत्यावर नाराज होऊन सौदी अरेबियाने नकार दिला अशल्याचे म्हटले जात आहे.

  • 07 May 2026 01:20 PM (IST)

    07 May 2026 01:20 PM (IST)

    इराणची अमेरिकेच्या माध्यांवर टीका

    अमेरिका इराण तणाव सध्या निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. या दरम्यान इराणने अमेरिकेच्या माध्यमांवर तीव्र टिका केली आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिका आणि पाश्चात्य माध्यांवर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "ऑपरेशन, ट्रस्ट मी, ब्रो अयशस्वी झाले. आता ऑपरेशन फॉक्सियस सह पुन्हा नेहमीच्या कामाला सुरुवात."

    हे विनाधन इराणसोबतच्या करार करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने नुकतेच सादर केलेल्या प्रस्ताव आणि वाटाघाटी संदर्भात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ट्रस्ट मी ब्रो यातून इराणने विश्वासाच्या नावाखाली सादर केलेल प्रस्ताव अयशस्वी ठरले असू सूचित केले आहे. तर फॉक्सियसचा वापर हा अमेरिकन वृत्तसंस्था ॲक्सिऑस वर असलेला टोमणा आहे, असे तज्ज्ञांते मत आहे.

    Operation Trust Me Bro failed. Now back to routine with Operation Fauxios.

    — محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) May 6, 2026

  • 07 May 2026 01:10 PM (IST)

    07 May 2026 01:10 PM (IST)

    ट्रम्प यांनी इराण संघर्षाची तुलना केली भूतकाळातील युद्धांशी

    डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक चार्ट शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी इराणसोबतच्या संघर्षाची तुलाना अमेरिकेने भूतकाळात केलेल्या युद्धांशी केली आहे.

    या चार्टनुसार, इराण संघर्ष केवळ सहा आठवडे सुरु होता, तर अफगाणिस्तान, इराक आणि व्हिएतनमामधील युद्ध त्याहून अधिक कालवधीसाठी सुरु होते.

  • 07 May 2026 01:03 PM (IST)

    07 May 2026 01:03 PM (IST)

    खडकी कत्तलखाना बंद; व्यापाऱ्यांचा रोष

    खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (केसीबी) अखत्यारीतील रेंजहिल्स येथील कत्तलखाना गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्याने स्थानिक मटन व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कारणावरून ऑक्टोबर २०२५ मध्ये कत्तलखाना बंद करण्यात आला होता. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही तो अद्याप सुरू करण्यात आलेला नाही, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. सन १९१० पासून सुरू असलेला हा कत्तलखाना १९७६ मध्ये रेंजहिल्स येथे स्थलांतरित करण्यात आला होता. येथे सुमारे २५ मटन व्यवसायिक कार्यरत होते आणि सुमारे ८५० जणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार या व्यवसायावर अवलंबून होता. कत्तलखाना बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
  • 07 May 2026 12:48 PM (IST)

    07 May 2026 12:48 PM (IST)

    देहूरोड परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये दहशत

    पिंपरी-चिंचवडमधीलदेहूरोड येथील ॲम्युनिशन फॅक्टरी परिसर, दुर्गा देवी टेकडी, रावेत आणि म्हस्के वस्ती या भागात गेल्या काही दिवसांपासून  बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने वनविभागाने तातडीने कंबर कसली असून, ॲम्युनिशन फॅक्टरीच्या विस्तीर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

  • 07 May 2026 12:36 PM (IST)

    07 May 2026 12:36 PM (IST)

    नसरापूर अत्याचारप्रकरणानंतर पुण्यात स्थापन होणार फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्ट

    नसरापूर येथील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणाचा तातडीने निकाल लावण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार तसेच उच्च न्यायालयाच्या परवानगीने फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्ट स्थापन केले जाणार आहे. त्याची सुरुवात झाली असून, यामध्ये विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. दरम्यान, आरोपीला कठोरातली कठोर प्रामुख्याने मरणोत्तर फाशीची शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

  • 07 May 2026 12:24 PM (IST)

    07 May 2026 12:24 PM (IST)

    आंबेगाव तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

    आंबेगाव तालुका आणि परिसरात कांदा पिकांनी यावर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे. सध्या कांदा पिकाची काढणी मोठ्या प्रमाणात चालू असताना कांद्याला केवळ 9 ते 13 रुपयापर्यंत प्रति किलो इतका बाजार भाव मिळत आहे. हा दर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असून भांडवली खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र दिसून येते .

