Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर बालेन शाह यांचा खरा चेहरा उघड

Maharashtra Breaking news marathi- ओडिशातून या अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती तपासात समोर आली असून, नक्षलग्रस्त भागात धाडसी कारवाई करत पोलिसांनी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 11, 2026 | 04:03 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

 धाराशिव येथील १० कोटी ३८ लाख रुपयांच्या हशीश ऑइल तस्करी (Dharashiv Hashish Oil Smuggling) प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रसेनजीत खिरमहन दास याला स्थानिक गुन्हे शाखेने ओडिशाच्या नक्षलग्रस्त जनतापाई भागातून अटक केली आहे. नळदुर्ग येथे पोलीस नाकेबंदी दरम्यान हशीश ऑइलच्या बॅगा रस्त्यावर फेकून हा आरोपी पसार झाला होता. या गुन्ह्यात यापूर्वी नाशिक आणि मालेगावातून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. ओडिशातून या अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती तपासात समोर आली असून, नक्षलग्रस्त भागात धाडसी कारवाई करत पोलिसांनी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

The liveblog has ended.
  • 11 May 2026 04:00 PM (IST)

    11 May 2026 04:00 PM (IST)

    आसाममध्ये उद्या ११.४० वाजता पार पडणार शपथविधी समारंभ

    आसामच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमंता बिस्वा सरमा यांच्या मुख्यमंत्रीपगाचा शपथविधी समारंभ मंगळवारी सकाळी ११.४० वाजता खानपार येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय मैदानावर पार पडणार आहे.

  • 11 May 2026 03:55 PM (IST)

    11 May 2026 03:55 PM (IST)

    बॉक्सऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा धुरळा ; सलग दहाव्या दिवशी 12.40 कोटींची कमाई

    राजा शिवाजी सिनेम हा पहिला वहिला मराठी सिनेमा आहे ज्याने आतापर्यंत सर्वाधिक कमाई केली. सलग दहाव्या दिवशी देखील या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. फर्स्ट डे फर्स्ट शोला सिनेमाने तब्बल 12.40 कोटींची कमाई केली. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत सिनेविश्वात अभिनेता रितेश देशमुखचं कौतुक केलं जात आहे. या सिनेमाने सुरुवातीचे तीन दिवस बॉक्सऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. पहिला दिवशी तब्बल 12.40 कोटींची कमाई करणारा हा पहिला मरठी सिनेमा आहे. वाचा सविस्तर

  • 11 May 2026 03:50 PM (IST)

    11 May 2026 03:50 PM (IST)

    Amravati News: कृषी नियंत्रण कक्षाचा ‘वॉच’! खरीप हंगाम; बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार रोखणार

    अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी तयारीला लागले असून बोगस बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागही सज्ज झाले आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या संकल्पनेतून एक हायटेक ‘कृषी नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. ५ मे पासून सुरू झालेली ही यंत्रणा थेट शेताच्या बांधावरून येणाऱ्या तक्रारींची दखल घेणार असून, बोगस निविष्ठा विकणाऱ्यांवर आणि चढ्या दराने खते विकणाऱ्या केंद्रांवर आता प्रशासनाचा ‘वॉच’ राहणार आहे. वाचा सविस्तर

  • 11 May 2026 03:45 PM (IST)

    11 May 2026 03:45 PM (IST)

    दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैनिकांवर हिजबुल्लाहचा हल्ला

    दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या सैनिकांना लक्ष्य करण्यातआ ले आहे. हिजबुल्लाहने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल लष्करावर तीन वेळा गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायली सैनिकांनी माघार घेतली असल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे. मात्र अद्याप इस्रायलकडून याची कोणतीही पुष्टी झालेली नाही.

     

     

     

  • 11 May 2026 03:40 PM (IST)

    11 May 2026 03:40 PM (IST)

    प्रियकरासाठी नवऱ्याची हत्या

    यवतमाळ येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमसंबंधाला आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने भयानक कट रचला. गाढ झोपेत असतांना पतीला जिवंत मारण्यासाठी पत्नीने पतीला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट रचला. मात्र हा कट फसला. घडलेली घटना यवतमाळ येथील पांगडी गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खडबड उडाली आहे. वाचा संपूर्ण प्रकरण

  • 11 May 2026 03:35 PM (IST)

    11 May 2026 03:35 PM (IST)

    व्हिएतनामला जाणारे तेलवाहू जहाज होर्मुझची सामुद्रधुनीतून सुरक्षित बाहेर

    माल्टाचा ध्वज असलेल्या 'अजिओस फानुरिओस-१' या तेलवाहू जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे. हे जहाज इराकहून कच्चे तेल व्हिएतनामला घेऊन जात होते. इराणने निश्चित केलेल्या सागरी मार्गाचा वापर करुन या जहाजाने होर्मुझ पार केले आहे. सध्या इराण होर्मुझ सामुद्रधुनीतल जहाजांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहे.

