हिंगोली : उद्धव ठाकरेंसाठी ढसाढसा रडणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. बंडखोरी केल्याने त्यांची शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षापदावरून हकालपट्टी करण्यात आली. जो आपल्याला गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली आवाज काढा, अशी चिथावणीच त्यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहणार आहोत. पण आपल्याला का रे करत असेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढा, असं संतोष बांगर संतापून म्हणाले.
संतोष बांगर नेमकं काय म्हणाले ?
आमदार संतोष बांगर यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांना चिथावणीच दिली. ते म्हणाले, “मला सर्व शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे. आपण शिवसैनिक कडवट आहोत. जे कुणी आपल्याला गद्दार म्हणत असेल, त्याच्या कानाखाली आवाज काढा. आपण घाबरणारे शिवसैनिक नाहीत. आपण बाळासाहेबांचे लढवय्ये शिवसैनिक आहोत. आम्हाला कुणी का रे म्हणलं, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय गप्प राहणार नाही”
[read_also content=”बँकांच्या खाजगीकरणाचे विधेयक मांडल्यास धरणे आंदोलन; ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/dharna-movement-if-banks-privatization-bill-is-introduced-warning-of-all-india-bank-employees-association-nrdm-304958.html”]
तसेचं पुढे बोलतांना बांगर म्हणाले, आम्ही राष्ट्रवादीत गेलो नाही, काँग्रेसमध्ये गेलो नाही की दुसऱ्या कुठल्या पक्षात गेलो नाही. आम्ही आमचा झेंडा बदललेला नाही. आम्ही शिवसेनातच आहोत. आणि शिवसेनेचं काम करत राहणार. आपल्याला कडवट शिवसैनिक पाहिजे. व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सर्व बाजूला ठेवा. सोशल मीडियावर काय बोललं जातंय, ते बाजूला ठेवा. एकजुटीने काम करुया, असंही संतोष बांगर म्हणाले.