  • 07 May 2026 12:12 PM (IST)

    07 May 2026 12:12 PM (IST)

    नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर महापौर अ‍ॅक्शन मोडवर

    पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यक्षम करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नसरापूर व म्हाळुंगे परिसरात नुकत्याच घडलेल्या बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्तांना तातडीचे पत्र देत शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • 07 May 2026 12:00 PM (IST)

    07 May 2026 12:00 PM (IST)

    Deepfake ला चक्क महिला पंतप्रधानच पडल्या बळी

    सध्याच्या डिजिटल युगात आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सचा प्रगत तंत्रज्ञानासाठी वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मात्र, याचा तितकाच गैरवापरही वाढला आहे. एआयच्या मदतीने आजकाल बनाट प्रतिमा तयार करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता एआयमुळे महिला पंतप्रधानही सुरक्षित राहिल्या नाहीत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या यांचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणावर मेलोनी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर

  • 07 May 2026 11:50 AM (IST)

    07 May 2026 11:50 AM (IST)

    विभागीय आयुक्तांनी दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात जाणार; झेडपी सदस्य देसाई आक्रमक

    माण-खटाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विकासकामांतील कथित अनियमिततेच्या आरोपावरून राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद प्रशासनावर थेट हल्लाबोल करत गंभीर आरोपांची सरबत्ती केली.

  • 07 May 2026 11:40 AM (IST)

    07 May 2026 11:40 AM (IST)

    मंत्रिमंडळातून वगळलेले सावंत, केसरकर अद्याप ‘नॉट रिचेबल’

    नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नवे सरकार स्थापन झाले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला. या घटनेला आता दीड वर्षे उलटली आहेत. मात्र, सत्तेतून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या नाराजीची ‘धुसफूस’ अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या काळात राजकीय विजनवासात गेलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार नुकतेच मुंबईत दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

  • 07 May 2026 11:26 AM (IST)

    07 May 2026 11:26 AM (IST)

    मोहोळमध्ये ७६ वर्षीय वृद्धेवर चाकूने हल्ला करून मंगळसूत्र लंपास

    मोहोळ शहरातील आदर्श चौक परिसरात चोरीची घटना घडली. एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून, चाकूचा धाक दाखवत मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मोहोळ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास घडली होती.

  • 07 May 2026 10:36 AM (IST)

    07 May 2026 10:36 AM (IST)

    ट्रम्प यांचा इराणला पुन्हा विनाशकारी इशारा; प्रोजेक्ट फ्रीडम स्थगित

    अमेरिका इराण तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला मोठा इशारा दिला आहे. यामुळे युद्धबंदीच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इराणला अत्यंत कडक शब्दात बजावले आहे. इराणने शांतता कराराच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर त्यांच्यावर पुन्हा बॉम्बवर्षाव करण्यात येईल असे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडाली आहे.

  • 07 May 2026 10:14 AM (IST)

    07 May 2026 10:14 AM (IST)

    अफगाणिस्तन हादरलं! जुना बॉम्बच्या भीषण स्फोटात तरुण जागीच ठार

    अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये एका हादरवणारी घटना घडली आहे. अफगाणिस्तानच्या परवान प्रांतात एका जुन्या न फुटलेल्या बॉम्बचा मोठा स्फोट झाला. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ३ मुले गंभीर जखमी आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या घटनांमुळे अनेक लोकांना आपली जीव गमवावा लागला आहे.

  • 07 May 2026 10:05 AM (IST)

    07 May 2026 10:05 AM (IST)

    मंत्रिमंडळातून वगळलेले सावंत, केसरकर अद्याप ‘नॉट रिचेबल’

    नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नवे सरकार स्थापन झाले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला. या घटनेला आता दीड वर्षे उलटली आहेत. मात्र, सत्तेतून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या नाराजीची ‘धुसफूस’ अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या काळात राजकीय विजनवासात गेलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार नुकतेच मुंबईत दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

  • 07 May 2026 09:35 AM (IST)

    07 May 2026 09:35 AM (IST)

    ७/१२ उतारा बंद, आता मिळणार 'प्रॉपर्टी कार्ड' 

    महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय बदल केला आहे. या निर्णयामुळे शहरी भागातील जमिनींच्या नोंदी अधिक सुटसुटीत आणि स्पष्ट होणार आहेत. ज्या गावांचे नागरीकरण झाले आहे आणि जी गावे आता महापालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीत आली आहेत, तेथील जमिनींचा पारंपरिक ७/१२ उतारा आता बंद केला जाणार आहे. ७/१२ उताऱ्याच्या ऐवजी आता या जमिनींची नोंद 'प्रॉपर्टी कार्ड'वर केली जाईल. शहरी भागातील जमिनींसाठी हे अधिकृत आणि कायदेशीर दस्तऐवज मानले जाते.