  • 11 May 2026 03:30 PM (IST)

    11 May 2026 03:30 PM (IST)

    इराण युद्धात ब्रिटन सहभागी होणार नाही

    ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी इराण युद्धावर मोठे विधान केले आहे. ब्रिटनला या युद्धात ओढला जाऊ देणार नाही असे त्यांनी म्हटले. यापूर्वी देखील त्यांनी इराणसोबत अमेरिकेची लढाई ब्रिटनची नसल्याचे आणि कधीही युद्धा सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

    स्टारमर यांनी शांतता आणि संवादाच्या माध्यमातून वाद सोडवण्यावर भर दिला. त्यांनी प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले.

    सध्या ब्रिटनने आखीत प्रदेशात आपली आणु आपल्या नागरिकांची सुरक्षा व्यवस्था आणि सागरी पाळत ठेवण्याची मोहिम तीव्र केली आहे.

    I will not let the UK be dragged into a war with Iran — Starmer https://t.co/0lXpKr6dqK pic.twitter.com/qkUzAt0ByG

    — RT (@RT_com) May 11, 2026

  • 11 May 2026 03:25 PM (IST)

    11 May 2026 03:25 PM (IST)

    चीन इराणला क्षेपणास्त्र उत्पादनात मदत करतोय - नेतन्याहू

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. चीनने इराणला क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये मदत केली असल्याचे त्यांमी म्हटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. मात्र याबाबत अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

    यापूर्वी देखील चीनवर इराणला लष्करी मदत आणि क्षेपणास्त्रांशी संबंधित उपकरणे पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र हा आरोप चीनने फेटाळला आहे.

    NOW - Netanyahu confirms that, "China gave certain amount of support and particular components of missile manufacturing" to Iran, but he "wont say more than that." pic.twitter.com/IiysBTlNYb

    — Disclose.tv (@disclosetv) May 10, 2026

  • 11 May 2026 03:20 PM (IST)

    11 May 2026 03:20 PM (IST)

    नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्या फोनवर संवाद

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनवरुन संवाद झाला आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये अद्याप कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  • 11 May 2026 03:15 PM (IST)

    11 May 2026 03:15 PM (IST)

    दक्षिण कोरियाकडून होर्मुझमध्ये आपल्या जहाजावरील हल्ल्याचा निषेध

    दक्षिण कोरियाने होर्मुज सामुद्रधुनीत त्यांच्या मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. दक्षिण कोरियाने या हल्ल्याचा निषेध केला असून जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून योग्य प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे.

    मे महिन्याच्या सुरुवातील होर्मुझ सामुद्रधुनीत दक्षिण कोरियाच्या मालवाहू जहाजाला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यामुळे जहाजावर आग लागली होती. यामुळे जहाजाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु अद्याप हल्ला कोणी केला हे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

  • 11 May 2026 03:10 PM (IST)

    11 May 2026 03:10 PM (IST)

    Gold Price Alert:

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला, अत्यावश्यक नसलेली सोन्याची खरेदी एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचं आवाहन केलं. त्यामुळे सध्या सोन्याच्या मार्केटमध्ये चांगलीच उलथापालथ पाहायला मिळाली. यामुळे सराफांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याचा परिणाम थेट शेअर बाजारावरही दिसून आला आहे. आज दागिन्यांशी संबंधित सर्व Stocks ची घसरण झालेली पाहायला मिळाली. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर, सोन्यावरील आयात शुल्कात म्हणजेच Import Duty मध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवणारी चर्चाही तीव्र झाली आहे. जर सोन्यावरील आयात शुल्कात वाढ झाली, तर त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होणार आहे. नेमका काय होणार परिणाम? जाणून घेऊयात सविस्तर

  • 11 May 2026 03:05 PM (IST)

