Maharashtra Breaking News
10 Nov 2025 10:38 AM (IST)
मलेशियाच्या (Malaysia) सीमेजवळ हिंद महासागरात एक भीषण दुर्घटना होती. म्यानमारच्या सुमारे ३०० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. (Boat Accident) यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (०९ नोव्हेंबर) या घटनेची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव अधिकाऱ्यांनी तातडीने धाव गेतली. या दुर्घटनेत केवळ १० जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर एकाचा मृतदेह सापडला आहे. बाकीचे लोक अद्यापही बेपत्ता आहे. बचाव अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती उशिरा मिळाल्याने शेकडो लोक बेपत्ता झाला आहेत.
10 Nov 2025 10:32 AM (IST)
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथून हत्येची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादातून हत्या झाली. हत्या झालेला व्यक्ती हा मुंबईतील कॉल सेंटरमध्ये कर्मचारी आहे. त्याचे नाव आकाश सिंग असे आहे. आकाशावर धारधार शास्त्राने वार करत संपवण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
10 Nov 2025 10:24 AM (IST)
आता प्रश्न असा उद्भवतो की जर ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करायचे असेल तर शुभमन गिल आणि गौतम गंभीर कोणत्या खेळाडूचा त्याग करतील? माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्रा यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आकाश चोप्रा यांनी ध्रुव जुरेलच्या संभाव्य बदलीसाठी साई सुदर्शन आणि नितीश कुमार रेड्डी ही दोन नावे सुचवली आहेत. “ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत दोघेही संघात आहेत. ऋषभ पंत खेळेल. तो उपकर्णधार आहे. तो खेळेल आणि त्याने खेळायला हवे. पण मला वाटते की ध्रुव जुरेलनेही खेळायला हवे,” आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे.
10 Nov 2025 10:15 AM (IST)
प्लेअर्सना डायमंड्स, वेपन स्किन्स, आउटफिट्स, इमोट्स आणि अनेक प्रीमियम आइटम्स फ्रीमध्ये जिंकता यावेत, यासाठी गरेना रोज रिडीम कोड्सची यादी जाहिर करत असते. या यादीमध्ये दिलेले कोड्स मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असतात. जर तुम्ही निवडलेला कोड क्लेम होत नसेल तर समजा की तो कालबाह्य झाला आहे किंवा दुसऱ्या प्रदेशातील आहे.
10 Nov 2025 10:06 AM (IST)
हाँगकाँग सिक्सेस 2025 ची स्पर्धा पार पडली, यामध्ये भारताच्या संघाने फारच निराशाजनक कामगिरी केली आणि संघ स्पर्धेमधून बाहेर झाला आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत केले होते पण त्यानंतर संघाला सर्व सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दिनेश कार्तिक या संघाचे नेतृत्व करत होता. पाकिस्तानने कुवेतला हरवून विक्रमी सहावा हाँगकाँग सिक्सेस विजेतेपद जिंकले. जेतेपदाच्या सामन्यात त्यांनी कुवेतवर ४३ धावांनी मोठा विजय मिळवला.
10 Nov 2025 09:59 AM (IST)
“बिग बॉस १९” च्या वीकेंड का वार या रिॲलिटी शोमध्ये अनपेक्षित गोष्ट उघड झाली. निर्मात्यांनी प्रणीत मोरे एक मोठा निर्णय घेण्यास सांगितले, जो तीन नामांकित स्पर्धकांपैकी एकाला वाचवू शकला. त्याने अशनूर कौरचे नाव घेतले. अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांना बाहेर काढण्यात आले. यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चाहते अभिषेकच्या समर्थनार्थ बाहेर आले आणि निर्मात्यांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच आता अभिषेक बाहेर पडल्यामुळे चाहते संपताप झाला आहे.
10 Nov 2025 09:55 AM (IST)
10 Nov 2025 09:50 AM (IST)
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज १० नोव्हेंबर रोजी, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, स्थिर स्थितीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी स्थिर ते सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,६१४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २४ अंकांनी जास्त होता.
10 Nov 2025 09:45 AM (IST)
मुंबई: मुंबईतून चोरीची एक घटना समोर आली आहे. मुंबईच्या आर्मी मुख्यालयातील कर्नलच्या केबिनमधून त्याचे पिस्तुल आणि कॅश चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. पोलिसांना चोरांना अटक करण्यात यश आला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे.
10 Nov 2025 09:40 AM (IST)
भारतात 10 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,201 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,184 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,151 रुपये आहे. भारतात 10 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,010 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,510 रुपये आहे. भारतात 10 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 152.40 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,52,400 रुपये आहे.
