एसटी सेवा ठप्प होणार? प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीकडून बेमुदत आंदोलनाची घोषणा
ST workers protest : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीच्या वतीने ९ जून २०२६ पासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई येथे महाराष्ट्रातील बहुसंख्य एसटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्री महोदययांच्या सोबत पार पडली. या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक व कामगार हिताच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २९ जून २०२६ पासून मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालय, सर्व विभागीय कार्यालये तसेच सर्व मध्यवर्ती कार्यशाळांवर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी जोरदार मागणी कृती समितीने केली आहे.
राज्यातील सर्व आगार, विभागीय कार्यालये, कार्यशाळा व मध्यवर्ती कार्यालय येथे घंटानाद व महाआरती आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार.
२२ जून २०२६ रोजी
महाराष्ट्रातील प्रत्येक युनिटसमोर प्रचंड द्वार सभा आयोजित करण्यात येणार.
२९ जून २०२६ पासून
मुंबईसह राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालये, मध्यवर्ती कार्यशाळा व मध्यवर्ती कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन होणार……!