    11 May 2026 03:05 PM (IST)

    2 भारतीयांना हंताव्हायरसची लागण

    जग अद्याप कोरोनाच्या संकटातून सावलेले नाही, तोवर हंताव्हायरल नावाच्या जीवघेण्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. अर्जेंटिनाहून निघालेल्या एमव्ही होंडियस या डच क्रूझवर या विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हंताव्हायरसची २ भारतीयांनाही लागण झाली आहे. माद्रिद येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, दोन भारतीय क्रू मेंबर्सला याची लागण झाली असून त्यांना जहाजावरुन सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. वाचा सविस्तर

  • 11 May 2026 02:59 PM (IST)

    11 May 2026 02:59 PM (IST)

    अल्पवयीन पीडितेवर चुलत भावाचा अत्याचार, नंतर बेकायदेशीर गर्भपात; वडील अटकेत

    बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन पीडित मुलीवर अल्पवयीन चुलत भावाने अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या बेकायदेशीर पेक्षा गर्भपात केल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना अटक केली असून न्यायालयाने त्यांचे रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.

  • 11 May 2026 02:50 PM (IST)

    11 May 2026 02:50 PM (IST)

    राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, मनसेच्या वतीने कोल्हापुरात मोर्चा

    राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी तसेच शेतकऱ्या ंच्या कर्जमाफी संदर्भात लावलेल्या नियमा अटी त्वरित शेती कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाले आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना देण्यात येणारे भत्ते पेन्शन रद्द करून शासनावरील आर्थिक भार कमी करावा यासह अन्य मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

  • 11 May 2026 02:42 PM (IST)

    11 May 2026 02:42 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात २८ महिन्यांत ५० चिमुरड्यांचे लैंगिक शोषण

    जळगाव जिल्ह्यात गेल्या २८ महिन्यांत ४६ मुली आणि चार अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये गंभीर बाब म्हणजे या पीडित बालकांचे लचके तोडणारे दूरचे कुणी नाही तर बहुतांश परिचित असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

  • 11 May 2026 02:29 PM (IST)

    11 May 2026 02:29 PM (IST)

    नवापूर एमआयडीसीमध्ये भीषण आग, हवेत पसरले धुराचे लोट

    नंदुरबारमध्ये नवापूर एमआयडीसीत भीषण आग लागली आहे. आगीमुळे धुराचे प्रचंड लोट हवेत पसरले आहेत. आगीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

  • 11 May 2026 02:21 PM (IST)

    11 May 2026 02:21 PM (IST)

    बोईसरमध्येअतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तणाव

    बोईसर शहरात मुख्य बाजारपेठेत फूटपाथवर असलेल्या अतिक्रमणांवर बोईसर ग्रामपंचायतची धडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. दरम्यान, अतिक्रमण हटवताना फेरीवाल्यांची मुजोरीमुळे तणाव निर्माण झाला होता.

  • 11 May 2026 02:10 PM (IST)

    11 May 2026 02:10 PM (IST)

    DCM सुनेत्रा पवारांवर जेसीबीतून पृष्पवृष्टी

    राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचं स्वागत केलय तसेच रोहा शहरात त्यांचं जेसीबीतून पृष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलयं. त्यानंतर त्यांनी रोहा शहरात विविध विकासकामांचं उद्घाटन केलंय. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच रायगड दौरा आहे.

  • 11 May 2026 02:01 PM (IST)

    11 May 2026 02:01 PM (IST)

    Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर बालेन शाह यांचा खरा चेहरा आला समोर

    Balen Shah Nepal PM Anti-India decisions : दक्षिण आशियातील भारताचा सर्वात जवळचा शेजारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. २७ मार्च रोजी बालेन शाह (Balen Shah) यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली आणि तेव्हापासूनच भारत-नेपाळ संबंधांमध्ये एका नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. बालेन शाह यांनी गेल्या ४५ दिवसांत घेतलेल्या निर्णयांवरून हे स्पष्ट होत आहे की, ते आपल्या ‘भारतविरोधी’ प्रतिमेवर ठाम आहेत. काठमांडूचे महापौर असताना ‘आदिपुरुष’ चित्रपटाला विरोध करणारे बालेन आता पंतप्रधान म्हणून भारतासमोर मोठी आव्हाने उभी करत आहेत.