  • 07 May 2026 09:30 AM (IST)

    07 May 2026 09:30 AM (IST)

    मुंबई विमानतळ आज ६ तासांसाठी बंद 

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CSMIA) प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विमानतळ प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, आज गुरुवार, ७ मे २०२६ रोजी देखभालीच्या कामासाठी विमानतळ सहा तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

     

    • वेळ: सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.

    • कारण: मान्सूनपूर्व (Pre-monsoon) देखभाल आणि दुरुस्तीचे काम. मुंबईतील मुसळधार पावसाळ्यात धावपट्टीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे वार्षिक नियोजित काम केले जाते.

    • काय बंद राहणार? विमानतळाच्या दोन्ही मुख्य धावपट्ट्या (RWY 09/27 आणि 14/32) या काळात पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे कोणतेही विमान उड्डाण करणार नाही किंवा उतरणार नाही.

  • 07 May 2026 09:25 AM (IST)

    07 May 2026 09:25 AM (IST)

    भीमाशंकर मंदिराचे दरवाजे ३१ मेपासून भाविकांसाठी उघडणार 

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर, ३१ मे २०२६ पासून मंदिराचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा खुला होणार आहे.

    मंदिराच्या मुख्य सभामंडपाची पुनर्बांधणी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव जानेवारी महिन्यापासून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला होता. आता ही कामे पूर्णत्वाकडे असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंदिर खुले करण्याचे संकेत दिले आहेत. शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे.

  • 07 May 2026 09:20 AM (IST)

    07 May 2026 09:20 AM (IST)

    जेफरी एपस्टीनचे 'डेथ नोट' सार्वजनिक; मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातील मजकुराने खळबळ

    जगभरात गाजलेल्या जेफरी एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणाला तब्बल सात वर्षांनंतर एक मोठे वळण मिळाले आहे. न्यूयॉर्कच्या तुरुंगात झालेल्या त्याच्या रहस्यमयी मृत्यूनंतर, त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली शेवटची चिठ्ठी आता अमेरिकेतील न्यायालयाने सार्वजनिक केली आहे. या पत्रातील भाषेमुळे आणि दाव्यांमुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

    न्यायाधीश केनेथ करास यांच्या आदेशानुसार समोर आलेल्या या पत्रात एपस्टीनने अत्यंत आक्रमक भाषा वापरली आहे. त्याने लिहिले आहे की, "तपास यंत्रणांनी अनेक महिने माझी सखोल चौकशी केली, परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नाही." आपल्या मृत्यूचा उल्लेख करताना त्याने उपरोधिकपणे म्हटले आहे की, "निरोप देण्यासाठी स्वतःच्या वेळेची निवड करणे ही एक 'ट्रीट' (Treat) असल्यासारखे आहे." या वाक्यामुळे त्याने आपला मृत्यू स्वतःच निवडल्याचे संकेत दिल्याचे प्रथमदर्शनी वाटत असले तरी, अनेकांनी यावर संशय व्यक्त केला आहे.

  • 07 May 2026 09:15 AM (IST)

    07 May 2026 09:15 AM (IST)

    सरकारी नोकरीची संधी: कोल इंडिया लिमिटेडमध्ये ६६० मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती

    सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी कोल इंडिया लिमिटेडने (CIL) रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. विविध तांत्रिक आणि बिगर-तांत्रिक शाखांमध्ये ६६० मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

    भरतीचे महत्त्वाचे तपशील:

    • एकूण पदे: ६६०

    • अर्ज सुरू होण्याची तारीख: १२ मे २०२६

    • अर्जाची शेवटची तारीख: ११ जून २०२६

    • अर्ज पद्धत: ऑनलाइन

    कोणत्या शाखांसाठी किती संधी? ही भरती प्रामुख्याने अभियांत्रिकी आणि इतर व्यवस्थापकीय शाखांसाठी आहे. यामध्ये खालील विभागांचा समावेश आहे:

    • तांत्रिक शाखा: सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, आयटी (IT), इलेक्ट्रॉनिक्स, जिओलॉजी आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग.

    • बिगर-तांत्रिक शाखा: हिंदी (अधिकृत भाषा) आणि कंपनी सेक्रेटरी.

    विशेष आकर्षण: या भरतीमध्ये इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या उमेदवारांसाठी सर्वाधिक पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.

  • 07 May 2026 09:10 AM (IST)

    07 May 2026 09:10 AM (IST)

    पुण्यातील पर्वतीत भागात सख्ख्या आजोबाकडून ९ वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न

    पुण्यातील पर्वती परिसरात नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ७० वर्षीय नराधम आजोबाने आपल्याच ९ वर्षांच्या सख्ख्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे या चिमुरडीचा जीव वाचला असून पुढील अनर्थ टळला आहे.

