Maharashtra Breaking News Updates Today:
01 Apr 2026 10:40 AM (IST)
इटालियन फुटबॉल संघ पुन्हा एकदा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला आहे. चार वेळा विश्वचषक विजेता असलेला इटली संघ २०२६ च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणार नाही. प्लेऑफच्या अंतिम सामन्यात बोस्निया आणि हर्झेगोविनाने त्यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले. फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात इटलीला सलग तिसऱ्यांदा अपयश आले आहे.
01 Apr 2026 10:30 AM (IST)
अशोक खरातशी नियमितपणे संपर्क साधणाऱ्या अंदाजे ४५ राजकारण्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. खरात याची मुलगी तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेचा फोटो समोर आला आहे. या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांची नावे असल्याचे दिसून येते. नाशिक येथे पार पडलेल्या या लग्नसमारंभालाही अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे. या निमित्ताने अशोक खरात आणि विविध पक्षांतील नेत्यांमधील जवळीक अधोरेखित होत असल्याचे बोलले जात आहे. असेही म्हटले जाते की, हे नेते राजकीय निर्णय घेण्यापूर्वी खरात यांचा सल्ला घेत असत.
01 Apr 2026 10:20 AM (IST)
युरोपातील देश ऑस्ट्रिया आता मुलांच्या ऑनलाइन जगाबाबत मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. येथील सरकार १४ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची योजना आखत आहे. या निर्णयाचा उद्देश मुलांना प्लॅटफॉर्मच्या डिजिटल नकारात्मक प्रभावापासून वाचवणे हा असल्याचे सांगितले जात आहे. सरकारचे असे मानणे आहे की, आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असे अल्गोरिदम वापरतात जे मुलांना दीर्घकाळ स्क्रीनशी जोडून ठेवतात. ही सवय हळूहळू व्यसनात बदलते, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. याव्यतिरिक्त, अनेकदा मुलांसमोर असे संवेदनशील आणि अयोग्य कंटेंट देखील येतात जे त्यांच्या वयानुसार योग्य नसतात.
01 Apr 2026 10:10 AM (IST)
किंग कोब्रा हा जंगलातील एक धोकादायक प्राणी मानला जातो. त्याची दहशत फक्त जंगलातच नाही तर शहरी भागातही लोकांमध्ये तितकीत दिसून येतो. किंग कोब्राला पाहताच लोक आपली वाट बदलतात, अशात आपल्या बेडवर आपल्यसमोर तो बसला आहे ही भावना कुणालाही घाबरवून टाकणारी ठरते. ही घटना थायलंडच्या एका हाॅटेलमध्ये घडून आली. कपल हाॅटेलच्या बेडवर झोपले असताना अचानक त्यांच्या उशीखालून एका कोब्राने फुत्कार सोडला आणि त्यांना जाग आली. जेव्हा त्यांनी लाईट्स लावून आवाज कशाचा येत आहे याचा शोध घेतला तेव्हा त्यांना खोलीत कोब्रा येऊन बसल्याचे दिसले.
01 Apr 2026 10:02 AM (IST)
सीट डिव्होर्स नावाचा नवा ट्रेंड कपल्समध्ये वेगाने व्हायरल होत आहे. याचा शब्दश: अर्थ घटस्फोट असा नसून जोडीदारापासून थोडं दूर स्वत:ला महत्त्व देणं असा आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही विमानाने, रेल्वेने किंवा गाडीत लांबचा प्रवास गाठत असाल तेव्हा तुम्ही एकमेकांच्या शेजारी बसण्याऐवजी वेगवेगळ्या आसनांवर बसण्याचा निर्णय घेता आणि स्वत:सोबत अधिक वेळ घालवता. हा ट्रेंड नात्यातील दुरावा वाढवण्यासाठी नाही तर नात्यात दुरावा वाढू नये म्हणून फाॅलो केला जातो.