  • 11 May 2026 02:00 PM (IST)

    11 May 2026 02:00 PM (IST)

    नरेंद्र मोदींकडून ‘वर्क-फ्रॉम-होम’ चे आवाहन!काटकसर की संकटाची चाहूल?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत ऊर्जा संवर्धन अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांनी कोविड-१९ महामारीच्या काळात अवलंबलेल्या ‘वर्क-फ्रॉम-होम’ (Work From Home)  मॉडेलचाही उल्लेख केला आणि कंपन्या व संस्थांनी शक्य असेल तिथे घरून काम करण्याच्या पर्यायाचा पुनर्विचार करावा, असे सांगितले.पंतप्रधान मोदींच्या या भाषणाचा नेमका हेतू काय होता, त्यामागे काय कारण असू शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • 11 May 2026 01:55 PM (IST)

    11 May 2026 01:55 PM (IST)

    नळ कनेक्शनसाठी 50 हजारांची मागणी? महापालिकेच्या प्लंबरकडून सर्वसामान्यांची लूट

    दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे महापालिकेकडून अधिकृतरित्या मिळणाऱ्या नळ जोडणीत प्लंबरच मलिदा खाऊ लागले असून, एका नळजोडणीला नागरिकांकडून अतिरीक्त ५० हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याघटनेने मात्र, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे प्लंबर महापालिकेचे अधिकृत ठेकेदार आहेत. या घटनेनंतर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

  • 11 May 2026 01:50 PM (IST)

    11 May 2026 01:50 PM (IST)

    हळूहळू होणारा मृत्यू, रहस्यमय ताप आणि फुफ्फुसांमध्ये पाणी; जाणून घ्या किती धोकादायक आहे हंता विषाणू?

    जगाला कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असतानाच आता एका जुन्या पण अत्यंत घातक अशा ‘हंता’ (Hantavirus) विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अर्जेंटिनातील उशुआइया येथून अंटार्क्टिकाच्या दिशेने निघालेल्या ‘एमव्ही होंडियस’ (MV Hondius) या आलिशान क्रूझ जहाजावर या विषाणूने थैमान घातले. १७० प्रवासी आणि ७१ कर्मचारी असलेल्या या जहाजावर तीन प्रवाशांचा रहस्यमय मृत्यू झाल्याने संपूर्ण जगात घबराट पसरली आहे.

  • 11 May 2026 01:45 PM (IST)

    11 May 2026 01:45 PM (IST)

    भारताचा ‘दिव्यास्त्र’ प्रहार! ड्रॅगनला बसला ताकदीचा जबरदस्त धक्का; गुप्तहेर जहाज तैनातीही ठरली निष्फळ

    भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी शुक्रवारी एक ऐतिहासिक क्षण उजाडला. ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून भारताने जेव्हा अग्नी क्षेपणास्त्राची ‘एमआयआरव्ही’ (Multiple Independently Targetable Re-entry Vehicle) चाचणी घेतली, तेव्हा केवळ क्षेपणास्त्रच अवकाशात झेपावले नाही, तर भारताने जागतिक संरक्षण नकाशावर आपली एक नवी ओळख निर्माण केली. मात्र, या यशाच्या पडद्यामागे एक मोठा संघर्ष सुरू होता. भारताच्या या चाचणीची माहिती चोरण्यासाठी चीनने हिंद महासागरात आपले अत्याधुनिक ‘दा यांग हाओ’ हे गुप्तहेर जहाज तैनात केले होते.

  • 11 May 2026 01:40 PM (IST)

    11 May 2026 01:40 PM (IST)

    खासगी शाळेत टीईटी पात्र शिक्षक किती? लवकरच होणार पडताळणी; शिक्षण विभागाचे संकेत

    राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत या नियमाची अंमलबजावणी आणि चर्चा मुख्यत्वे शासकीय आणि अनुदानित शाळापुरती मर्यादित होती. मात्र आता खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांचीही टीईटी पात्रता तपासली जाणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील खासगी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी किती जण टीईटी पात्र आहेत, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

  • 11 May 2026 01:35 PM (IST)

    11 May 2026 01:35 PM (IST)

    बाप रे… भारताच्या जमिनीतून तब्बल इतकं सोनं आणि तांबं निघतं! ५ वर्षांचा रिपोर्ट पाहून थक्क व्हाल

    भारतच नाही तर संपूर्ण जग सध्या जागतिक स्तरावर सुरु असलेल्या युद्धाचा सामना करत आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींची टंचाई पाहायला मिळत आहे. याचा परिणाम महागाईचा भडका, आणि वस्तूंचा तुटवडा यांच्या स्वरुपात होताना दिसत आहे. आखाती संकटामुळे उद्भवणाऱ्या वाढत्या आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वस्तूंच्या वापराबाबत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनादरम्यान, त्यांनी लोकांना पुढील वर्षभर सोन्याची खरेदी करणे टाळण्याचीही विनंती केली; कारण अशा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर्समध्ये पैसे मोजावे लागतात आणि याचा परिणाम देशाच्या परकीय चलन साठ्यावर होत असतो.