10 Nov 2025 09:35 AM (IST)
भारतीय संघाचे काही आंतरराष्ट्रिय सामने सुरु आहेत तर टीम इंडिया अ च्या देखील मालिका खेळवल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर भारतामध्ये देखील काही देशातंर्गत स्पर्धा खेळवल्या जात आहेत. त्यामुळे अनेक नवे युवा खेळाडू हे पाहायला मिळत आहेत. २०२५-२६ रणजी ट्रॉफी सुरू आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात अष्टपैलू आकाश चौधरीने इतिहास रचला. चौधरीने अवघ्या आठ चेंडूत उत्तुंग षटकार मारून विश्वविक्रम केला. त्याच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
10 Nov 2025 09:25 AM (IST)
भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानने जबरदस्त पुनरागमन करत सलग तीन सामने जिंकत हॉन्गकॉन्ग सिक्सेस 2025 चे विजेतेपद आपल्या नावे केले. कर्णधार अब्बास आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तानने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, आणि अंतिम फेरीत कुवेतचा पराभव करत विक्रमी सहाव्यांदा हा किताब जिंकला.
10 Nov 2025 09:20 AM (IST)
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांच्यावर पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राथमिक माहितीनुसार अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना घडल्याचे समजते. सध्या चिखली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
10 Nov 2025 09:15 AM (IST)
धुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस खाली जात आहे. आज धुळ्यातील किमान तापमान 8.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे, जे कालच्या तुलनेत आणखी घट दर्शवते. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभर गारठा वाढला आहे, तर धुळ्यातील तापमानात मोठी घट झाल्याने नागरिकांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या थंडीमुळे धुळेकरांनी स्वेटर, जॅकेट आणि उबदार कपडे पुन्हा वापरात आणले आहेत. दरम्यान, पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
10 Nov 2025 09:14 AM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात संरक्षणात्मक व्यापार धोरणं पुढे नेताना भारताबहेर विविध देशांवर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लादल्या आहेत. भारतावर त्यांचा टॅरिफ दर अंदाजे ५० टक्के पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच, ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना या टॅरिफ महसुल्यातून प्रति व्यक्ती किमान 2 000 डेॉलर्स देण्याचा आश्वासन सोशल मीडियावर दिले आहे. तथापि, या रकमेचा वितरण कधी आणि कोणत्या अटींवर होईल हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
10 Nov 2025 09:10 AM (IST)
गोंदिया जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू लागला असून मागील काही दिवसांत हवामानात लक्षणीय बदल जाणवतो आहे. गोंदियात बोचरी थंडीची चाहूल लागल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर आणि शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस थंडीचा हा कहर कायम राहणार आहे. काल विदर्भातील सर्वांत कमी तापमान 11.5 अंश सेल्सिअस इतके गोंदियात नोंदवले गेले. थंडीपासून बचावासाठी शहर आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्याचे दृश्य पाहायला मिळत असून, जिल्ह्यातील सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत थंडीचा चटका स्पष्टपणे जाणवत आहे.
10 Nov 2025 09:05 AM (IST)
हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बदलत्या ऋतूनुसार जेवणात सुद्धा बदल करणे तितकेच गरजेचे आहे. हवेतील थंडाव्याचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर वारंवार सर्दी, खोकला, नाक बंद होणे, घशात वाढलेली खवखव, नाकातून सतत सर्दी वाहणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. गळा खवखवतो, बोलताना दम लागतो, झोपताना नाक बंद होऊन इत्यादी अनेक समस्या हिवाळ्यात कायमच जाणवू लागतात. धूळ, माती आणि प्रदूषणाचे हानिकारक कण नाक आणि तोंडात गेल्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम लगेच शरीरावर दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाबा रामदेवांनी सांगितलेले काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास श्वासांच्या समस्या, नाक बंद होण्याच्या समस्येपासून कायमचा आराम मिळेल.
10 Nov 2025 09:04 AM (IST)
भारतीय संघाचे काही आंतरराष्ट्रिय सामने सुरु आहेत तर टीम इंडिया अ च्या देखील मालिका खेळवल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर भारतामध्ये देखील काही देशातंर्गत स्पर्धा खेळवल्या जात आहेत. त्यामुळे अनेक नवे युवा खेळाडू हे पाहायला मिळत आहेत. २०२५-२६ रणजी ट्रॉफी सुरू आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात अष्टपैलू आकाश चौधरीने इतिहास रचला. चौधरीने अवघ्या आठ चेंडूत उत्तुंग षटकार मारून विश्वविक्रम केला. त्याच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
10 Nov 2025 09:01 AM (IST)
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (Shiv Sena Shinde Group) जोरदार पक्षप्रवेशाची लाट सुरू आहे. अशातच डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. म्हात्रे दांपत्याने हा निर्णय आमदार रविंद्र चव्हाण यांच्यावरील नाराजीमुळे घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांची अनेकदा मनधरणी करण्यात आली, मात्र नाराजी दूर झाली नाही, अशी चर्चा आहे.
Marathi Breaking news live updates: राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Nagarparishad-Nagarpanchayat Election 2025) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (10 नोव्हेंबर) सुरू होत आहे. या प्रक्रियेसाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल.
राज्यातील विविध पक्षांनी उमेदवारांच्या निवडीसाठी मुलाखतींची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यातील आघाडीची रूपरेषा अद्याप स्पष्ट झालेली नाही. निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.