     पीडित मुलगी आणि तिचे आजोबा घरात असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा सुरू केला. मुलीचा आवाज ऐकून शेजारी सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने घराकडे धाव घेतली. शेजारी आल्याचे पाहून आरोपीचा प्रयत्न फसला.

  • 07 May 2026 09:05 AM (IST)

    07 May 2026 09:05 AM (IST)

    SRH vs PBKS: हैदराबादचा विजय आणि गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप

    आयपीएल २०२६ (IPL 2026) मधील ४९ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) पंजाब किंग्सचा (PBKS) ३३ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे, तर सलग तिसऱ्या पराभवामुळे पंजाब किंग्सची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

    नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादने निर्धारित २० षटकांत २३५/४ अशी डोंगरासारखी धावसंख्या उभारली. हेनरिक क्लासेन (६९*), ईशान किशन (५५) आणि अभिषेक शर्मा (३५) यांनी आक्रमक फलंदाजी केली.

    २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली (२३/३). मात्र, २२ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू कूपर कॉनोलीने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने ५९ चेंडूंत नाबाद १०७ धावा (७ चौकार, ८ षटकार) फटकावून आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

  • 07 May 2026 08:59 AM (IST)

    07 May 2026 08:59 AM (IST)

    पश्चिम बंगाल निवडणूक २०२६: ममता बॅनर्जी यांचा राजीनामा देण्यास नकार

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (२०२६) निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. १५ वर्षांची सत्ता गेल्यानंतर आणि स्वतःच्या बालेकिल्ल्यात (भवानीपूर) पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी आपण स्वतःहून पदाचा राजीनामा देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. "मी हरलेले नाही, त्यामुळे मी राजभवनावर जाणार नाही. राज्यपालांना मला पदावरून हटवायचे असेल तर त्यांनी खुशाल हटवावे," असे आव्हान त्यांनी दिले आहे.

  • 07 May 2026 08:55 AM (IST)

    07 May 2026 08:55 AM (IST)

    सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन

    काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हंता व्हायरसने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जागतिक आरोग्य संघटने दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर विषाणूमुळे आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हंता विषाणूची लागण झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. ताप, पोटाच्या गंभीर समस्या, न्यूमोनिया आणि ‘एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तर काही रुग्णांना आयसोलेशनवर ठेवून उपचार केले जात आहेत. शरीराला गंभीर विषाणूची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. तसेच हे विषाणू थेट शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतात. यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया हंता व्हायरस म्हणजे काय? हंता व्हायरस झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?  वाचा सविस्तर- 

  • 07 May 2026 08:52 AM (IST)

    07 May 2026 08:52 AM (IST)

    Pune Rain: पुण्यात पावसाचा ‘रुद्रावतार’; एप्रिल महिन्यात पावसाने मोडला 130 वर्षांचा ‘हा’ विक्रम

    सुनयना सोनवणे/पुणे: यंदाच्या एप्रिल महिन्याची सुरुवातच अवकाळी, वादळी पावसाने झाल्याने पुणे शहरातील हवामानाचा पॅटर्नच बदलल्याचे चित्र दिसून आले. दोन एप्रिल रोजी शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसात शिवाजीनगर येथे एका दिवसात तब्बल ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने एप्रिल महिन्यातील एका दिवसातील पावसाचा तब्बल १३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. यापूर्वी ४ एप्रिल १८९६ रोजी ५१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

Web Title: Maharashtra desh videsh 7th may breaking marathi news maharashtra india global politics economics sports entertainment crime stock market agriculture breaking live marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 
1

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 

Ethanol Blending: Petrol मध्ये 25% इथेनॉल? तेल संकटात भारताचा ‘हा’ मेगाप्लॅन तुमच्या गाड्यांवर करणार मोठा परिणाम?
2

Ethanol Blending: Petrol मध्ये 25% इथेनॉल? तेल संकटात भारताचा ‘हा’ मेगाप्लॅन तुमच्या गाड्यांवर करणार मोठा परिणाम?

Maharashtra Breaking News Updates Today: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती
3

Maharashtra Breaking News Updates Today: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती

युद्धाच्या परिस्थितीत Trump यांना मोठा धक्का…,10 % Tarrif कोर्टाकडून रद्द! काय परिणाम होणार?
4

युद्धाच्या परिस्थितीत Trump यांना मोठा धक्का…,10 % Tarrif कोर्टाकडून रद्द! काय परिणाम होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.