  • 11 May 2026 01:25 PM (IST)

    11 May 2026 01:25 PM (IST)

    EV कारमधील Turtle Mode नेमका काय आहे? बॅटरी संपल्यावरही कशी धावते गाडी?

    सध्या जगभरात आणि भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत प्रचंड वाढ होत आहे. यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. परंतु इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी घेताना लोकांना भीती असते, ती म्हणजे कारची बॅटरी मध्येच संपली तर काय होईल? तुमची गाडीच तिथेच थांबणार की अजून थोडी धावणार? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. याचे उत्तर टर्टल मोड या तंत्रज्ञानात आहे.

  • 11 May 2026 01:15 PM (IST)

    11 May 2026 01:15 PM (IST)

    आरोपींना 2 दिवसात अटक करा, नाहीतर…; विकास लवांडे शाईफेक प्रकरणावरुन रोहित पवारांचा इशारा

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपींना दोन दिवसांच्या आत अटक करून कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा आमदार रोहित पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिला आहे.

  • 11 May 2026 01:08 PM (IST)

    11 May 2026 01:08 PM (IST)

    सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला 75 वर्षे ; 101 तोफांच्या सलामीने दुमदुमला इतिहास

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी मंदिरात पूजा केली. भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या भव्य कळसाला देशभरातील ११ पवित्र तीर्थक्षेत्रांतील पाण्याने अभिषेक करण्यात आला. या अभिषेकासाठी एका विशेष कलशाचा वापर करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान, ११ तीर्थक्षेत्रांतील पवित्र पाणी मंदिराच्या ९० मीटर उंच कळसावर ओतण्यात आले. या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक राज्यांतील कलाकार आणि दूरदूरच्या भागांतील प्रेक्षक आले होते.

  • 11 May 2026 01:02 PM (IST)

    11 May 2026 01:02 PM (IST)

    पुणे विभागातील अनधिकृत शाळांना लागणार कुलूप

    राज्यातील अनधिकृत शाळांविरोधातील शिक्षण विभागाच्या कारवाईत पुणे विभागात तब्बल ६३ अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. यापैकी ११ शाळांवर बंदीची कारवाई करण्यात आली असून, सात शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दहा शाळांकडून दंडाची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे अनधिकृत शाळांना कुलूप लागणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

  • 11 May 2026 12:48 PM (IST)

    11 May 2026 12:48 PM (IST)

    सुरक्षा रक्षकाकडून चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न

    पिंपरी- चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षा रक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम आता गजाआड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, (शुक्रवारी, ता ८) दुपारी सोसायटीत शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी याने १०, ८, ६ आणि ८ वर्षे वयोगटातील चार मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवून सातव्या मजल्यावर नेले. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर मारून टाकेन, अशी धमकीही त्याने चिमुरड्यांना दिली होती. आरोपीच्या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील १० वर्षांच्या एका मुलीने न घाबरता घरी पोहोचताच आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतल्याने या नराधम सुरक्षारक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

  • 11 May 2026 12:36 PM (IST)

    11 May 2026 12:36 PM (IST)

    लोणावळा अत्याचार प्रकरणाची निलम गोऱ्हेंनी घेतली दखल

    मावळ तालुक्यातील जवन (पवना डॅम) येथे ऑगस्ट २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दिनांक ५ मे रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज लोणावळा येथे वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, “पीडित मुलीचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्व मदत केली जाईल. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तिला मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.”

  • 11 May 2026 12:24 PM (IST)

    11 May 2026 12:24 PM (IST)

    पुण्यात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून

    केशवनगर येथील कचरा डेपोच्या रोडलगत गळा दाबून तरुणीचा खुन करुन तिला फेकून दिलेल्या प्रकरणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा आणि मुंढवा पोलिसांनी एका कॅबचालकाला याप्रकरणी अटक केली असून, पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. गोरखनाथ देवराम शिंदे (वय ४२, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे या कॅबचालकाचे नाव आहे. आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

  • 11 May 2026 12:12 PM (IST)

    11 May 2026 12:12 PM (IST)

    ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कट उधळला!