01 Apr 2026 09:55 AM (IST)
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जात आहे. खरातच्या कुटुंबावर पोलिसांनी फास आवळला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’ पथकाने मंगळवारी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला अटक केली. मात्र, खरातची पत्नी कल्पना ही फरार झाली आहे. पोलिसांकडून आता कल्पनाचा शोध घेतला जात आहे.
शिर्डीतील जमीन खरेदीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात तपास यंत्रणा कल्पना खरातला अटक करण्यासाठी पोहोचल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच ती पसार झाली. सूत्रांनुसार, पुणे आणि नाशिक पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत. याप्रकरणी कल्पनासह एकूण पाच जणांवर फसवणूक आणि सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक करून न्यायालयात हजर केले, जिथे त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
01 Apr 2026 09:48 AM (IST)
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar 2) सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे. प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे या चित्रपटाने अवघ्या ११ दिवसांतच आपल्या पहिल्या भागाच्या कमाईचा विक्रम मोडीत काढला आहे. सध्याची चित्रपटाची क्रेझ पाहता, हा सिनेमा लवकरच नवा इतिहास रचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'धुरंधर २'ने अवघ्या ११ दिवसांत पहिल्या भागाच्या (१३०७.३५ कोटी) एकूण कमाईला मागे टाकले आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आता १५०० कोटी रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्याकडे वेगाने कूच करत आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने जगभरात १३०७.३५ कोटींची कमाई केली होती. मात्र, दुसऱ्या भागाने अवघ्या दीड आठवड्यात हे यश संपादन केले आहे. 'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या स्पाय-थ्रिलर चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा मोठ्या कमाईचे पर्व सुरू केले आहे.
01 Apr 2026 09:44 AM (IST)
नाशिक/पुणे लोकांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा एकेक पदर आता तपासात उलगडू लागला आहे. खरातने स्वतःच्या कुटुंबाच्या नावे विविध शहरांत मोठी मालमत्ता जमवल्याचे समोर आले असून, आता पुण्याच्या उच्चभ्रू 'मॉडल कॉलनी' परिसरात त्याच्या मुलीच्या नावावर एका आलिशान फ्लॅटचा शोध लागला आहे.
01 Apr 2026 09:35 AM (IST)
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. शेतीला पाणी देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. याच कारणातून रागाच्या भरात बापानेच आपल्या तरुण मुलाची हत्या केली. ही घटना माढा तालुक्यातील रुईमध्ये घडली.
काय घडलं नेमकं?
शेतीला पाणी देण्यावरून वडील आणि मुलगा यांच्यात वाद झाले होते. या वादात बापाला मुलाने शिव्या दिल्याचा राग आला होता हाच राग मनात धरून वडिलाने घरात झोपलेल्या अवस्थेतील मुलाला लोखंडी गजाने मारहाण करून त्याची हत्या केली.
01 Apr 2026 09:30 AM (IST)
PBKS vs GT IPL 2026 Live: आज चंदीगडमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. यामध्ये पंजा किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर गुजरात टायटन्सला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग स्वतःच्या संघाला शिक्षा दिल्याचे पाहायला मिळाले. वाचा सविस्तर-
Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे
India Iran Oil Trade Resume 2026 : जागतिक राजकारणाच्या बुद्धिबळाच्या पटावर भारताने पुन्हा एकदा आपली मुत्सद्देगिरी सिद्ध केली आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि त्यानंतर सुरू झालेल्या इराण-इस्रायल संघर्षामुळे (US-Israel Iran War) भारतातील तेल साठा संपत चालला असतानाच, तेहरानमधून एक सुखद बातमी आली आहे. तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इराणचे कच्चे तेल पुन्हा एकदा भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्यांपर्यंत (Refineries) पोहोचणार आहे. इराणच्या खारग बेटावरून ६,००,००० बॅरल तेल घेऊन निघालेला ‘पिंग शुन’ टँकर आता भारताच्या उंबरठ्यावर आहे.