    ड्रग्ज फ्री सिटी करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असताना ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कारखाना थाटण्याचा मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणात आठ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तब्बल ४५ लाखांच्या एमडीसह १.१६ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये महागड्या चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. वाघोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

  • 11 May 2026 12:00 PM (IST)

    11 May 2026 12:00 PM (IST)

    आई-वडिलांचे छत्र हरपले, तरीही पहिल्याच प्रयत्नात IAS कसा झाला अनिमेष प्रधान?

    कधीकधी आयुष्य अशा वळणावर आणून उभे करते जिथे आश्रुंशिवाय काहीच सोबत नसते. जेव्हा परिस्थिती कष्ट, वेदना आणि संघर्षाशिवाय काहीच शिकवत नाही. तेव्हा स्वप्नेच सर्वकाही होतात. अनिमेषची गोष्ट सुद्धा अशीच काहीशी आहे. कमी वयातच त्यांच्या वडीलांचे छत्र हरपले. त्यानंतर आईला कॅन्सरने हेरावून नेले. पण सर्व आव्हाने आणि कठीण परिस्थितीशी झुंज देत तो आयएएस (IAS) झाला.

  • 11 May 2026 11:50 AM (IST)

    11 May 2026 11:50 AM (IST)

    आता मैदानात रोबोट्स भिडणार! एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी रिंगणात उतरले रोबोट पैलवान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

    सध्या सोशल मीडियावर एक रोबोट्सच्या फायटिंगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामध्ये दोन मानी आकाराचे रोबोट्स एखाद्या पैलवानासारखे लढत आहेत.

  • 11 May 2026 11:50 AM (IST)

    11 May 2026 11:50 AM (IST)

    रेल्वेतील एफटी कोट्याचा झाला गैरवापर! ३९ प्रकरणांत ३.५६ लाखांचा दंड; १२१ प्रवाशांवर कारवाईचा बडगा

    विदेशी पर्यटकांसाठी राखीव असलेल्या ‘फॉरन टुरिस्ट कोटा’चा (एफटी कोटा) गैरवापर करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेने कडक कारवाई सुरू केली असून, ३९ प्रकरणांत तब्बल ३ लाख ५६ हजार ९१६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान १२१ प्रवासी अनियमित प्रवास करताना आढळून आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.वैध कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिक विदेशी कोट्यातून तिकीट काढून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मध्य रेल्वेने ही मोहीम तीव्र केली. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी गाडी क्रमांक १२२९६ ‘संगमित्रा एक्सप्रेस’ मध्ये हा प्रकार उघडकीस आला. काही भारतीय प्रवासी आवश्यक विदेशी कागदपत्रांशिवाय एफटी कोट्याच्या तिकिटांवर प्रवास करताना आढळले. त्यानंतर एफटी कोट्यातील भविष्यातील आरक्षणांचा सखोल आढावा घेण्यात आला.

  • 11 May 2026 11:40 AM (IST)

    11 May 2026 11:40 AM (IST)

    रेल्वेतील एफटी कोट्याचा झाला गैरवापर! ३९ प्रकरणांत ३.५६ लाखांचा दंड; १२१ प्रवाशांवर कारवाईचा बडगा

    विदेशी पर्यटकांसाठी राखीव असलेल्या ‘फॉरन टुरिस्ट कोटा’चा (एफटी कोटा) गैरवापर करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेने कडक कारवाई सुरू केली असून, ३९ प्रकरणांत तब्बल ३ लाख ५६ हजार ९१६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान १२१ प्रवासी अनियमित प्रवास करताना आढळून आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.वैध कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिक विदेशी कोट्यातून तिकीट काढून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मध्य रेल्वेने ही मोहीम तीव्र केली. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी गाडी क्रमांक १२२९६ ‘संगमित्रा एक्सप्रेस’ मध्ये हा प्रकार उघडकीस आला. काही भारतीय प्रवासी आवश्यक विदेशी कागदपत्रांशिवाय एफटी कोट्याच्या तिकिटांवर प्रवास करताना आढळले. त्यानंतर एफटी कोट्यातील भविष्यातील आरक्षणांचा सखोल आढावा घेण्यात आला.

  • 11 May 2026 11:30 AM (IST)

    11 May 2026 11:30 AM (IST)

    यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

    भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायंस जियोने त्यांच्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने त्यांच्या पोर्टफोलिओमधील एक स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला होता. ज्याची किंमत 209 रुपये होती. त्यानंतर कंपनीने आता आणखी एक रिचार्ज प्लॅन बंद करत ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. या दुसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 249 रुपये आहे. या दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 1GB डेली डेटा ऑफर केला जात होता. मात्र आता जिओच्या रिचार्ज पोर्टफोलिओमधून 209 आणि 249 रुपयांचे प्लॅन हटविण्यात आले आहेत.

  • 11 May 2026 11:22 AM (IST)

    11 May 2026 11:22 AM (IST)

    मृतदेहासोबत रिल बनवण्यासाठी सुनेचा रडण्याचा ड्रामा, VIDEO VIRAL

    सोशल मीडियावर एक  व्हिडिओ व्बायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिला आपल्या सासूच्या मृतदेहासोबत रिल बनवत आहे. हा प्रकार पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी माणुसकी संपत चालले असल्याचे म्हटले आहे.

  • 11 May 2026 11:00 AM (IST)

    11 May 2026 11:00 AM (IST)

    लोकशाहीचा हा कोणता खेळ? BJPचा 30 लाखांनी विजय पण वगळले 34 लाख मतदार

    कॅलिफोर्नियातील जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठात आयोजित ‘स्टॅनफोर्ड इंडिया कॉन्फरन्स २०२६’ मध्ये भारताच्या राजकीय भविष्यावरून मोठी जुंपल्याचे पाहायला मिळाले. “इंडिया, दॅट इज भारत – विकास, प्रशासन आणि ओळख” या विषयावर आयोजित या चर्चासत्रात काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरूर (shashi tharoor)  यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर आणि निवडणूक प्रक्रियेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. विशेषतः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी आणि आगामी मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) या दोन मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

  • 11 May 2026 10:50 AM (IST)

    11 May 2026 10:50 AM (IST)

    स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’

    जेव्हा मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (MBA) पदवीसाठी देश निवडण्याचा प्रश्न येतो, तेव्हा बहुतेक भारतीय विद्यार्थी टॉप शिक्षण संस्थांना अधिक प्राधान्य देतात. त्यापैकी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी ही एक संस्था आहे. स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसला क्यूएस (QS) रँकिंगमध्ये अमेरिकेतील टॉप-५ संस्थांमध्ये स्थान आहे. येथे केवळ भारतातूनचे नव्हे तर जगातील अनेक देशातून विद्यार्थी येतात.

  • 11 May 2026 10:40 AM (IST)

    11 May 2026 10:40 AM (IST)

    हे आहेत गेममधील बेस्ट लँडिंग स्पॉट्स! तुमच्यासाठी कोणतं ठिकाण ठरणार योग्य? जाणून घ्या

    फ्री फायर मॅक्स (Free Fire Max) मध्ये चांगली सुरुवात अतिशय महत्त्वाची असते. गेममध्ये जास्त काळ टिकून राहण्यासाठी आणि शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य लँडिंग स्पॉट निवडणे अतिशय गरजेचं आहे. कारण योग्य लँडिंग स्पॉट निवडल्यानंतर तुम्हाला पॉवरफुल शस्त्र, लूट आणि गेममध्ये जास्त काळ टिकून राहण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी उतरलात तर शत्रू तुमच्यावर सुरुवातीलाच हल्ला करण्याची शक्यता असते, ज्यामुळे तुम्ही गेममधून लवकर बाहेर जाऊ शकता. यासाठी फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला गेममधील बेस्ट लँडिंग स्पॉट माहिती असणे आवश्यक आहे.

  • 11 May 2026 10:30 AM (IST)

    11 May 2026 10:30 AM (IST)

    हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; लग्नासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला

    नाशिक येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका तरुणाची हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आला आहे. मनमाडमधील (नाशिक) एका हॉटेलमधील स्विमिंग पुलाच्या पोहोण्यासाठी उतरलेल्या ३० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो नाशिक येथून नातेवाईकाच्या लग्नासाठी मनमाडला आला होता.

  • 11 May 2026 10:10 AM (IST)

    11 May 2026 10:10 AM (IST)

    अमेरिकेचा पैसा सुटकेसमध्ये भरून इराणला दिला!’ ट्रम्प यांचा ओबामांवर संताप

    जागतिक भू-राजकीय पटलावर सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील (US-Israel Iran War) तणाव शिगेला पोहोचला आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांतर्गत राजकारणातही एक मोठा बॉम्ब टाकला आहे. ट्रम्प यांनी त्यांचे पूर्ववर्ती राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्यावर इराणच्या धोरणावरून अत्यंत बोचरी टीका केली आहे. ट्रम्प यांच्या मते, ओबामा प्रशासनाच्या चुकांमुळेच आज इराण अमेरिकेला डोळे दाखवण्याइतपत मोठा झाला आहे.

  • 11 May 2026 10:00 AM (IST)

    11 May 2026 10:00 AM (IST)

    नेपाळमध्ये मोठा अनर्थ टळला! काठमांडू धावपट्टीवर लँडिगदरम्यान विमानाला आग

    नेपाळ(Nepal) मध्ये त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी दुर्घटना (Accident) टळली आहे. राजधानी काठमांडू येथील विमानतळावर लँडिगदरम्यान एका विमानाला अचानक आग लागली. यामुळे विमातळावर मोठा गोंधळ उडाला होता. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • 11 May 2026 09:25 AM (IST)

    11 May 2026 09:25 AM (IST)

    Ladki Bahin Yojana Installment Update: लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार?  

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्यांची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. मे महिन्याचे पहिले १० दिवस उलटले तरी अद्याप रक्कम जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम होता; मात्र आता या तिन्ही महिन्यांचे मिळून एकूण ४५०० रुपये महिलांच्या खात्यात एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नसली, तरी मे महिन्यातच ही प्रलंबित रक्कम जमा होण्याची चिन्हे आहेत. मार्च आणि एप्रिलचे हप्ते न मिळाल्याने आता या महिन्यात तिप्पट लाभ मिळण्याची चर्चा असून, महिलांचे डोळे आता बँक खात्याकडे लागले आहेत.

  • 11 May 2026 09:20 AM (IST)

    11 May 2026 09:20 AM (IST)

    Maharashtra Land Titling Act 2026:  महाराष्ट्र देशात पहिले; जुलैपासून 'लँड टायटलिंग ॲक्ट' लागू होणार, प्रॉपर्टी कार्ड अनिवार्य

    भू-मालकी हक्काबाबत पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार ऐतिहासिक 'लँड टायटलिंग ॲक्ट' लागू करणार असून, अशी पाऊल उचलणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कायद्याचा मसुदा तयार असून येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या नवीन कायद्यामुळे राज्यातील सर्व भूखंडांसाठी 'मालमत्ता कार्ड' (Property Card) अनिवार्य होणार असून, यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीतील फसवणुकीला लगाम बसेल आणि मालकी हक्काबाबतचे कायदेशीर वाद कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

  • 11 May 2026 09:15 AM (IST)

    11 May 2026 09:15 AM (IST)

    Nasarapur Assault Case: नसरापूर अत्याचार प्रकरणासाठी अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

    पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीने चालवण्यासाठी सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. १ मे रोजी घडलेल्या या भीषण घटनेचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून वेगाने सुरू असून, न्यायालयात ठोस पुरावे सादर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणातील आरोपीला १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

  • 11 May 2026 09:10 AM (IST)

    11 May 2026 09:10 AM (IST)

    CSK vs LSG IPL 2026:   ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

    आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर ५ विकेट्सनी विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. लखनौने दिलेल्या २०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवरच विजय साकारला. या पराभवामुळे लखनौ सुपर जायंट्सचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले असून, उर्वरित तीन सामने आता त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता उरले आहेत. लखनौने प्रथम फलंदाजी करताना २०३ धावा केल्या होत्या, मात्र गोलंदाजांना या धावांचा बचाव करता आला नाही. या निकालानंतर लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने संघाच्या कामगिरीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • 11 May 2026 09:10 AM (IST)

    11 May 2026 09:10 AM (IST)

    Maharashtra Farmer Loan Waiver 2026:  राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

    राज्यातील लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे ३४ ते ३५ लाख शेतकरी कर्जमुक्त होण्याची शक्यता असून, लवकरच या योजनेची अधिकृत प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Web Title: Maharashtra to national and international breaking news in marathi 11 may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  नीट पेपरफुटीचा मुख्य संशयित CBIच्या ताब्यात
1

Maharashtra Breaking News Updates Today:  नीट पेपरफुटीचा मुख्य संशयित CBIच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.